एक क्रीडाप्रेमी चा दुर्देवी अंत
एक उत्साही तरुणाचा दुर्देवी अंत,,,,,,,
समीर शेख तलोद्यातील सर्वच मैदानावर सतत हजेरी लावणारा कबड्डी, थाळी फेक, भाला फेक, हॅन्डबॉल खेळात पारंगत असा तरुण उमदा खेळाडू. खेळत असतांना शिक्षण देखील या उमद्या तरुणाने सुरू ठेवल होतं. हिंदी विषयांत बी,ए, व नंतर बी,एड, व एम,ए, देखील केलं. याच पदवी व प्रामाणिक पणा च्या शिदोरीवर प्रतापपूर इथं उपशिक्षक म्हणून काम केलं होतं.
तळोदा शहरात कोणत्याही मैदानांवर स्पर्धा असली की समीर तिथं कुठंतरी स्पर्धेचा आनंद घेतांना दिसत असे. परिचय असो अथवा नसो खेळाडूला मार्गदर्शन देण्याची आवड त्याला असायची . त्यामुळे सर्वच हाडाचे क्रीडा शिक्षक त्याला नावाने परिचित होते, शरीर संपदा टिकविण्यासाठी सदैव मेहनत व्यायाम याला वेळ देत असे. त्याला मी नेहमी लोखंड म्हणायचो कारण त्याच शरीर एकदम मजुबत होतं.
व्यायामच व्यसन-
समीर ला व्यायाम ची प्रचंड आवड सतत व्यायाम करत असे त्याने घरी देखिल स्वतः काही साहित्य तयार करून ठेवल होत तिथं तो नियमित व्यायाम करत होता, धर्म जात न मानता सर्वांचा संपर्कात राहून चर्चा करणे हे त्याचे चांगले गुण,,,,,,
सर मला क्रीडा शिक्षक म्हणून जॉब भेटेल का ? असा प्रश्न नेहमी भेटला की तो करत असे . मागील काळात आदिवासी विकास प्रकल्पात
क्रीडा मार्गदर्शकाची भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्याची इच्छा जागृत झाली, मेहनतीने एकदिवस मी स्वतः ला सिद्ध करेल अशी जिद्द व चिकाटीने प्रयत्न करणारा एक माझा माजी विद्यार्थी व एक उत्साही शिक्षकांचा दुर्देवी अंत मनाला चटका लावून गेला,
समीर शेख आमच्या मैदानावरील खेळाडू होता. कबड्डी व विविध फेकीचे प्रकार मध्ये त्याचा सहभाग असे शिक्षण वेगळ्या विषयात घेतलं असलं तरी क्रीडा क्षेत्रात खुप आवड होती. असे उच्च शिक्षित तरुण ज्यांना क्रीडा क्षेत्रात आवड आहे जे स्वतः खेळाडू आहेत मैदान म्हणजे आपली कर्मभूमी समजणारे समीर आता मुळात कमी होत असतानाच समीर शेख या तरुणाचं अचानक जाणं एक क्रीडाप्रेमी म्हणून मला वेदनादायी आहे.
एन तरुण वयात किरकोळ आजाराने देवाघरी गेला, एक पोलादी तरुण न भेटता गेला हि सल नेहमी मनात राहील. स्पर्धा तालुकास्तर असो की जिल्हास्तर अगदी आंतर महाविद्यालयीन स्पर्धा असतील तरी समीर शेख एक खेळाडू एक मार्गदर्शक एक क्रीडाप्रेमी म्हणून हजेरी लावत असे त्याची ,,,,,,
येणाऱ्या काळातील अनुपस्थिती सदैव जाणवेल. गर्दी आणि दर्दी यात फरक असतो हा दर्दी क्रीडाप्रेमी ,,,,
एक सोज्वळ सालस मन मनमिळावू समीर शेख सदैव स्मृतीत राहील,,,
,
माझी नजर क्रीडा स्पर्धेत नेहमी त्याला शोधत राहील. तो दिसणार नाही तरी ,कारण असे क्रिडाप्रेमी फार कमी शिल्लक आहेत. त्यात त्याचं जाणं खूप मोठी हानी आहे.
त्याचा मृत आत्म्यास शांती लाभो
समीर एक खेळाडू म्हणून तुला सलाम
फ़ार वाईट झाले, भावपूर्ण श्रद्धांजली
ReplyDeleteभावपूर्ण श्रद्धांजली.....
ReplyDeleteभावपूर्ण श्रद्धांजली
ReplyDeleteभावपूर्ण श्रद्धाजंली ।
ReplyDeleteखरच एक चांगला मित्र आपल्याला सोडून गेला याची खंत नेहमी मानत असेल। खुपच छान स्वभाव मनमिलाऊ होता समीर
भावपूर्ण श्रध्दांजली
ReplyDeleteभावपूर्ण श्रद्धांजली समीर भाऊ..💐😢
ReplyDeleteMisss uuu Bhai
ReplyDeleteMiss u Bhai
ReplyDeleteAllah tumhe zannat nasi kare Bhai
ReplyDeleteBhavpurna shradhanjali Mitra
ReplyDelete