वाढीव बिल रद्द करा
तळोदा
कोरोना या महामामारीमुळे संकटात सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आता महावितरणाने वाढीव वीज बिलांचा शॉक दिला आहे. तळोदा शहरात गेल्या चार महिन्यात कोणत्याही मिटर चे रिडींग न घेता ग्राहकांना भरमसाट अंदाजे वाढीव बिल पाठवली आहेत.यामुळे या वाढीव वीजबिला संदर्भात तळोदा येथील वीज विद्युत वितरण कंपनी ला आदिवासी युवा शक्ती या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात नागरिकांना आलेले वाढीव वीज बिल विभागून देण्यात यावी अशी मागणी केली आहे. अन्यथा या संदर्भात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मागील चार महिन्याच्या लॉकडाऊन काळात मिटर रिडींग घेतलेले नाही व विजदेयके देखील देण्यात आले नाही आहेत. त्यानंतर सरासरी वीज बिल सर्वांना पाठविण्यात आले आहे. सदर लाईट बिल अव्वाचा सव्वा असून गोरगरीब वर अन्याय होत आहे. तरी लाईट बिल रीडिंग घेवून चार महिन्यात विभागून देण्यात दयावे जेणेकरून ते कमी होईल अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनाची तात्काळ दखल न घेतल्यास या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल इशारा आदिवासी युवा शक्ती तर्फे देण्यात आला आहे. निवेदनावर युवा शक्ती अध्यक्ष विनोद माळी, उपाध्यक्ष विवेक पाडवी, सचिव प्रशांत पाडवी, अर्जुन पाडवी, अभय वळवी, चेतन शर्मा यांसह पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.
तळोदा येथील वीज विद्युत वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता सचिन काळे यांना निवेदन देतांना आदिवासी युवा शक्ती संघटनेचे अध्यक्ष विनोद माळी, उपाध्यक्ष विवेक पाडवी, अभय वळवी, चेतन शर्मा, आदी
Comments
Post a Comment