कार्यकर्ते फक्ट आंदोलन साठी का ?
निष्ठावंतांना डावलून उपऱ्यांचा वरचष्मा
भाजपातील स्थिती
कालीचरण सूर्यवंशी
भाजपा नुकत्याच निवड करण्यात आलेल्या तळोदा तालुका कार्यकारणी निष्ठावंत कार्यकर्ते ना डावलून बाहेरून पक्षात आलेल्याना पद दिल गेल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.नुकत्याच झालेल्या भाजपाचा दूध दर वाढ आंदोलनाच्या वेळी कार्यकर्यांनी फिरवलेली पाठ हे त्याचे द्योतक असल्याचे सांगितले जात आहे.
मागील सात वर्ष्यात गल्लीपासून दिल्ली पर्यत भाजपची लाट असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे अश्या अनेक पक्षांतील नेत्यांनी भजापाचे कमळ हाती घेतले. त्यातच केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असल्याने भाजपातील सुरू असलेली इनकमिंग मोठ्या प्रमाणात वाढलेली अनुवायला आहे.नंदूरबार जिल्हाही त्याला अपवाद राहिलेला नाही.
नंदूरबार जिल्हात देखिल भाजपात दुसऱ्या पक्षातून येणाऱ्यांची मोठी भाऊ गर्दी झालेली पहायला झाली.या भाऊ गर्दीमुळे भाजपातील निष्ठावंतांची मोठी घुसमट झालेली आहे.नाथाभाऊ खडसे हे त्याचे सर्वांत बोलके उदाहरण होते.जिल्हातही प्रतिकूल परिस्थितीत भाजपाचे अस्तिव टिकवून पक्ष जीवंत ठेवणाऱ्या नेत्यांच्या वाट्याला देखिल नाथाभाऊचा अनुभवाला सामोरे जावे लागत आहे.
एकूणच नंदूरबार जिल्ह्याचा भाजपचा विचार केला हातावर मोजता येतील एव्हढेच कार्यकर्ते असल्याचे दिसून येते.बाकी सर्व बाहेरून आल्याचा समावेश आहे.पूर्वाश्रमीच्या पक्षातील नेते आपल्या कार्यकर्त्यासह भाजपचा गोटात दाखल झाल्याने बाहेरून आलेले कार्यकर्ते हे आज भाजपाचे सक्रिय आले आहेत.परंतू निष्ठावंत कार्यकर्ते दुर्लक्षित झाले आहेत.
युवा कार्यकर्ते वर अन्याय ?
नुकत्याच झालेल्या भाजपच्या जिल्हा कार्यकारणीत भाजपाचे मूळ एकनिष्ठ कार्यकर्ते किती ? हा देखील संशोधनाचा भाग आहे.तळोदा तालुका कार्यकारणीत देखिल निष्ठावंत भाजपाचा कार्यकर्त्यांना डावलण्यात आले असल्याची चर्चा आहे.गेल्या काही वर्षांत पक्षासाठी राबणाऱ्या व पक्ष संघटन वाढवणाऱ्या कार्यकर्त्यांना मनाची पदे दिली गेली नसून बाहेरून येणाऱ्या काही जणांची नाराजी ओढवू नये,निष्ठावंतांना नाराज केले गेले.याचे परिणाम दिसायला सुरुवात झाली असून दूध आंदोलनाकडे अनेक कार्यकर्त्यांनी त्याचे संकेत दिले आहेत.
आगामी काळात भाजपात या मुद्द्यामुळे धुसफूस वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपासाठी ती डोकेदुखी ठरणार हें मात्र नक्की....
जि.प निवडणुकीत भाजपा च्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात उमेदवारी करणार्या व ज्यांनी अजून पक्ष प्रवेश केला नसताना तालुक्याचे मोठं पद देण्यात आले ,
जुने नवे युद्ध-
मागील काळात भाजप विरिद्ध विखारी गरळ ओकनाऱ्या दुसऱ्या पक्षातुन आयात झालेल्या व्यक्तीना पद बहाल करण्यात आले असून सत्तेत भाजप नसतांना ज्यांनी पक्ष संघटन साठी अपमान सहन केला,
प्रामाणिक पणाची किंमत शून्य -
मागील काळात अनेक निवडणुकी झाल्या यात तळोदा पालिका, जी, प, विधानसभा , लोकसभा निवडणुकीत
अनेकांवर अन्याय झाला पण सत्ता असल्याने जुने कार्यकर्ते अक्षरशः ना वाळीत टाकण्यात आले सत्ताधारी पक्ष असल्याने कोणी कार्यकर्ते ने विरोधात
आवाज देखील काढला नाही,
हे असेच सुरू राहणार का ?
अश्या कार्यकर्ते तर मागील काळात घडलेल्या घडामोडी मूळ तर अवाक झाले, ज्यांनी आयुष्य भर विरोध पत्करला त्यांना नमस्कार करण्याची वेळ काहींना आली आहे,
पंधरा वीस वर्षे पूर्वी कार्यकर्ते स्वतः कोणतेही अपेक्षा न ठेवता शंभरी गाठत होते तिथं आता पदअधिकारिच दिसत आहेत, कार्यकर्ते गायब आहेत, त्यामुळे कार्यकर्ते फक्ट आंदोलन व उपक्रमात साठी आहेत का ? असा प्रश्न आता एकनिष्ठ कार्यकर्ते विचारत आहेत , पक्षात कुठंतरी लॉबिंग सुरू झाली का ? याची चर्चा आहे, भाजपची पक्ष संघटन व शिस्त याची पुसटशी पण कल्पना नसणारे आज जेष्ठ कार्यकर्ते ना तुच्छ वागणूक देत आहेत,,,,
९४२१८८७७१५/७०५७८८७७२५
क्या बात है कालीचरण सरजी(कालू भाई)जुने-जाणते,अनुभवी,वर्षानुवर्षांपासून भाजपात एकनिष्ठतेने कार्य करणारे अजूनही फक्त बिछायत(झोरे)उचलण्याचेच कार्य करीत राहतील तर नाराजी साहजिकच आहे,
ReplyDeleteआजचा जमाना high speed चा आला आहे,भुर्रर्र सननन पिरिरीरर over take करून देतात.ही परिस्थिती सर्वदूर झाली आहे.