आता तळोद्यात संकलन व कोविड सेंटर देखील उपलब्ध
सलसाडी आश्रमशाळेत कोविड रुग्णालय कार्यान्वित
तळोदा तालुक्यातील सलसाडी येथिल आश्रमशाळेच्या वसतिगृहाच्या इमारतीत कोविड रुग्णालय कार्यान्वित करण्यात असून आमलाड येथिल विलीगीकरण कक्षातसंशयित रुग्णांच्या घशातील स्वॉबचे नमुने संकलित करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
तळोदा शहरासह जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या मागील महिनाभरासून वाढतच आहे.या सर्व रुग्णांना नंदूरबार येथील कोविड रुग्णालयात उपचार करण्यात येतात.मात्र कोरोणाग्रस्तांची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता तळोदा तालुक्यात कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या.कोविड रुग्णालयासाठी प्रशासनाकडून सलसाडी येथिल आश्रमशाळेची पाहणी केली होती.तेथिल वसतिगृहाच्या इमारती "कोविड रुग्णालय' उभारण्यात आले असून आज जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून त्याचे उद्घाटन करण्यात आले.
या कोविड रुग्णालयात ५० खाटांची क्षमता असून कोविड पॉसिटीव्ह लक्षणे असलेल्या रुग्णांना भरती करण्यात येऊन त्यांच्यावर उपचार केले जाणार आहे.या रुग्णालयात रुग्णांना अद्यावत वैद्यकीय सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
कोव्हीड केअर सेंटरसाठी (सीसीसी) उभारणीसाठी प्रांताधिकारी अविशांत पंडा, तहसीलदार पंकज लोखंडे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण यांनी पुढाकार घेत परिश्रम घेतले.त्यांच्या पुढाकार व प्रयत्नातून हे सेंटर उभारले गेले आहे.तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर बारकाईने लक्ष त्यांना योग्य व अत्यावश्यक ते उपचार केले जाणार आहेत.
या रुग्णालयामुळे तळोदा तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागासह धडगाव तालुक्यातील रुग्णांना तात्काळ वैद्यकीय सोयीसुविधा मिळण्यास मदत होणार आहे.
स्वॉब संकलन केंद्र सुरू
शहरापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या आमलाड येथिल आदिवासी विकास विभागाच्या मुलांच्या इमारतीत असलेल्या विलीगिकरण कक्षाच्या शेजारी स्वॉब संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे संशयित रुग्णांणा घशातील स्वॉबचे नमुने देण्यासाठी नंदूरबार येथे जाण्याची गरज भासणार नाही.त्यामुळे संशयित रुगांना प्रवास व इतर बाबी टाळल्या जाणार आहेत.
Comments
Post a Comment