नंदूरबार वनक्षेत्रात चितळ ला सुखरूपपणे सोडले
चितळला नेसर्गिक अधिवासात सोडले
नंदुरबार येथील हरी ओम नगर येथून चितळ प्रजातीचे (मादी) रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. यापूर्वी काळवीट व नीलगाय हेही रेस्क्यू करण्यात आले होते . सदर कारवाई वनक्षेत्रपाल एम के रघुवंशी वनपाल नांदरखे संजय पाटील, वनपाल युवराज भाबड व माजीसैनिक विशाल मराठे वनमजुर हिम्मत चौरे व आवशा सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला
नंदुरबार वन क्षेत्रात मागील काळात वन्यजीवांच्या वाढीस या भागात वाटण्यात आलेल्या गॅस कनेक्शनमुळे वृक्ष तोड थांबून जंगल वाढीस मदत झाली आहे. सहायक उप वन सरंक्षक गणेश रणदिवे यांचा मार्गदर्शन खाली हे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी पार पडले
Comments
Post a Comment