भाजप युवा मोर्चा चे निवेदन
धुळे येथे विद्यार्थी परिषदेच्या आंदोलक विद्यार्थ्यांना ज्या अमानुषपणे पालकमंत्री व शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांच्या समोर मारहाण करण्यात आली. लोकशाहीमध्ये संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याची मुभा असताना हे महाराष्ट्रातील सरकार विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना अमानुष मारहाण करत आहे. महाराष्ट्रातील सरकार हे नक्की कोणाचे मुघोलांचे की ब्रिटिशांचे अशी म्हणायचे वेळ आता आलेली आहे. विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानूष मारहाणीचा निषेध व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री विक्रांत पाटील साहेब व जिल्हाध्यक्ष हर्षल भाऊ पाटील यांच्या सूचनेप्रमाणे *आज दिनांक २७ ऑगस्ट रोजी* मा.तहसीलदार ह्यांना निवेदन देण्यात आले.हया प्रसंगी उपस्थित पराग राणे मा.तालुका उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा ,चेतन गोसावी,जितेंद्र लोहार,कैलास माळी,उदय गोसावी,हिमांशू सूर्यवंशी, हर्षल गोसावी,कुणाल माळी आदि उपस्थित होते.
Comments
Post a Comment