आमलाड ला शेड उपलब्द करा,,,, मागणी
संततधार पाऊस सुरू असल्यामुळे आमलाड येथे सँब नमुने घेण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत आहे आहे तरी आमलाड तपासणी केंद्र साठी शेड उपलब्ध होण्या बाबत भाजप उपजिल्हाध्यक्ष आनंद सोनार यांनी तळोदा तहसीलदार पंकज लोखंडे यांना निवेदन दिले
तळोदा शहरात प्रशासन व आरोग्य विभाग अतीशय परीश्रम घेत असून तळोदा येथेच संशयित रुग्णांचे नमुने घेऊन सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णास सलसाडी येथे ठेवले जातं आहे, हा निर्णय तळोदा साठी योग्य असला तरी सध्या पाऊस सतंतधार सुरू असून आमलाड येथे सँब नमुने घेण्यासाठी रांगेत उभे राहताना भर पावसात उभे राहावे लागत आहे आपणास विंनती आहे की या ठिकाणी तात्पुरता स्वरुपात शेड उभे करून गैरसोय दूर करावी अन्यथा या ठिकाणी संशयित असणाऱ्या रुग्णाला पावसात भिजून अधिकच त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण की इथं जेष्ठ नागरिक व महिला देखील येत असतात तरी विंनती अर्ज ची दखल घेण्यात यावी निवेदनावर आनंद सोनार शिरीषकुमार माळी व योगेश चव्हाण यांच्या सह्या आहेत
Comments
Post a Comment