उद्या भूमी पूजन
तळोदा शहरातील चिनोदा चौफुलीवर स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांच्या पुतळा बसविला जाणार असून विश्व आदिवासी दिनाचे औचित्य पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन केले जाणार आहे.तळोदा शहरातील हा पहिला पुतळा ठरणार असून लवकरच याठिकाणी सहा फुटी पुतळा बसविन्यात येणार आहे.
रविवार सकाळी १० वाजता आमदार राजेश पाडवी,नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमाताई वळवी, माजी क्रीडामंत्री पदमाकर वळवी, नगराध्यक्ष अजय परदेसशी,उपनगराध्यक्षा भागयश्री योगेश चोधरी, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभाताई शिंदे यांच्यासह नगरसेवकांच्या हा उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार आहे.यावेळी प्रतीकात्मक पुतळाचे पूजन करण्यात येणार आहे,
तळोदा शहरातील शहादा रस्ता, चिनोदा रस्ता,नंदुरबार रस्ता, कॉलेज रस्ता अश्या चारही रस्त्यावर विविध ठिकाणी पुतळे बसवुन शोभा वाढविण्यासाठी पुढील काळात नियोजन हाती घेतले जात असून त्याची सुरवात उद्या स्वातंत्र सेनानी बिरसा मुंडा यांच्या पुतळा पूजन पासून केली जात असल्याची माहिती नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी दिली आहे
ग्रेट
ReplyDelete