तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाकडून गुण गौरव

तळोदा 
        दहावी सीबीएससी पॅटर्न व बारावी एच एस सी परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या तळोदा शहर व तालुक्यातील  विद्यार्थ्यांना तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाकडून अभिनंदन पत्रे देण्यात आली. ही अभिनंदन पत्रे विद्यार्थ्यांना घरपोच देण्यात येऊन त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या अनोख्या शुभेच्छांनी विद्यार्थी भारावले होते व पुढील शैक्षणिक आयुष्यातही शहराचे नाव उज्ज्वल करण्याच्या प्रयत्न करणार असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी विद्यार्थ्यांचे पालकांनी उपक्रमाचे स्वागत केले. पत्रकार संघाचे अध्यक्ष फुंदीलाल माळी , उपाध्यक्ष विकास राणे ,सचिव किरण पाटील ,कोषाध्यक्ष सुशील सुर्यवंशी जेष्ठ पत्रकार  भरत भामरे, व सदस्य उपस्थित होते.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी