तळोद्यातील बाळ गोपाळांचे राष्ट्रप्रेम घरीच स्वयंम प्रेरणेतून केलं ध्वजारोहण

तलोद्यात  बाळ  गोपाळांचे ध्वजारोहन 

 शाळा म्हटली की स्वातंत्र्य दिनाचा उत्साह  काही दिवस अगोदर पासूनच नवीन स्वछ धुतलेला गणवेश कपडे, बूट, खिशाला लावण्यासाठी  ध्वजाची छोटी प्रतिकृती पिन  सह तयार शाळेतील विद्यार्थी दिसून येतात मात्र यंदा  कोरोना कोविड १९ मूळ सर्वच कस थांबल्या थांबल्या सारख  वाटत  आहे ,  देशाचा सर्वोच्च मानाचा दिवस म्हणून या कडे पाहिले जाते म्हणून प्रत्येक शाळेत भर पावसात सर्वत्र स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला मात्र मुलांचा किलबिलाट शाळेत नसल्याने कुठंतरी या चिमुकल्या पाहुण्यांची अनुपस्थित  जाणवली  इतकंच काय तर विद्यार्थी शाळेतील जीव असतो याची जाणीव देखील सर्वत्र झाली ,
यंदा आपल्याला ध्वजारोहण करता येणार नाही शाळेत चॉकलेट व खाऊ भेटणार नाही  यंदा नवे व स्वच्छ कपडे व बूट घालून राष्ट्रगीताने भारावून जाता येणार नाही  हे  नसलं म्हणून  काय झालं , इथं नाराज न होता आपण  काहीतरी केलं पाहिजे म्हणून  स्वतः आपल्या घरीच  ध्वज बनवणे तो रंगवणे उभा करणे त्याचा पुढे रांगोळ्या काढून फुलं टाकणे अगदी साध्या सोप्या पद्धतीने  करण्याचे काम तळोद्यातील गुंजन राणे  मेघा विकासदीप राणे, गुंजन पराग राणे ,माही पराग राणे,
 कोमल अशोक डोईफोडे, व मानसी अशोक डोईफोडे यांनी काकाशेठ गल्लीच्या मागील बाजूस असणाऱ्या पत्रकार विकास राणे यांच्या निवासस्थान समोर ध्वजारोहण केलं या वेळी हा क्लीक काढायला विकास राणे यांना राहवलं नाही,,,

 स्वातंत्र भारताचा ७३ वा   वाढदिवस साजरा करून ७४ कडे वळत असतांना कोरोना काळातील बाळ  गोपाळांचे  राष्ट्रप्रेम हे कितीही संकट आली तरी टिकून आहे आणि राहील,,,,,
हि नवीन येणारी पिढी ज्वाजल्य देश अभिमान बाळगून आहे याचाच काय तो आजचा आनंद
फोटो -  विकासदिप राणे पत्रकार

Comments

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी