गुणवंत विदयार्थी चा तलोद्यात सत्कार
तळोदा येथे 10 वी व 12 वीत
प्रथम श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
तळोदा येथे सातपुडा पावरा समाज संघ च्या वतीने शैक्षणिक वर्ष 2019 20 या वर्षात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विध्यार्थी-विद्यार्थ्यांनी यांचे सत्कार समारंभ पार पाळण्यात आला . यावेळी उद्घाटक म्हणून श्री वेस्ता पावरा -माजी जिल्हा परिषद सदस्य, प्रमुख पाहुणे म्हणून श्री दाज्या पावरा -पंचायत समिती सदस्य, मार्गदर्शक म्हणून नुकत्याच दुर्गाताई पावरा- पोलीस निरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण, श्री मुकेश कापुरे अप्पा-ग्रामविकास अधिकारी व संघाचे जिल्हाध्यक्ष श्री मणीलाल नावडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करूनकरण्यात आले.
या छोटेखानी कार्यक्रमात बोलताना मार्गदर्शक श्री कापुरे यांनी आपल्या मनोगतात बोलतांना 10वी 12वी नंतर काय? , सद्या यापुढे येणाऱ्या आपल्या शिक्षणाच्या संधी , प्रत्येक कला, वाणिज्य, व विज्ञान या शाखेतील विध्यार्थ्यांना पुढील उपलब्ध संधी, तसेच विध्यार्थ्यांना अवगत अशा सोप्या भाषेत त्यांच्या पुडील आव्हाने या विषयावर सुंदर अशी मांडणी केली. कोणत्याही गोष्टीचा किळस न करता हसत खेळत अभ्यास करा, वाचनावर भर द्या व आपले उज्ज्वल आयुष्याच्या संधी ह्या दरवाजा थोकावताहेत पण त्या संधी आपण पारखून बघा असे भावनिक मनोगत व्यक्त केले. पोलीस निरीक्षक दुर्गाताई पावरा यांनी आपल्या मनोगतात आपण कुठेही कमी न पडता प्रत्येक गोष्टीत हिरहिरीने भाग घेतला पाहिजे, कला शाळेतील विषय ज्या विध्यार्थ्यांना आवड असेल त्यांनी त्याच्यात भर घालावी व स्पर्धात्मक युगात आपल्या सर्व आदिवासी विध्यार्थी बांधवांनी पुढे सरसावले पाहिजे तसेच स्पर्धा परीक्षा ह्या खूप किचकट नसून त्या परीक्षांना अभ्यास करून सामोरे असे असे विध्यार्थ्यांना आवाहन केले.
प्रमुख पाहुणे दाज्या पावरा यांनी आपल्या मनोगतात विध्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार अभ्यासावर भर देऊन अभ्यास करा, प्राथमिक-माध्यमिक शिक्षण हे आईवडील व शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली घेत असतो परंतु यापुढील शिक्षक हे आपल्या स्वेच्छेने असते . ऐकावे जनाचे व करावे मनाचे या उक्तीप्रमाणे सांगणारे भरपुर असतात पण पुढील शिक्षण हे तुमच्या आवाक्यात निवडायचे आहे हे निवडत असताना सदर मार्ग हा आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा असतो त्यामुळे उद्या विचार करण्यापेक्षा आतापासूनच योग्य मार्गाची निवड करा असे म्हटले. ह्या प्रकारची छोटी मोठी कार्यक्रम स्वरूपात भरपूर भेटतील परंतु त्यातून योग्य तो सारांश काळा.
या कार्यक्रमात संघटनेचे पदाधिकारी जिल्हा सरचिटणीस जालंमसिंग पावरा बळीराम पावरा, किसन अप्पा, ललिता पावरा, डॉ पावरा, निलेश पावरा, मिनेश पावरा,रतन पावरा व विध्यार्थी व पालक उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वी साठी साठी काही समाज संघटन कार्यकर्ते ही उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार जिल्हाध्यक्ष मणीलाल नावडे सरांनी केले
Comments
Post a Comment