शेठ के,डी, हायस्कुल ध्वजारोहण संपन्न
तळोदा - तळोदा येथील पी ई सोसायटी संचलित शेठ के डी हायस्कूल येथे संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण बबनराव माळी यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विद्यार्थ्यांच्या अनुपस्थित सामाजिक अंतर ठेवून साजरा करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. त्याअनुषंगाने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण बबनराव माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक अरविंद मगरे, विश्वनाथ कलाल, नगरसेवक संजय माळी, युवा काँग्रेस उपाध्यक्ष संदीप परदेशी, शहादा तळोदा विधानसभाचे समनव्यक योगेश मराठे, माजी नगरसेवक पंकज राणे, सेवा निवृत्त उप मुख्याध्यापक आय.डी.चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक जे.एल सूर्यवंशी. यांच्या मार्गदर्शनात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment