तलोद्यात समाधानकारक पाऊस मात्र रांझनी सह काही भागात नुकसान
तळोदा तालुक्यात ७ ऑगष्ट रोजी झालेला दमदार पाऊसासह सुसाट वाऱ्यामुळे ऊस, ज्वारी व मक्याचे आडवे पडल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे हाता तोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी अशी मागणी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे
तळोदा तालुक्यात गेल्या आठवड्या भरापासून जोरदार पाऊस होत आहे पावसाबरोबर सुसाट वारा सुरू होत असल्याने ऊस, ज्वारी, मका जमिनी लगत आडवे पडले आहे त्यामुळे मका व ज्वारी पिकांचे सातपुड्याच्या लगत भागात नुकसान चित्र दिसत आहे सातपुड्याच्या पायथ्या लगत असलेल्या गावासह मोकसमाळ येथील किशोर राज्या पाडवी यांच्या शेतातील ८७ आर क्षेत्रासह इतरत्र शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले आहे याकडे संबंधित विभाग लक्ष घालावे नुकसान ग्रस्त क्षेत्रांचे पंचनामे करावे व शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे
Comments
Post a Comment