तळोद्यात कोरोना योद्धांचा सत्कार
महात्मा फुले सामाजिक लोक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आज शनिवारी (ता. १) रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त शहरातील कोरोना योद्धाचा सन्मान करण्यासाठी येथील बालाजी वाड्यात कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. शशिकांत वाणी, नगराध्यक्ष अजय परदेशी, तालुकाध्यक्ष विलास डामरे, शहराध्यक्ष योगेश चौधरी, सिनेट सदस्य दिनेश खरात, जिल्हा उपाध्यक्ष आनंद सोनार, नगरसेवक अमोनोद्दीन शेख, हेमलाल मगरे, विश्वनाथ कलाल, रसिकभाई वाणी, पत्रकार संघाचे अध्यक्ष फुंदीलाल माळी, अक्रम पिंजारी आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महात्मा फुले सामाजिक लोक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले....
Comments
Post a Comment