मनपा/नगरपरीषदांच्या बैठका केवळ ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्सने

तळोदा =  कालीचरण सूर्यवंशी
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महानगरपालिका,नगर परिषदा,नगर पंचायती यांच्या सर्व बैठका आता व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे घ्यावेत असे आदेश नगर विकास विभागाने दिले आहेत.त्यामुळे तळोदा  नगरपालिकेची तहकूब झालेली व समस्त शहरवासीयांचे लक्ष लागून असलेली सर्वसाधारण सभा आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कश्या प्रकारे होते, याकडे आता उत्सुकता निर्माण झाली आहे. 
             कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर शासनाने राज्यातील महानगरपालिका,नगर परिषदा,नगर पंचायती यांनी त्यांच्या सर्वसाधारण सभा तसेच विविध विषयांच्या नियतकालिक सभाबाबत त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा, असे शासनाने निर्गमित केलेल्या 3 एप्रिलच्या पत्रान्वये कळविण्यात आले होते.आता निरयामध्ये बदल करत covid-19,कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून सामाजिक अंतर व अनुषंगिक मार्गदर्शक सूचना वेळोवेळी निर्गमित केलेल्या संबंधित महानगरपालिका नगर परिषदा नगर पंचायती अधिनियमातील तरतुदीनुसार नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या सभा बैठका घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे अनुषंगाने पुढील आदेश होईपर्यंत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या सभा बैठका या नियमितपणे केवळ व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घ्याव्यात,असे निर्देश दिले आहेत.नगर विकास विभागाने राज्यातील सर्व विभागीय आयुक्त,सर्व महानगरपालिका आयुक्त,सर्व जिल्हाधिकारी व  सर्व नगरपरिषद, नगरपंचायत मुख्याधिकारी यांना नगर विकास विभागाचे उपसचिव कैलास बधान यांनी पत्र पाठवून याबाबत सूचित केले आहे.
      दरम्यान,या नव्या निर्देशामुळे तळोदा शहर वासीयांचे लक्ष लागून असलेली व बहुप्रतिक्षित तसेच तहकूब झालेली सर्वसाधारण सभा आता ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घ्यावी लागणार आहे.परंतू सभेतील वादग्रस्त विषय व ऑनलाइन सभा घेण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणीत यामुळे नगरपालिका प्रशासनासमोर ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेणे हे नवे आव्हान ठरणार आहे.आता तळोदा पालिका प्रशासन ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कश्या प्रकारे घेणे किंवा तहकूब झालेली सभा यापुढे तहकूब राहू देते हे पाहणे, उत्सुकतेचे ठरणार आहे.

 पालिकेतील इतिहासात प्रथमच अशी सभा -
तळोदा नगर पालिकेच्या इतिहासात प्रथमच अशी  सभा होत असल्याने आता  कोणत्या विषयांवर  कोण काय मत मांडत  या कडे लक्ष लागून आहे, तलोदा पालिकेतील मागील सभा रद्द झाल्याने आता हि सभा कोणताही वाद न होता पार पडेल असे बोलले जाते

Comments

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी