Posts

Showing posts from July, 2020

तळोद्याची प्राची गोसावी जिल्ह्यात तृतीय तर केंद्रात प्रथम

Image
माध्यमिक शालांत परीक्षा मार्च 2020 च्या निकाल जाहीर झाला असून गो. हू महाजन न्यू हायस्कूल ची विद्यार्थीनी प्राची रवींद्र गोसावी हिने 96. 40% गुण मिळवत नंदुरबार जिल्ह्यात तिसरा क्रमांक व तळोदा केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. गुलाबबाई दुल्लभ राजकुळे कन्या विद्यालय तळोदा येथील विद्यार्थीनी खुशी संजय अग्निहोत्री हिने 94.80% गुण मिळवत केंद्रात दुसरा तर नेमसुशील विद्यामंदिर तळोदा येथिल विद्यार्थीनी हिरल मनोज मगरे हिने 94.40% गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला आहे.         सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक शिक्षकशिक्षकेत्तर कर्मचारी व पालकांकडून कौतुक केले जात आहे.                कु, प्राची गोसावी       प्रा, गो,हू, महाजन हायस्कुल तळोदा                         कु, खुशी  अग्नीनिहोत्री           कन्या विद्यालय तळोदा             ...

कु,प्राची गोसावी जिल्हात तृतीय तर केंद्रांत प्रथम

Image
शिक्षण महर्षी  स्वातंत्र्य सेनानी प्रा, भाई साहेब गो,हू, महाजन व शी,ल, माळी कनिष्ट महाविद्यालयाची विध्यार्थीनी  कु, प्राची गोसावी जिल्हात तृतीय व तळोदा केंद्रात प्रथम येथील प्राचार्य भाईसाहेब गो. हु. महाजन न्यू हायस्कुल व शि. ल. माळी कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु,प्राची रविंद्र गोसावी केंद्रात प्रथम तर जिल्ह्यात तृतीय आली आहे. शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल ८८.१३ टक्के लागला असून एकूण ३३७ विद्यार्थ्यांपैंकी २९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.... महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. यात प्राचार्य भाईसाहेब गो. हु. महाजन न्यू हायस्कुल व शि. ल. माळी कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थ्यांनी यावर्षी देखील आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली असून प्राची रविंद्र गोसावी ही ९६.४० टक्के मिळवून केंद्रात प्रथम व जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळवला आहे. प्राजक्ता तुकाराम वळवी व प्रगती पवनकुमार दिक्षित या दोन्हींनी ९३.९० टक्के मिळवून शाळेत संयुक्तपणे द्वितीय तर दामिनी जगदिश परद...

एक क्रीडाप्रेमी चा दुर्देवी अंत

Image
एक उत्साही तरुणाचा दुर्देवी अंत,,,,,,, समीर  शेख तलोद्यातील  सर्वच मैदानावर सतत हजेरी लावणारा  कबड्डी, थाळी फेक, भाला फेक, हॅन्डबॉल खेळात पारंगत असा तरुण उमदा खेळाडू.  खेळत असतांना शिक्षण देखील या उमद्या तरुणाने सुरू ठेवल होतं. हिंदी विषयांत बी,ए, व  नंतर बी,एड, व  एम,ए, देखील केलं. याच पदवी व प्रामाणिक पणा च्या शिदोरीवर प्रतापपूर इथं  उपशिक्षक म्हणून काम केलं होतं. तळोदा शहरात कोणत्याही  मैदानांवर  स्पर्धा असली की समीर तिथं कुठंतरी स्पर्धेचा आनंद घेतांना दिसत असे. परिचय असो अथवा नसो खेळाडूला मार्गदर्शन  देण्याची आवड त्याला असायची . त्यामुळे सर्वच हाडाचे क्रीडा शिक्षक त्याला नावाने परिचित होते,  शरीर संपदा टिकविण्यासाठी सदैव मेहनत व्यायाम याला वेळ देत असे. त्याला मी नेहमी लोखंड म्हणायचो कारण त्याच शरीर  एकदम मजुबत होतं.  व्यायामच व्यसन- समीर ला  व्यायाम ची प्रचंड आवड सतत व्यायाम करत असे  त्याने  घरी देखिल स्वतः काही साहित्य तयार करून ठेवल होत तिथं तो नियमित  व्यायाम करत  होता,   धर्म जात ...

माझा आधारवड हरपला,,,, प्रतिभा ताई शिंदे

Image
नाना साहेब जे. यू.ठाकरे यांचे आज कोरोना शी संघर्ष करता करता निधन झाले , लोकसंघर्ष मोर्चा च्या प्रतिभा शिंदे यांच्या शब्दांतून संवेदना माझा पुरोगामी चळवळीतील आधारवड आज हरवला प्रतिभा शिंदे, लोक संघर्ष मोर्चा १९८८ चे वर्ष साक्री येथे १४ व १५ फेब्रुवारीला बाबा आमटे नी काढलेली पहिली भारत जोडो यात्रा साक्रिला ला येणार त्या वेळी पहिल्यांदा नाना साहेबांची ओळख झाली , नानांच्या न्यू इंग्लिश स्कुल मध्ये मी शिकत होती आणि शाळेत भरवल्या जाणाऱ्या राष्ट्र सेवा दलाच्या शाखेवर मी जायचे नानांनी भारत जोडो यात्रेची तयार करण्याचे साठी आख्या साक्री तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये आम्हाला सायकलवर पाठवले प्रत्येक गावातून पापड,कुरडया ,धान्य गोळा करण्याचे काम व १४ ला सकाळी प्रत्येकाच्या घरावर गुढी अंगणा समोर रांगोळी काढण्याचे  आवाहन  करत आम्ही महिना भर फिरत होतो , १०विचे वर्ष घरच्यांचा पूर्ण राग नाना साहेबांवर १४ तारखेला बाबा व भारत जोडो  यात्रा साक्री त आली आमचे आख्ख गाव गुढी ,रांगोळी ,फटाके अस सणा सारखं देखण सजल होत सर्वान मधे नव चेतना कोण तो उत्साह सायंकाळी महिला मेळावा त्यात मी युवती ...
Image
तळोदा येथील डॉ शशिकांत वाणी यांची मालेगांव प्रभारी म्हणून भाजप  महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांची प्रमुख उपस्थितीत झालेल्या मिटिंग मध्ये कार्य। समितीत राज्यातील काही प्रभारी ची नावांची घोषणा केकी यांत डॉ शशिकांत वाणी यांची मालेगांव जिल्हा प्रभारी म्हणून नेमणूक  करण्यात आली असून वाणी यांची ओळख भाजप मधील एकनिष्ठ कार्यकर्ते ते एक एकनिष्ठ नेते म्हणून प्रदेश पातळीवर  ओळख असून संघटन कडून या  अगोदर त्यांचा कडे प्रदेश कार्यसमिती सदस्य, भाजप जिल्हा अध्यक्ष, प्रदेश सचिव आदिवासी आश्रम शाळा  संघटन तसेच धुळे विधानसभा प्रभारी या अगोदर काम पाहिले आहे, आता पक्षाने त्यांच्यावर मालेगांव ची जबाबदारी टाकली असून पुढील तीन वर्षे साठी मालेगांव भागातील सर्व निवडणुकीत त्यांची भूमिका पक्ष प्रतिनिधी म्हणून मोलाची ठरणार आहे, भाजपला यश मिळवून देणे या साठी त्यांची जबाबदारी वाढली आहे
Image
 तळोदा तालुक्यात भूगर्भातील पाणीसाठा वाढण्यासाठी महत्त्वाचे असणारे लघु प्रकल्प काही  अल्प प्रमाणात  भरत असले तरी त्याची गळतीही दरवर्षीप्रमाणे सुरू झाली असून  येथील होणाऱ्या गळतीमुळे दरवर्षी उन्हाळ्यात किरकोळ जलसाठा जेमतेम नावाला शिल्लक असतो या बाबत परिसरातील शेतकरी वर्ग कडून अनेकदा त्रकार करून देखील या कडे डोळेझाक होताना दिसत आहे,  यात गढावली व रोझवा या दोन प्रकल्पांनी तर पावसाळ्या पूर्वीच तळ गाठल्याने कोरडे झाले होते,  तर पाडळपूर येथे फक्त मान्सूनपूर्व 34 टक्के व  सिंगसपुर लघु प्रकल्‍पात 55 टक्‍के पाणीसाठा शिल्लक होता . त्यामुळे या लघु प्रकल्पांच्या भिंतींना लागलेली गळती दुरुस्त होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यात तालुक्यात यंदा पाऊस अजूनही दमदार झालेला नाही , त्यामुळं येणाऱ्या काळात पाऊस कमी झाल्यास अडचण होऊ शकते ,        तळोदा तालुक्यात कोणतेही मोठे धरण नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतीचे सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी होणारा पाणी पुरवठा पूर्णपणे भूगर्भातील पाण्यावर अवलंबून आहे. मागील वर्षी समाधानकारक पाऊ...

*वृक्ष हेच व्हेंटिलेटर वृक्ष हेच जीवन,* मेधाताई पाटकर

Image
शहादा तालुक्यातील चिखली पुनर्वसन  नर्मदा बचाओ आंदोलनातर्फे 'वृक्षदिंडी' काढून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात एका जागो रे भिला याने गाण्याने करण्यात आली. गावात रोपांचे वाटप करून  कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.              या कार्यक्रमात कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य खरबाडे गावित व प्रा.बोराडे सर, नर्मदा बचाओ आंदोलनाच्या मेधाताई पाटकर, लतिका राजपूत, खेमसिंग पावरा, ओरसिंग पटले, सियाराम पाडवी, माजी पंचायत समिती सभापती, शहादा डॉ.सुरेश नाईक, ईश्वर पाटील,फुले-आंबेडकर स्टडी सर्कलचे अनिल कुवर आदी उपस्थित होते.          चिखली पुर्नवसन वसाहतीच्या नागरिकांनी दिंडी काढून वृक्षारोपण कार्यक्रम केला. यावेळी मेधाताई पाटकर म्हणाल्या की,  वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. झाडं, जंगल हा आदिवासींच्या जगण्याचा व त्यांच्या जीवनाचा एक भाग असल्यामुळे त्यांनी जंगलरक्षक दल बनवून आपल्या डाया डायांनी जंगल वाचवलं, सातपुड्यात रस्ते पोचले नव्हते, त्यामुळे बाजार नव्हते त्यावेळी जंगल टिकून होते. ...

भाजप नवीन पदाधिकारी निवड होणार ?

Image
भाजपा तालुका शहर पदाकरिता खांदे पालटची चर्चा            नंदुरबार जिल्हा भाजपाची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आज संध्याकाळी सभा होत असून या सभेच्या माध्यमातून तळोदा तालुका अध्यक्ष पदाची निवड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सेवा कार्य वर्षपुर्ती निमित्त होणाऱ्या या सभेत खासदार रक्षाताई खडसे (प्रदेश सचिव) तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ हिना गावित, आमदार डॉ विजयकुमार गावित, आमदार राजेश पाडवी यांची उपस्थिती राहणार आहे.               दरम्यान मागील काळात नंदुरबार जिल्हा भाजप जिल्हा कार्यकारणी संपूर्णपणे बरखास्त करण्यात आली होती, त्यामुळं सर्वच तालुक्यातील पदे व शहर पद सोबत संघटनेचे इतर पदाबाबत अंतिम निर्णय बाकी होते. त्यात नुकतेच भाजप जिल्हा अध्यक्ष पद विजय चौधरी यांच्या कडेच कायम ठेवण्यात आले आहे. आता परत त्याची नवीन रचना करण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. चर्चेतील नाव -    बळीराम पाडवी विलास कल्याण डामरे, राजेंद्र राजपूत योगेश चौधरी, आनंद सोनार, रणजित चौधरी, शिरीष माळी यांच्या नावाची चर्चा असून ऐनवेळी नवीन नांव...

ई, कंटेन क्रीडा क्षेत्रासाठी उपयुक्त- सुहास पाटील

Image
ई- कंटेंटमुळे शारीरिक शिक्षण प्रभावी ठरेल- सुहास पाटील, सहाय्यक संचालक महाराष्ट्र स्तरावर शारीरिक शिक्षणासाठी तंत्रस्नेही पॅनलचा प्रथमतःच वेगळा प्रयत्न      आरोग्य व शारीरिक शिक्षण हा विषय विद्यार्थ्यांना फिट ठेवण्यासाठी व रोगप्रतिकारक शक्ती विविध खेळांच्या माध्यमातून निर्माण करण्यासाठी महत्वाचा विषय आहे. या विषयाचे अभ्यासक्रम तयार असून काही वर्गांचे पाठ्यपुस्तक तयार आहेत. पण अभ्यासक्रमावर आधारीत ऑडीओ-व्हिजुअल स्वरूपातील तंत्रशुद्ध ई-कंटेंट अद्याप तयार नव्हते. महाराष्ट्र शारीरिक शिक्षण तंत्रस्नेही पॅनलच्या माध्यमातून ऑनलाईन कार्यशाळा घेऊन तंत्रस्नेही शिक्षक तयार होत आहेत. या तंत्रस्नेही शारीरिक शिक्षकांमार्फत तयार होणाऱ्या ई-कंटेंट मुळे शारीरिक शिक्षण प्रभावी ठरणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालयाचे सहाय्यक संचालक सुहास पाटील यांनी केले. या वेळी प्र. संचालक जयप्रकाश दुबळे यांनी शारीरिक शिक्षणाच्या या उपक्रमाचे कौतुक करून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी आयोजित केल...

तीन महिने पासून वेतन पासुन वंचितच

Image
तीन महिन्यांपासून अनुदानितचे कर्मचारी पगारापासून वंचित                     गेल्या तीन महिन्यापासून जिल्ह्यातील तळोदा प्रकल्पातील अनुदानित आश्रम शाळेचे कर्मचारी वेतनापासून वंचित असून त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.            याबाबत सविस्तर वृत्त असे की, नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा प्रकल्प अनुदानित आश्रमशाळेचे कर्मचारी व प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी यांच्या माहे मे महिन्याचा पगार कार्यालयाच्या तांत्रिक अडचणीमुळे होऊ शकलेला नाही. त्यामुळे कर्मचारी वर्ग आर्थिक विवंचनेत सापडला आहे. गृहकर्ज, विमा हप्ते, गाडी हफ्ते आदी भरण्यास अडचणी येत असून आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. मे, जून  व आता जुलै महिना संपण्याच्या मार्गांवर आहे तरी कर्मचाऱ्यांचे वेतन झालेले नाही. पहिले शासनाकडून  अनुदान आलेले नव्हते असे सांगितले जायचे आता अनुदान आले तर कार्यालयातील अखर्चित निधीच्या हिशोब रखडल्यामुळे २ महिन्याचं वेतन थकले आहे.                    ...

तलोद्यात बारा लाख सत्तर हजारांचे जनावरे पकडले एल,सी,बी व तळोदा पोलिसांची संयुक्त कार्यवाही ,,,,,,

Image
तळोद्यात १२ लाख ७० हजारांचे ६६ जनावरे/ गोवंश पकडले तलोद्यात एलसीबी व पोलिसांची संयुक्त कारवाई : तळोदा येथे 22 जुलै रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत कत्तलीसाठी व विक्रीसाठी जाणाऱ्या बारा लाख सत्तर हजार रुपये किमतीचे ६३ गोवंश व ३ गायी धाड टाकून पकडण्यात आले आहेत. पोलिसांनी कारवाई करून एवढ्या मोठ्या संख्येने गायी व बैल पकडण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.         याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की,तळोदा शहरातील खटाई माता मंदिर जवळ असलेल्या मोकळ्या मैदानात झाडाझुडपात गोवंश कत्तलीसाठी व  विक्रीसाठी आणून बांधलेले आहेत.ही महिती  त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत यांच्या पथकाला सांगितली. या पथकाने  २२ जुलै रोजी संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास तळोदा पोलीस स्टेशनला जावून पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे,सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदार,पोलीस उपनिरीक्षक अभ...

स्वातंत्र दिनी ध्वजारोहण नवीन इमारतीच्या आवारात; नगराध्यक्ष अजय परदेशी

Image
तळोदा : नगर पालिकेची वादग्रस्त, रद्द झालेली सर्व साधारण सभा आज    सकाळी 11 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पार पडली असून कोरोना आजाराचा पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणुन सभा पार पडली असून जिल्हातील व्हिडीओ कॉन्फरन्स वर सभा घेण्याचा पालिकेतील सभा बाबत हा पहिला प्रयोग ठरला आहे. कनेक्टिव्हिटीची समस्या व ऑनलाइन सभेचा पूर्वानुभव नसल्याने सभा केवळ 45 मिनिटात उरकण्यात आली..         कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महा- नगरपालिका, नगर परिषदा, नगर पंचायती यांच्या सर्व बैठका व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे घ्यावेत असे आदेश नगर विकास विभागाकडून देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने नगरपालिकेची तहकूब झालेली व समस्त शहरवासीयांचे लक्ष लागून असलेली सर्वसाधारण सभा बुधवारी दुपारी 11 वाजता ऑनलाइन पद्धतीने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली. या सभेत बायो डीझल गॅस व खान्देशी गल्लीत समोरील मुतारी हे विषय स्थगित ठेवण्यात आले आहेत, तर एक बियर बारचा ठराव मंजूर करत सर्व विषयांवर चर्चा होऊन 54 विषय पैकी 52 विषय मंजूर करण्यात आले. सुरुवातीला 1 ते 5 व...

तळोदा पालिका झूम ऐप सभा दोन विषय स्थगित तर इतर विषय मंजूर

Image
स्वातंत्र दिनी ध्वजारोहण नवीन इमारतीच्या आवारात  सर्वसाधारण सभेत 54 पैकी 52 ठराव मंजूर कालीचारण सूर्यवंशी || तळोदा         तळोदा नगर पालिकेची नव्या इमारतीत यावर्षी स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी आज दिली.पालिकेची सर्वसाधारण सभा संपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.                तळोदा नगरपालिकेची तहकूब करण्यात आलेली वादग्रस्त सर्वसाधारण सभा आज सकाळी ११ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे   घेण्यात आलेली ही  पालिकेची ही सर्वसाधारण सभा  जिल्हातील पहिला प्रयोग ठरला आहे.               व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या या व्हर्चुअल सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अजय परदेशी होते.सत्ताधारी भाजपासह विरोधी गटातील सर्व सदस्यांची या सभेला उपस्थिती होती.        अवघ्या 25 मिनिटांत उरकण्यात आलेल्या या सभेत तळोदा प...

सोमावल इथं विविध कार्यक्रम

Image
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सोमावल येथे विविध कार्यक्रम २५० महिलांना साड्या वाटप व १०० वृक्षांची केली लागवड              महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवसानिमित्त आज दि.२२ जुलै बुधवार रोजी तळोदा तालुक्यातील सोमावल येथे आमदार राजेश पाडवी यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.               वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर सोमावल येथील फार्महाऊसवर शहादा-तळोदा विधनासभा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांच्याकडून शासनाच्या अटीशर्तीचे पालन करून सोशल डिस्टसिंग राखत २५० हून अधिक वृध्द, विधवा व निराधार महिलांना साडी व लुगडे यांचे वाटप करण्यात आले. यासोबतच गावात विविध ठिकाणी कडूलिंबाच्या शंभराहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली याप्रसंगी शहादा तळोदा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश दादा पाडवी, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य डॉ शशिकांत वाणी, शहादा येथील सहकारी साखर कारखान्याचे चेअरम...

तळोदा पालिकेची रद्द झालेली वादग्रस्त सभा उद्या व्हिडीओ कॉन्फरसं वर परत होणार,,,,

Image
तळोदा =  कालीचरण सूर्यवंशी तळोदा पालिकेची  वादग्रस्त विषयवरून रद्द झालेली सर्व साधारण सभा पुन्हा होत असून विशेष म्हणजे कोरोना पार्श्वभूमीवर हि सभा व्हिडीओ कॉन्फरसं द्वारे उद्या  होणार आहे,                    तळोदा शहरातील विविध विकास कामाचा निर्णय  घेण्यासाठी  दीड महिन्यांपूर्वी सर्व साधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते मात्र काही विषयावर वाद होऊन तणाव निर्माण होण्याची शकत्या पाहता सभा रद्द करण्यात आली होती, त्यामुळं आता परत हि सभा घेण्यात येत आहे, झूम ऐपवर होणार सभा-- नवीन आदेश काढत सर्व नगरसेवकाना या बाबत अजेंठा पाठविण्यात आला असून सर्वाना झुम ऐप डाऊनलोड करण्यासाठी सूचित करण्यात आले आहे, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महानगरपालिका,नगर परिषदा,नगर पंचायती यांच्या सर्व बैठका आता व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे घ्यावेत असे आदेश नगर विकास विभागाने दिले आहेत.त्यामुळे तळोदा  नगरपालिकेची तहकूब झालेली व समस्त शहरवासीयांचे लक्ष लागून असलेली सर्वसाधारण सभा आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वार...

तलोद्यात वाहन सह लाकूड जप्त एकूण 15 लाखाचा माल जप्त

Image
तलोद्यात 5 लाख किमतीचे खैर लाकूड जप्त  वाहन सह १५ लाखांचा माल जप्त   :   अमोनी वनक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या वनउप तपासणी नाक्यावर संशयीयरित्या लाकूडची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करून वन विभागाने पाच लाखाच्या खैर जातीचे पाच लाखाचे लाकूड व वाहकानासह अंदाजे पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.          याबाबत माहिती माहिती अशी की, खैर जातीचे लाकूड भरलेला ट्रक क्रमांक एम एच 18 ए ए 0115 हे तळोदा येथील वन उपज तपासणी येथून संशयीयरित्या मार्गक्रमण करतांना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आढळून आले.या वाहनाची तपासणी केली असता पांढरकवळा वनविभागाकडील उमरी वनक्षेत्रतून खैर जातीच्या लाकडाच्या मालाची वाहतूक करण्यात येत असल्याचे समोर आले.या लाकुडची वाहतूक करण्यासाठी मौजे कोरेगाव ते अक्कलकुवा   14 जुलै 2020 रोजी दिलेला परवाना 1640770 त्यांच्याकडे आढळू आले.परंतु तो परवाना व वाहतूक केले जाणारे लाकूड हे संशयास्पद असल्याचे वॅन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या लक्षात आले.त्याची अधिक चौकशी करून वाहन चालक व मालक नसीब अली खा...

तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाकडून गुण गौरव

Image
तळोदा          दहावी सीबीएससी पॅटर्न व बारावी एच एस सी परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या तळोदा शहर व तालुक्यातील  विद्यार्थ्यांना तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाकडून अभिनंदन पत्रे देण्यात आली. ही अभिनंदन पत्रे विद्यार्थ्यांना घरपोच देण्यात येऊन त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या अनोख्या शुभेच्छांनी विद्यार्थी भारावले होते व पुढील शैक्षणिक आयुष्यातही शहराचे नाव उज्ज्वल करण्याच्या प्रयत्न करणार असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी विद्यार्थ्यांचे पालकांनी उपक्रमाचे स्वागत केले. पत्रकार संघाचे अध्यक्ष फुंदीलाल माळी , उपाध्यक्ष विकास राणे ,सचिव किरण पाटील ,कोषाध्यक्ष सुशील सुर्यवंशी जेष्ठ पत्रकार  भरत भामरे, व सदस्य उपस्थित होते.

मैत्रीचे वृक्षरोपण

Image
 बडे मियाँ छोटे मिया यांचे एकत्रित वृक्षारोपण,,,,,,,       राजकारणात कोणी कायमचा शत्रू तर कोणीही कायम मित्र नसतो,असे म्हटले जाते. तळोद्यातील  राजकारणाची वाटचाल देखील काहीशी अशीच  राहिलेली मागील काळात  तळोदेकर जनतेला अनुभवास आली आहे. तळोदा नगर पालिकेचा निवडणुकी पासून वैचारिक मतभेद,गैरसमज व   समनव्याचा अभाव यांमुळे एकमेकांपासून काही काळ लांब लांब असणारे महाराष्ट्र भाजपाचे  वजनदार जेष्ठ नेते डॉ.शशिकांत वाणी व तळोदा शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अजयभैया परदेशी हे पुन्हा एकत्रित आल्याचे सुखद चित्र पहायचे मिळले. निमित्त होते ते अजयभैया परदेशी यांच्या वाढदिवसाचे.            अजयभैया परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त तळोदा शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ शशिकांत वाणी यांच्याहस्ते अजय भैया यांनी वृक्षरोपण करून मैत्रीच्या नव्या अध्यायाला सुरुवात केली असल्याचे दिसून आले. तत्पूर्वी मागील वर्षी डॉ शशिकांत वाणी यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा भ्रमणध्वनी वरून परदेशी यानी दिल्याची चर...

तळोदा शहर प्रवेशद्वाराचे श्री संत गुलाम महाराज नामकरण करत आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते लोकार्पण

Image
प्रवेशद्वाराचे लोकार्पण आमदार राजेश पाडवी यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी संत गुलाम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन व फीत कापून प्रवेशद्वाराचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, भाजप तळोदा शहराध्यक्ष योगेश चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र चंद्रसेन पाडवी, प्रेम पाडवी, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष  नागेश पाडवी, तळव्याचे माजी सरपंच नारायण ठाकरे, ग्राम पंचायत सदस्य सुरेश केदार, माजी जि प सदस्य सुनील चव्हाण, शहादा तालुका भाजपाचे अध्यक्ष डॉ किशोर चव्हाण,आमदार राजेश पाडवीचे स्वीय सहाय्यक प्रा विलास डामरे, विरसिंग पाडवी, पालिकेचे आरोग्य निरक्षक अश्विन परदेशी आदींसह पालिकेचे नगरसेवक, नगरसेविका व आप धर्माचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते....   भव्य अश्या प्रवेशद्वाराला संत गुलाम महाराजाचे नाव देण्यात आल्याने आप धर्माच्या अनुयायीनी फटाके फोडून अतिषबाजी केली. व आमदार राजेश पाडवी व लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी यांचे आभार मानले...

तलोद्याचा चार कोटींचा विकास कामाचे उदघाटन

Image
नगरोत्थानअंतर्गत तळोद्यात 4 कोटी 25 लाखांच्या विकास कामांचे भूमिपूजन नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम तळोद्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज नगरपरिषदेतर्फे नगरोत्थान कार्यक्रमाअंतर्गत 4 कोटी 25 लाखांच्या विकास कामांचे भूमिपूजन व उदघाटन शहरातील विविध ठिकाणी करण्यात आले.या विकास कामामुळे शहरात नागरिकांना चांगल्या दर्जच्या  पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत.            नगरोत्थान अभियानांतर्गत तळोदा शहरात विकास कामांना मंजूरी मिळाली होती.त्यात चिनोदा चौफुली ते बिरसा मुंडा चौक रस्ता व दुभाजकाचे (2 कोटी), देशपांडे फोटो स्टीडिओ ते बस स्टॅन्ड पर्यंत रस्ता तयार करणे (75 लाख रुपये), हातोडा नाका ते खर्डी नदी पुला पावेतो गटारी व रस्ते (66 लाख रुपये)  व खिरणी हट्टी रस्ते व गटारी( 12 लाख रुपये) अश्या एकूण 4 कोटी 25 लाख रुपयांच्या विविध विकास  कामांचा समावेश होता. नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त आज या विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन यांच्या हस्ते करण्यात आले.शहादा-तळोदा म...

राजकारणातील ,,,,,,,अजात शत्रू श्री अजय परदेशी

Image
राजकारणातील अजात शत्रू ,,,,, अजय परदेशी राजकारण म्हटलं की त्यात हल्ली प्रगल्भ तरुणांना जेष्ठ लोक सल्ला देतात राजकरणात जाऊ नकोस मात्र त्याला काही अपवाद असतात त्यातल एक व्यक्तिमत्त्व म्हणजे तळोदा शहरात भैया म्हणून प्रसिद्ध असणारे अजय परदेशी आहेत ८० टक्के समाजकारण व  २० टक्के राजकारण करण्यास प्राधान्य देणारे भैया सतत तरुणांचा तसेच जेष्ठ नागरिकांचा गराड्यात दिसतात,          तळोदा शहरात भाजीपाला विक्री करणाऱ्या परदेशी स्व: छबु काका कुटुंबातील एक सर्व साधारण तरुण ते लोकनियुक्त नगराध्यक्ष हा राजकीय प्रवास निश्चितच थक्क करणारा असा आहे. जनसंपर्क हिच खरी ताकद =            अजय परदेशी अगदी सुरुवातीला राजकीय वाटचाली पासून ते नगराध्यक्ष पद पावेतो विराजमान होण्यामागे कुठलं रहस्य असेल तर ते रस्त्यावर व्यवसाय करून उदरनिर्वाह चालविणारा तलोद्यातील गरीब व्यवसायिक असेल अथवा शहरातील मोठा व्यापारी असेल यांच्याशी नाळ जोडून ठेवणारा नेता म्हणजे अजय  भैया सर्व सामान्य नागरिकांचा असणारा दांडगा संपर्क त्यांनी सतत ठेवला आजही त्यांची सकाळ जु...