गुजरात हद्दीतील रस्ता दुरुस्त करण्याची मागणी

 तळोदा :--

धडगाव व तळोदा येथील नागरिकांना नंदुरबार येथे जात असतांना गुजरात हद्दीतील सज्जीपुर ते वाका चार रस्ता पर्यंत रस्त्यातील खड्ड्या मुळे होणाऱ्या त्रासा बद्दल युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप परदेशी यांनी गुजरात राज्यातील निझर विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनीलभाई गामित यांना निवेदन देऊन लवकरात लवकर दुरुस्त व्हावा अशी मागणी केली आहे

तळोदा व धडगाव तालुक्यासाठी जिव्हाळ्याच्या हातोडा येथील तापी नदीवरील पूल झाल्यामुळे जिल्ह्याचे अंतर निम्म्याने कमी झाले आहे परंतु हा मार्ग दोन राज्यात वाटला गेल्यामुळे तळोदा ते नंदुरबार अंतर फक्त वीस किलोमीटरचे असून सज्जीपुर ते वाका चाररस्ता हे चार ते पाच किलोमीटरचे अंतर गुजरात राज्यात येत असून या मार्गात रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ता हे वाहनधारकांना समजत नसून दररोज लहान-मोठे अपघात होत असतात व तापी नदी मधून रेतू घेऊन जाणारे अवजड वाहन जास्त प्रमाणात ये जा करत असल्यामुळे या रस्त्याच्या बारा वाजवण्यात यांच्या मोठा सिंहाचा वाटा आहे हा रस्ता लवकर दुरूस्त व्हावा ह्या साठी युवक काँग्रेस कडून निवेदन देण्यात आले आहे निवेदन दिले त्या निवेदनावर सुनीलभाई गामित यांनी आश्वासन देऊन लवकरच विचारात घेऊन संबंधित अधिकारी यांना बोलावून पावसाळा अभावी तात्पुरता स्वरूपात समस्या सोडवण्याचे आदेश दिले व पावसाळ्या नंतर कायमस्वरूपी
अडचणी मार्गी लावू अशी ग्वाही दिली

Comments

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी