राजकारणातील ,,,,,,,अजात शत्रू श्री अजय परदेशी
राजकारणातील अजात शत्रू ,,,,, अजय परदेशी
राजकारण म्हटलं की त्यात हल्ली प्रगल्भ तरुणांना जेष्ठ लोक सल्ला देतात राजकरणात जाऊ नकोस मात्र त्याला काही अपवाद असतात त्यातल एक व्यक्तिमत्त्व म्हणजे तळोदा शहरात भैया म्हणून प्रसिद्ध असणारे अजय परदेशी आहेत ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करण्यास प्राधान्य देणारे भैया सतत तरुणांचा तसेच जेष्ठ नागरिकांचा गराड्यात दिसतात,
तळोदा शहरात भाजीपाला विक्री करणाऱ्या परदेशी स्व: छबु काका कुटुंबातील एक सर्व साधारण तरुण ते लोकनियुक्त नगराध्यक्ष हा राजकीय प्रवास निश्चितच थक्क करणारा असा आहे.
अजय परदेशी अगदी सुरुवातीला राजकीय वाटचाली पासून ते नगराध्यक्ष पद पावेतो विराजमान होण्यामागे कुठलं रहस्य असेल तर ते रस्त्यावर व्यवसाय करून उदरनिर्वाह चालविणारा तलोद्यातील गरीब व्यवसायिक असेल अथवा शहरातील मोठा व्यापारी असेल यांच्याशी नाळ जोडून ठेवणारा नेता म्हणजे अजय भैया सर्व सामान्य नागरिकांचा असणारा दांडगा संपर्क त्यांनी सतत ठेवला आजही त्यांची सकाळ जुन्याच ठिकाणी चहाच्या कट्टयावर होते, तसेच नगराध्यक्ष यांच्याशी भेट घेण्यासाठी इतर कोणाची भेट घाव्ही लागत नाही कोणीही सर्व सामान्य नागरिक त्यांना निवासस्थानच्या बाहेर असणाऱ्या टुमदार कार्यालयात भेट घेऊन आपल्या समस्या मांडतात नागरिक थेट संपर्क करून समस्या सांगू शकतात अशी जीवन शैली भेया ची वेगळी ओळख ठरविते , भाजपातच नाही तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना या पक्षामधील प्रमुख नेत्यांचा त्यांचा अतिशय मैत्री पूर्ण संबध आहेत, आमदार उदेसिंग पाडवी यांच्या नेतृत्वात त्यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष ची उमेदवारी करत विजय संपादित केला, स्वतः च्या समाजाचे बोटावर मोजण्या इतपतच कुटुंब असतांना शहरातील जनेतच्या हृदयाच्या ठाव घेणारे राजकीय व्यक्तिमव म्हणजे भेया म्हणूनच त्यांना कामाची संधी दिलेली आहे
*परदेशी कुटुंबातील राजकीय वारसा* -
प्रमिला छबुलाल परदेशी या १९८५ साली नगरसेविका म्हणून निवडून आल्यात तर ८८ ते ९६ वडील स्व, छबुलाल परदेशी यांनी देखील नगरसेवक म्हणून काम पाहिले नंतर १९९७ पासून ते २०१२ पावेतो सलग तीन वेळा नगरसेवक पदी निर्विदाद पणे अजय परदेशी निवडून आले तर २०१७ पावेतो स्वीकृत नगरसेवक म्हणून देखील त्यांनी काम केलं १९९८ साली भाजप युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून भाजप कडून पद दिल गेलं
२००६ साली गावांत सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी श्री राम गृप स्थापन केला, या माध्यमातून शहरात प्रथमच स्वर्ग रथ आला व नुकतीच आमदार उदेसिंग पाडवी यांच्या माध्यमातून शव वहिनी देखील मिळाली आहे ज्याची जबाबदारी श्री राम शोसल गृप सांभाळत आहे
२००९ साली शहर अध्यक्ष
,२०१२ साली विधानसभा क्षेत्र प्रमुख नगराध्यक्ष
२०१५ साली जिल्हा चिटणीस अशी विविध पदे अजय परदेशी यांनी जबाबदारी ने सांभाळली
: गाडी वाला आया घरसे कचरा निकाल ला उत्तम प्रतिसाद -
पालिकेने नवीन कचरा संकलन गाड्या खरेदी केल्या असून नियमित कचरा संकलन यातून होत आहे, अल्प अवधीत हे गीत सर्वांच तोंडी आहे,
पूर्णत्वाकडे येणारे काम -
खटाई माता नगरातील अंतर्गत रस्ते व गटारी , विक्रम नगर अंतर्गत रस्ते व गटारी, बडादादा नगर अंतर्गत रस्ते व गटारी, चिनोदा चोफुली पासून ते वळण रस्तापावेतो गटारी, इलाही चॉक आणि भोई गल्ली अंतर्गत रस्ते व गटार , तळोदा शहर प्रवेशद्वार शहादा रस्ता, बिरसा मुंडा चॉक पासून थेट प्रवेशद्वार पावेतो रस्ता रुंदीकरण , गटारीवर स्लेप, पथमार्ग, खुली जिम तयार करणे, तसेच शहादा रस्तावर असणाऱ्या तीन छोट्या नाल्यावर लहान पूल बांधकाम पूर्ण झालं आहे
हातोडा रस्तावर रस्तावर न्यायालय पावेतो रुंदीकरण, संत सावता चॉक सुशोभित करणे, दुबाजक,फुटपाथ, झाडांना संवरक्षक कठडे तयार करणे
पुढील आव्हाने =
प्रलंबित हातोडा पाणी पुरवठा योजना जलद गतीने पूर्णत्वास आणणे, पालिकेचे मालकीचे व्यपारी गाळे योग्य मार्ग काढून वाटप करणे पालिकेचे नवीन वास्तूत स्थलांतर करणे, आज लोकांचा मनाचा ठाव घेऊन गरीब श्रीमंत चा मनात राज करणाऱ्या लोकनियुक्त नगराध्यक्ष ला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा,,,,,,,,,,,
वाढदिवस निमित्त काही तळोदा पालिकेचा विकास कामाचे ड्रोन केंमऱ्याचे दृश्य तळोदा शहर प्रथमच तळोदा एक्सप्रेस च्या ब्लॉगवर फोटो साभार प्रथा मुव्हीज तळोदा
कालीचरण सूर्यवंशी
अजय भैय्यांच्या एकच ध्यास तळोदा विकास
ReplyDelete