नगरसेवक आपल्या दारी
वैश्विक महामारीमुळे प्रभागात सामाजिक व वयक्तिक रित्या उदभवलेल्या समस्या सोडविण्यासाठी प्रभाग क्रमांक 2 च्या नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय व अनिता परदेशी हे प्रभागात आपल्यादारी पोहचणार आहे. याकरिता नगरसेवक आपल्यादारी हा उपक्रम त्यांनी राबविण्याच्या निर्णय घेतला असून दर महिन्याच्या 5 तारखेला प्रभागात जाऊन समस्यांचे निरसन करणार आहेत. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तळोदा येथील प्रभाग क्रमांक 2 चे नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय व अनिता परदेशी यांनी नवनवीन उपक्रम राबवून जिल्ह्यात प्रयोगशील नगरसेवक म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. निवडणूकीच्या पूर्वीच स्व-खर्चाने लाखों रुपयांचे विकास कामे त्यांनी केले होते. प्रभागातील नागरिकांच्या समस्यां सोडविण्यासाठी ठिकठिकाणी हेल्पलाईन क्रमांकाचे फलक लावनारे ते पहिलेच नगरसेवक आहेत. या नगरसेवकानी महिला सक्षमीकरण व बेटी बचाव बेटी पढावासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. प्रभागात 1 रुपयात कचरा संकलन वाहन उपलब्ध केले. प्रभागातील नळ बसवणे, स्त्री जन्माचे स्वागत करणे, यासोबतच नुकताच त्यांनी स्वखर्चाने प्रभाग क्रमांक दोनच्या नागरिकांसाठी चार फिरते फोल्डिंग स्ट्रीट उपलब्ध करून दिलेत. अश्या विविध समाजपयोगी कामामुळे ते जिल्ह्या भरात परिचित आहेत. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्याकरिता संपूर्ण देशासह राज्यात मागील काही महिन्यांपासून लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे, ह्या लाँकडाऊनच्या काळात शासनाचे निर्देश पाळत, शहरातील प्रभाग क्र. 2 मधील जनतेच्या समस्या जाणून घेण्याकरिता नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय व अनिता परदेशी हे प्रत्यक्ष प्रभागात मदतीसाठी उतरणार आहे. दर महिन्याच्या 5 तारखेला प्रभागातील प्रत्येक विभागात (गल्लीत) जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी नगरसेवक स्वतः उपस्थित राहून समस्यां जाणून घेणार आहेत. प्रभाग क्र.2च्या जनतेच्या अडचणी मांडण्यासाठी कुठे जाण्याची गरज नाही, तर आपले हक्काचे नगरसेवक आपल्यादारी येणार असल्याने जनतेतून समाधान व्यक्त होत आहे..
Comments
Post a Comment