१५ आगस्ट स्वातंत्र्यदिनी पालिकेचे नवीन इमारतीत स्थलांतर
तळोदा पालिकेच्या नूतन इमारतीचा शुभारंभ
तळोदा पालिकेचा नूतन इमारतीचा शुभारंभ सोमवारी साध्या पध्दतीने करण्यात आला.त्यानिमित्त सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते
दीडशे वर्ष्याच्या राजकीय परंपरा असणाऱ्या व खान्देशातील सर्वात जुनी पालिका म्हणून असलेल्या तळोदा पालिकेचे नवीन इमारतीत स्थलांतर होण्याची प्रतिक्षा बऱ्याच वर्ष्यापासून होती.अखेर आज सोमवार दि १७ आगस्ट रोजी पालिकेच्या नूतन इमारतीचा शुभारंभ करण्यात आला. कोरोनाचा पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने सत्यनाराणाची महापूजा करून नूतन वास्तूत पालिकेचे कामकाज सुरु करण्यात आले.
याप्रसंगी नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, मुख्याधिकारी सपना वसावा, बालकल्याण सभापती अंबिका शेंडे, नगरसेविका सुनयना अनुपकुमार उदासी, नगरसेवक हेमलाल मगरे, नगरसेवक भास्कर मराठे,बांधकाम सभापती रामानंद ठाकरे,आदी उपस्थित होते.माजी नगराध्यक्षा विमलबाई सोनवणे,प्रा.विलास डामरे,भाजपा शहराध्यक्ष योगेश चौधरी,डॉ रामराव आघाडे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र राजपूत,गौतम जैन,तहसीलदार पंकज लोखंडे आदींसह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर,माजी नगरसेवक याप्रसंगी उपस्थित राहून नगरपालिकेच्या पदाधिकारी,अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्यात.
सर्वसाधारण सभेच्यावेळी जाहीर केल्याप्रमाणे नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी नूतन पालिकेच्या इमारतीत ध्वजारोहण केले व एका दिवसानंतर लगेच नूतन इमारतीतून पालिकेच्या कामकाजाला सुरुवात केली आहे.
दरम्यान,या शुभारंभ प्रसंगी उपविभागीय अधिकारी अविशांत पंडा यांनी देखिल हजेरी लावत नगराध्यक्ष अजय परदेशी व मुख्याधिकारी सपना वसावा यांना शुभेच्छा दिल्या व नूतन इमारतीची पाहणी केली.
चौकट
आजी-माजी कर्मचारी एका दिवसाचे वेतन देणार
तळोदा नगरपालिकेची भव्य व प्रशस्त इमारत साकारली असून आज तिचा शुभारंभ करण्यात आला.पालिकेच्या अंतर्गत सजावट व सुशोभीकरणासाठी आपली बांधीलकी म्हणून पालिकेचे विद्यमान कार्यरत कर्मचाऱ्यासह माजी कर्मचारी हे एका दिवसाचे वेतन स्वयंस्फूर्तीने देणार असून त्यांनी त्याबाबत कळविले असल्याची माहिती नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. पालिकेच्या नूतन इमारतीचा उदघाटन कार्यक्रम देखिल कोरणा आटोक्यात आल्यानंतर आयोजित केला जाईल.उद्घाटनासाठी महाराष्ट्राचे माजी व विधानसभेचे विरोधी पक्षनेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
फोटो : तळोदा नगरपरिषदेच्या नूतन इमारतीतील सभागृहाची पाहणी करताना उपविभागीय अधिकारी अविशांत पंडा सोबत नगराध्यक्ष अजय परदेशी मुख्याधिकारी सपना वसावा व अन्य नगरसेवक तसेच कर्मचारी..
Comments
Post a Comment