ई, कंटेन क्रीडा क्षेत्रासाठी उपयुक्त- सुहास पाटील

ई- कंटेंटमुळे शारीरिक शिक्षण प्रभावी ठरेल- सुहास पाटील, सहाय्यक संचालक

महाराष्ट्र स्तरावर शारीरिक शिक्षणासाठी तंत्रस्नेही पॅनलचा प्रथमतःच वेगळा प्रयत्न

     आरोग्य व शारीरिक शिक्षण हा विषय विद्यार्थ्यांना फिट ठेवण्यासाठी व रोगप्रतिकारक शक्ती विविध खेळांच्या माध्यमातून निर्माण करण्यासाठी महत्वाचा विषय आहे. या विषयाचे अभ्यासक्रम तयार असून काही वर्गांचे पाठ्यपुस्तक तयार आहेत. पण अभ्यासक्रमावर आधारीत ऑडीओ-व्हिजुअल स्वरूपातील तंत्रशुद्ध ई-कंटेंट अद्याप तयार नव्हते. महाराष्ट्र शारीरिक शिक्षण तंत्रस्नेही पॅनलच्या माध्यमातून ऑनलाईन कार्यशाळा घेऊन तंत्रस्नेही शिक्षक तयार होत आहेत. या तंत्रस्नेही शारीरिक शिक्षकांमार्फत तयार होणाऱ्या ई-कंटेंट मुळे शारीरिक शिक्षण प्रभावी ठरणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालयाचे सहाय्यक संचालक सुहास पाटील यांनी केले. या वेळी प्र. संचालक जयप्रकाश दुबळे यांनी शारीरिक शिक्षणाच्या या उपक्रमाचे कौतुक करून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. 
     महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून गूगल फॉर्मच्या माहितीआधारे सहभागी झालेल्या 220 तंत्रस्नेही शिक्षकांच्या राज्य स्तरावरील तंत्रस्नेही कार्यशाळेचे मोफत आयोजन करण्यात आले होते. 15 जुलै पासून सुरु झालेल्या या कार्यशाळेत प्रा. रोहित आदलिंग व राजेंद्र कोतकर यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये ईमेल तयार करणे, गूगल फॉर्म तयार करणे, गूगल फॉर्ममध्ये क्वीझ तयार करणे, इमेज जोडणे, हिडीओ लिंक जोडणे, प्रमाणपत्र पाठविणे, ई-कंटेंट तयार करणे, पीपीटी तयार करणे, पीपीटी इफेक्ट देणे, स्मार्ट पीडीएफ तयार करणे, अभ्यासक्रमासंदर्भातील व विविध खेळ बाबींचे व्हिडीओ तयार करणेसाठी लागणारे मोबाईल व पीसी सॉफ्टवेअर व टुल्सची माहिती या कार्यशाळेत देण्यात आली. शारीरिक शिक्षण विषयक तंत्रशुद्ध व्हिडीओंची निर्मिती कशी करावी हे विविध व्हिडीओच्या माध्यमातून दाखवून यु ट्युब चॅनल तयार करणे, व्हिडीओ अपलोड व शेअर करणे या सर्व बाबींची सखोल माहिती कार्यशाळेत रोहीत आदलिंग यांनी दिली. तयार होणारे ई-कंटेंट ऑनलाईन एज्युकेशनसाठी सोशल मिडीयाच्या माध्यमातून राज्यभरात तंत्रस्नेही पॅनलमार्फत पाठविले जाणार आहे. या साठी शारीरिक शिक्षणाचे राज्यस्तर तंत्रस्नेही पॅनल तयार करण्यात आले आहे.
       सात दिवशीय राज्यस्तर तंत्रस्नेही कार्यशाळेचा शुभारंभ भारतीय खोखो टीमचे मा. उपकप्तान व धुळे येथील तंत्रस्नेही आनंद पवार यांनी केला. या तंत्रस्नेही कार्यशाळेस अॅथलेटीक्स राष्ट्रीय तांत्रिक समितीचे अधिकारी चंद्रकांत पाटील, नंदुरबार जिल्हाध्यक्ष सुनील सूर्यवंशी, कार्याध्यक्ष पंकज पाठक, जळगाव येथील तंत्रस्नेही राजेश जाधव व राहुल चौधरी, स्वाती चौधरी, सोनाली सूर्यवंशी, सुजाता जोशी यांचे तंटस्नेही कार्य व दिशाबाबत मार्गदर्शन लाभले अशी माहिती मयूर ठाकरे व मीनल वळवी यांनी दिली.
        या कार्यशाळेत चंद्रकांत भोईटे, रियाजोद्दीन शेख, पंकज पाटील, सुनील मोरे, चंद्रकांत ढिकले, लता शिंदे, चेतना चौधरी, सतीश बधाने, पुरुषोत्तम पळसुले, अजित काशिद, अशोक गदादे, अशोक कोलते, प्रकाश महाजन, सलीम पठाण आदींसह तंत्रस्नेही शारीरिक शिक्षण शिक्षक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी