निकृष्ट काम मुळे अपघात

तळोदा येथून किराणा सामान धवळीविहीर या आपल्या गावी घेऊन जाणारा मोटारसायकलस्वार तुटलेल्या पुलावर तोल गेल्याने खाली कोसळल्याची घटना आज सोमवारी घडली. त्यात मागे बसलेल्या लहान मुलाला देखील जबर मार लागला आहे. तुटलेला पुल व निकृष्ट कामामुळे  वाहून गेलेला भरावामुळेच अश्या घटना वारंवार घडत असल्याने धवळीविहीर ग्रामस्थांना कसरत करूनच रस्ता पार करावा लागत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे येथील पुलाचे बांधकाम करून रस्ता सुस्थितीत येण्याची अपेक्षा आहे.
        तळोदा धवळीविहीर रस्त्यावर हलालपूर गावाच्या पुढे रस्त्यावरील पुलाला मोठे भगदाड पडून भराव पूर्णपणे वाहून गेला आहे. गावकऱ्यांनी जेमतेम तयार केलेल्या पर्यायी  रस्त्यावरून कसरत करत वाहन चालवावे लागते. अशातच सोमवारी रक्षाबंधन असल्याने प्रकाश बारक्‍या पावरा हे आपल्या मोटार सायकलने तळोदा येथून किराणा सामान घेऊन आपल्या लहान मुलासोबत परत येत होते. भराव वाहून गेल्याने रस्ता नसल्यासारखी परिस्थिती असल्याने बाजूला असलेल्या निमुळत्या रस्त्यावरून मोटारसायकल काढताना तोल जाऊन ते पुलाचा खड्ड्यात मोटार सायकलसह खाली पडले. यामुळे त्यांना व लहान मुलाला जबर मुका मार लागला आहे. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांनी जेमतेम त्यांना तिथून बाहेर काढले. यात मोटारसायकलचेही मोठे नुकसान झाले आहे.
      पुलाचे निकृष्ट काम व वाहून जाणारा भराव दरवर्षी डोकेदुखी बनून परिसरातील नागरिकांना त्रासाचे ठरत आले आहे. त्यामुळे या भागात रहिवाशांना आपले वाहन काढणे जिकिरीचे जाते. मात्र संबंधित विभाग दर पावसाळ्याच्या आधी थातूरमातूर कारवाई करते. मात्र पहिल्याच पावसात भराव वाहून जात असल्याने धवळीविहीर गावातील नागरिकांना त्रासाचे ठरत आहे .  मोटरसायकलस्वार व लहान मुलगा मोटारसायकलसह खाली पडल्याने तेथील परिस्थिती किती बिकट असावी याची प्रचिती आली आहे. त्यामुळे येथील पुलाचे नवीन बांधकाम करावे अशी मागणी होत आहे.

Comments

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी