भाजप नवीन पदाधिकारी निवड होणार ?

भाजपा तालुका शहर पदाकरिता खांदे पालटची चर्चा 

          नंदुरबार जिल्हा भाजपाची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आज संध्याकाळी सभा होत असून या सभेच्या माध्यमातून तळोदा तालुका अध्यक्ष पदाची निवड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सेवा कार्य वर्षपुर्ती निमित्त होणाऱ्या या सभेत खासदार रक्षाताई खडसे (प्रदेश सचिव) तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ हिना गावित, आमदार डॉ विजयकुमार गावित, आमदार राजेश पाडवी यांची उपस्थिती राहणार आहे.

              दरम्यान मागील काळात नंदुरबार जिल्हा भाजप जिल्हा कार्यकारणी संपूर्णपणे बरखास्त करण्यात आली होती, त्यामुळं सर्वच तालुक्यातील पदे व शहर पद सोबत संघटनेचे इतर पदाबाबत अंतिम निर्णय बाकी होते. त्यात नुकतेच भाजप जिल्हा अध्यक्ष पद विजय चौधरी यांच्या कडेच कायम ठेवण्यात आले आहे. आता परत त्याची नवीन रचना करण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत.

चर्चेतील नाव -
   बळीराम पाडवी विलास कल्याण डामरे, राजेंद्र राजपूत योगेश चौधरी, आनंद सोनार, रणजित चौधरी, शिरीष माळी यांच्या नावाची चर्चा असून ऐनवेळी नवीन नांवावर चर्चा होऊ शकते तर शहर अध्यक्षपदी योगेश चौधरी यांना कायम ठेवण्याची शकत्या वर्तवली जात आहे उत्तर महाराष्ट्र चे संघटन मंत्री किशोर काळकर व डॉ शशिकांत वाणी व जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी यांची भूमिका  महत्वाची असणार आहे.....

       कालीचरण सुर्यवंशी 
9421887715

Comments

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी