तळोदा शहराला जोडणाऱ्या खड्डेमय रस्त्यांसाठी गुजरात महाराष्ट्रात स्पर्धा कुठले खड्डे जास्त ?

 गुजरात हद्दीतील हातोडा नंदुरबार रस्त्यांचे तीन तेरा तेरा तर  अंकलेश्वर बऱ्हानपूर  मार्गावर  परत येरे माझा मागल्या

 तळोदा अक्कलकुवा रस्ताची दूरअवस्था  तर  तळोदा नंदुरबार रस्ताची वाळू वाहतूक मूळ पूर्णतः चाळण झाली आहे,
 तळोदा  ते  डेडीयापाडा अंकलेश्वर- बऱ्हाणपूर   म्हणजेच प्रस्तावित शेवाळी  महामार्ग  रस्ताचपूर्ण खड्डेमय झाला असून तळोदा ते अक्कलकुवा अतिशय कमी अंतर असूनही एक ते दीड तास लागत आहे,
तर  तळोदा नंदुरबार रस्त्यावर हातोडा पासून पुढे  वाळू वाहतूक मूळ पूर्ण पणे डांबर ची चाळण झाली असुन नंदुरबार अवघ्या काही मिनटं चे अंतर आता तास भर लागतो, 
त्यामुळ एकूणच तळोदा शहराला जोडणारे सर्व शहादा रस्ता काही प्रमाणात अपवाद वगळता  अवघड झालं आहे , वैद्यकीय सेवा पुरवत असतांना या मूळ अनेकांचा जीव उपजिल्हा रुग्णालय पावेतो पोहचे पावेतो जाण्याची शकत्या आहे,


 अक्कलकुवा येथील भाजपचे जेष्ठ नेते नागेश पाडवी यांनी आज अशीच एक छबी कैद करून फेसबुकवर टाकून आपली नाराजी मार्मिकपणे व्यक्त केली आहे

 शेवाळी नेत्रंग या महामार्गावरील तळोदा वाण्याविहीर,  अक्कलकुवा, खापर,डोडवा गुजरात हद्द जागोजागी असलेल्या मोठमोठे चढउताराचे जीव घेणे खड्ड्यामुळे त्यात पावसा मूळ तर अतीशय विदारक स्थिती झाली आहे,
 वाहनधारकांना व प्रवाशांना संताप निर्माण करीत धोकेदायक होवुन अपघातास कारणीभूत ठरत असताना या महामार्गाची अशी अवस्था अधिकच वाईट होवुन वाहनधारकांसह प्रवाशांना सुखरूप घरी पोहचु किंवा नाही याची मोठी चिंता व भिती या दरम्यान महामार्गावर प्रवास करताना निर्माण झाली असताना दुरुस्ती साठी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत   आहेत,

 शेवाळी नेत्रंग या महामार्गावरील तळोदा सोमावल,शिर्वेफाटा,मोदलपाडा, वाण्याविहीर, राजमोई फाटा,मोलगी नाका,अककलकुवा, सोरापाडा खापर,पेचरीदेव, नवापाडा,ते डोडवा गुजरात हद्द दरम्यान या महामार्गावर पावसाळ्याच्या पुर्वीपासुन जागोजागी मोठ मोठे खड्डे पडुन महामार्ग वाहनधारकांना त्रासदायक होवुन संताप निर्माण करीत धोकेदायक झाला असताना व त्यात पावसाळ्यापासुन तर या महामार्गाची अशी अवस्था निर्माण झाली आहे की, वाहनधारक व प्रवाशांना असे वाटते सुखरूप घरी पोहचु किंवा नाही याची मोठी चिंता व भिती या दरम्यान महामार्गावर प्रवास करताना निर्माण झाली आहे  या महामार्गावर जागोजागी मोठमोठे चढउताराचे खड्डे चुकवताना अपघात होवुन जिवितहानीच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे,
    तळोदा नंदुरबार रस्त्यावरील हातोडा  पुलाचा पुढे गुजरात हद्दीत असणाऱ्या रस्त्यावर सततच्या वाळू वाहतूक मूळ चार चाकी वाहनात काही मिनिटात पोहचणारे वाहन तब्बल तासभर लागत आहे, 
  तापी नदीचा गुजरात हद्दीमधील पात्रात गुजरात राज्य प्रशासनच्या अधिकृत परवाना घेऊन भर पावसात हि वाहतूक सुरू आहे,
 मागील तीन चार दिवसां पासून हतनूर धरणाचे दरवाजे उघडल्याने  तापी नदीच्या पाण्यात वाढ झाली आहे तरीही भर पावसात वाळू उपसा सुरूच आहे, गुजरात प्रशासन मात्र या कडे दुर्लक्ष करत असल्याची चर्चा आहे, एकूणच  हातोडा  मार्गे न जाता पूर्वीचा प्रकशा मार्गे आता चार चाकी खाजगी वाहने जात आहेत,
 

महाराष्ट्रात पण तिचं स्थिती -
 शेवाळी नेत्रंग महामार्गावरील तळोदा वाण्याविहीर अककलकुवा खापर ते डोडवा गुजरात हद्द दरम्यान या महामार्गावरील देखील खड्ड्याचे साम्राज्य   सालाबादप्रमाणे वाढले असून  दरवर्षीप्रमाणे दुरूस्ती व  चौपदरी कामाला सुरुवात होईल लवकरच  असे ठेवणीतील उत्तर मिळेल , परत दुरुस्तीचा नावाखाली माती मुरूम ओतून लाखो करोडो रुपयांचे बिल काढले जाईल, आणि दरवर्षीप्रमाणे असेच आम्ही डाबक्यातील खड्डे तुडवत प्रवास सुरू ठेवू काहीही न बोलता,



निकृष्ट दर्जाची दुरुस्ती काम -
काही दिवसांपूर्वी लाखो रुपये  खर्च करून रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती.मात्र निकृष्ट दर्जाचे कामामुळे काही दिवसांतच रस्त्याची वाट लागली. रस्त्याची दुरुस्ती चे काम खरंच नागरिकांच्या सोयीसाठी केले जाते,की ठेकेदार व भ्रष्ट यंत्रणेचे उखक पांढरे करण्यासाठी केली जाते, हे न समजणारे कोडे आहे.रस्त्याची दुरुस्ती करून किमान दोन महिने उलटत नाही,तोच रस्ताची पुन्हा दुरवस्था हो असल्याची स्थिती आहे

कालीचरण सुर्यवंशी✒️

Comments

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी