पर्युषण पर्वावर तळोदा सफाई कर्मचारी ना रेनकोट वाटप
तळोदा
तळोदा नगरपालिकेच्या 50 सफाई कर्मचाऱ्यांना तळोदा श्री जैन संघ कडून रेनकोट चे वाटप करण्यात आले. पावसाळ्याच्या दिवसात सफाई कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागतो. कोरोना काळात अविरतपणे सफाई कर्मचारी शहराची सफाई करण्याचे काम करत आहेत. त्यामुळे जैन धर्मातील पवित्र पर्युषण पर्वाचा पार्श्वभूमीवर तळोदा जैन समाजाने सफाई कर्मचाऱ्यांना हे रेनकोट उपलब्ध करून दिले आहेत.
या रेनकोटचे वाटप नगराध्यक्ष अजय परदेशी, भाजपाचे शहराध्यक्ष योगेश चौधरी, नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी, जैन श्री संघाचे गौतम जैन, धनराज पारेख, चंपालाल जैन , हंसराज भंडारी, पियुष कोचर ,महाविर जैन, राहुल सेठिया , किर्तिकुमार शहा, शांतीलाल जैन यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी जैन श्री संघ समाजाच्या या उपक्रमाचे स्वागत करून संघाचे कौतुक केले. कार्यक्रमात पालिकेचे प्रभारी आरोग्य निरीक्षक अश्विन परदेशी व सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment