कोरोना कोविड (१९) विरुद्ध एकत्रित लढू या,,,,

चला स्वातंत्र्यदिना निमित्त कोरोना विरिद्ध एकजूट होऊन लढूया शिस्त पाळू या,,,,,
         तळोदा तालुका मराठी पत्रकार संघा कडून भावनिक आवाहन

तळोदा शहर व तालुक्यातील तमाम जनतेस जाहीर आवाहन वजा विनंती करण्यात येते की कोरोनाच्या प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मागील तीन महिन्यात आपण  जबाबदारी पाळत सर्वानी प्रशासनाला सहकार्य केले आहे , मात्र हा महिना अधिक काळजी घेण्यासारखा आहे
जिल्ह्यात दररोज रुग्ण संख्येच्या आलेख वर चढत आहे. या परिस्थितीत आपण सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे, *विशेषतः किमान दहा वर्षाखालील लहान मुले व 50 वर्षांवरील नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.* कृपया वरील वयोगटाचा मुलामुलींनी आणि नागरिकांनी ऑगस्ट महिन्यात घरातुन बाहेर पडताना काळजी घ्यावी अथवा बाहेर पडूच नये अशी कळकळीची विनंती आम्ही करीत आहोत.
        कोरोनाला हरवायचे असेल तर त्याचे केवळ खालील मार्ग आहेत हे वारंवार सिद्ध झाले आहे. त्यात मास्क वापरणे, वारंवार हात धुणे व एकमेकांपासून शारीरिक अंतर राखणे या त्रिसूत्रीवरच आपण कोरोनावर विजय मिळवू शकतो.
        तळोदा तालुका मराठी पत्रकार संघ आपणांस असेही आवाहन करतो की, आपल्याला जर सर्दी, खोकला, ताप व श्वास घेण्यास अडचण ही लक्षणे असतील तर आपण स्वतःहून तपासणीसाठी पुढे आले पाहिजे.

*आपले आरोग्य हीच आपली ताकद, प्रत्येक व्यक्ती हीच देशाची ताकद.*
*प्रत्येक नागरिक महत्वाचा आहे, कोरोनाला हरवायचे आहे.*

   प्रशासनाला सहकार्य करा

आपले
श्री. फुंदीलाल माळी - अध्यक्ष
श्री. विकास राणे - उपाध्यक्ष
श्री. किरण पाटील - सचिव
श्री. सुशील सुर्यवंशी - कोषाध्यक्ष
आणि सर्व सदस्य तळोदा तालुका मराठी पत्रकार संघ, तळोदा....

🙏🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी