तलोद्यात बारा लाख सत्तर हजारांचे जनावरे पकडले एल,सी,बी व तळोदा पोलिसांची संयुक्त कार्यवाही ,,,,,,

तळोद्यात १२ लाख ७० हजारांचे ६६ जनावरे/ गोवंश पकडले
तलोद्यात एलसीबी व पोलिसांची संयुक्त कारवाई


: तळोदा येथे 22 जुलै रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत कत्तलीसाठी व विक्रीसाठी जाणाऱ्या बारा लाख सत्तर हजार रुपये किमतीचे ६३ गोवंश व ३ गायी धाड टाकून पकडण्यात आले आहेत. पोलिसांनी कारवाई करून एवढ्या मोठ्या संख्येने गायी व बैल पकडण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
        याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की,तळोदा शहरातील खटाई माता मंदिर जवळ असलेल्या मोकळ्या मैदानात झाडाझुडपात गोवंश कत्तलीसाठी व  विक्रीसाठी आणून बांधलेले आहेत.ही महिती  त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत यांच्या पथकाला सांगितली. या पथकाने  २२ जुलै रोजी संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास तळोदा पोलीस स्टेशनला जावून पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे,सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदार,पोलीस उपनिरीक्षक अभय मोरे यांना या प्रकाराची माहिती दिली.
           यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले व तळोद्याचे पोलिस निरीक्षक राजेश शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली तळोदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदार,पोलीस उपनिरीक्षक अभय मोरे,पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील मोरे,पोलीस नाईक अजय पवार, कमलसिंग जाधव, वनसिंग पाडवी,रवींद्र कोराळे,अनिल पाडवी, दिनेश वसावे,रवींद्र पाडवी यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत,हेडकॉन्स्टेबल मुकेश तावडे पोलीस नाईक सुनील पाडवी,दादाभाई मासुळे,मनोज नाईक,युवराज चव्हाण,विजय धिवरे,सतीश घुले यांनी संयुक्त कारवाई करत मिळालेल्या माहितीनुसार तळोदा शहरातील खटाई माता मंदिर जवळ असलेल्या मोकळ्या मैदानात झाडाझुडपाच्या ठिकाणी धाड टाकली.त्याठिकाणी त्यानं ३ गायी व ६३ बैल अशी एकूण ६६ जनावरे आढळून आले. त्यांची किंमत साधारपणे त्यांना अंदाजे १२ लाख सत्तर हजार रुपये एवढी असल्याचे सांगितले जाते.या जनावरांबाबत अधिक चौकशी केली असता, गोवंश मार्केट कमिटीचा परवाना नसताना कत्तलीसाठी व विक्रीसाठी ही जनावरे आणली असल्याचे समोर आल्याने  पोलीस कॉन्स्टेबल अजय कोळी यांच्या  फिर्यादीवरून आरोपी रियाज खान रज्जाक खान कुरेशी (38),शेख मोहसीन शेख सलीम कुरेशी (34) दोघे रा.कुरेशी मोहल्ला,तळोदा या दोघांविरोधात महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) कायदा 1976 चे कलम 5 (ब)चे उल्लंघन, कलम 9(1) सह प्राण्यांना क्रूरतेने वागणूक देण्यास प्रतिबंध करणारा कायदा 1960 चे कलम 11 (1)(ज) प्रमाणे मजकुराची लेखी फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास फुल सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदार हे करत आहेत.या जनावरांना तळोदा तालुक्यातील रांझणी येथिल श्री कृष्ण गो शाळेत पाठविण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी