सावधान हातोडा रस्त्यावर बिबटयाचा मुक्तसंचार
प्रतिनिधी तळोदा
तळोदा नंदुरबार रस्त्यावर बायो इंधन पंप समोरील शेताच्या रस्त्यावर सकाळी सात वाजेच्या सुमारास बिबटया च्या डरकाळ्या सुरू होत्या हा आवाज ऐकताच संदीप मराठे यांचा शेतातील जागल्या ने शेत मालकास फोन लावला, दोन दिवस पूर्वी याच बायो पंप शेजारी असणाऱ्या एक हॉटेल मधील एक पाळीव कुत्रा देखील या बिबट ने फस्त केला आहे,
तळोदा नंदुरबार रस्त्यावर वाहन सतत सुरु असतात, या भागात एक नवीन वसाहत देखील असल्याने काळजी वाढली आहे,
वॉकिंग करणारे अनभीज्ञ -
तळोदा नंदुरबार रस्त्यावर दररोज सकाळी क संध्याकाळी फिरणारे मोठ्या संख्येने जात असतात, त्यामुळे त्यांचा हि जीवास धोका निर्माण झाला आहे,
विशेषतः पहाटे पांच वाजता देखील काही तरुण व जेष्ठ नागरिक तसेच महिला नियमित फिरण्यासाठी जातात पहाटे इथं पुर्ण अंधार असतो त्यामुळे हल्ला होण्याची शकत्या नाकारता येत नाही
दरम्यान सदर क्षेत्र हे गुजरात महाराष्ट्र राज्याच्या हद्दीवर असल्याने तक्रार कोनत्या वन विभाग कडे करावी असा प्रश्न परिसरातील शेतकरी बांधवांना पडला आहे,
तळोदा शहर लगत असणाऱ्या शेत शिवारात व तालुक्यात बिबटया ने धुमाकूळ घातला असून या बिबटया ची संख्या मागील काळात वाढली आहे,
Comments
Post a Comment