Posts

Showing posts from 2020

शहादा येथील आर आर पटेल सौ दुर्गाताई तांबे महाराष्ट्र भुषण प्रेरणा पुरस्काराने सन्मानित

Image
  शहादा येथील आर आर पटेल सौ दुर्गाताई तांबे महाराष्ट्र भुषण प्रेरणा पुरस्काराने सन्मानित तळोदा : निसर्ग मित्र समिती तर्फे राज्यस्तरीय पर्यावरण परिषद दि 20 रोजी मालेगाव येथील आय एम ए सभागृह येथे संपन्न झाली असून शहादा येथील आर आर पटेल यांना संगमनेर नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे महाराष्ट्र भुषण प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.              वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती धुळे व बागलाण तालुक्यातील आदर्श गाव टेभे ग्रामपंचायत जि. नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन करून पर्यावरणाचे राष्ट्रीय उपक्रमाला प्रोत्साहन देणे, वृक्षारोपण मोहीम, पाणी आडवा पाणी जिरवा, जलसंधारण तसेच एक गाव एक होळी प्रदूषण मुक्त दिवाळी जलपरिषद आदी अभियान यशस्वीपणे राबविणारे कार्यकर्ते व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पर्यावरणवाद्यांना प्रेरणा म्हणून महाराष्ट्र भूषण प्रेरणा जीवन गौरव पुरस्कार देण्यात येतो.          याप्रसंगी  टेभे गावचे सरपंच रवींद्र अहिरे,निसर्ग मित्र समिती चे संस्थापक अध्य...

शहादा तालुक्यात दुर्गम भागात आमदारांची भेट

Image
शहादा-तालुक्यासह जिल्ह्यात बेमोसमी पाऊस सुरू असतांनाही रिमझिम पावसात शहादा-तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांनी अतिडोंगराळ भागातील पहाडपट्ट्यात असलेल्या नागझिरी, उपलापाणि व कोटबांधणी या आदिवासी पाडयांना भेट देऊन तेथील जनजीवनाच्या समस्या जाणून घेतल्या. या गावांना जाताना अनेक ठिकाणी रस्ते नसल्याने बऱ्याच ठिकाणी त्यांना पदयात्रा करावी लागली. आ. पाडवी यांच्या या अचा नक भेटीने भारावून जात काँग्रेस पक्षाचे अनेक वर्षांपासूनचे कार्यकर्ते माजी पंचायत समिती सदस्य तथा २० वर्ष सरपंच असलेले शंकर पावरा व उपलापाणीचे कारभारी नोबल्या वळवी व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी ग्रामस्थांनी भावना व्यक्त करीत सांगितले की, आमच्या पाड्यांमध्ये वर्षानुवर्षे एकही खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य भेटीला आले नाहीत, त्यामुळे आमच्या समस्या कोणीही दूर करू शकले नाहीत आपण पहिले आमदार आहात या पहाड पट्ट्यात पडत्या पावसात पायी चालत आमच्या भेटीला येऊन आमच्या समस्या जाणुन घेत आणि त्या सोडविण्याचा संकल्प सोडला. आ. राजेश पाडवी यांनी पहाड पट्ट्यातील समस्या ज...

वाल्हेरी चा विकास होणार

Image
प्रतिनिधी तळोदा  सातपुद्याच्या भागात  आदिवासी शेतकरी बांधवांना व   इतर घटकांना  पाण्याची कायम सोय होऊन सिंचनाचा दृष्टीने या भागात नाम संस्था लवकरच काम हाती घेणार असून  या दृष्टीने  पाहणी करण्यासाठी वाल्हेरी भागात आमदार  राजेश पाडवी यांनी भेट देऊन पाहणी केली पर्यटन च्या दृष्टीने देखील इथं काय सुविधा देता येतील या बाबत पाहणी केळी, दि,१०/१२/२०२० रोजी व्हालेरी ता तळोदा येथे,नाम फाऊंडेशनतर्फे  डँम प्रोजेक्टची पाहणी,शहादा तळोदा मतदार संघाचे मा,आमदार राजेशजी पाडवी साहेब, नाम फाऊंडेशनचे प्रतिनिधी जितू भाई शहादा यांनी २ किमी पायपीट करत प्रत्यक्ष जागेची पाहणी केली, या प्रसंगी, मा,आमदार राजेशजी पाडवी,नाम फाऊंडेशन प्रतिनिधी जितू भाई,यशवंतदादा ठाकरे पं स सभापती तळोदा,बळीरामदादा पाडवी, विरसिंगदादा पाडवी,दाज्या पावरा पं स सभापती,यशवंत दादा पाडवी सरपंच सोमावल,विठ्ठल बागले,गोपी पावरा सरपंच मालदा,गुड्डू वळवी,विरसिंग दादा, अमरसिंग दादा,  भिमसिंग दादा, विक्रम पाडवी,आदि उपस्थित होते, या बाबतीत नाम फोंडेशन चे मकरंद  अनासपुरे यांच्...

तळोद्यात मोटारसायकल अपघात एकाचा मृत्यू

Image
तळोद्यात मोटारसायकल अपघात एकाचा मृत्यू तळोदा : तळोदा येथील खटाई माता मंदिर परिसरात एकाच्या अंगावर दुचाकी चालून त्याच्या जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.ही घटना रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली.           पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,        तळोदा येथील खटाई माता मंदिर परिसरात 40 वर्षीय व्यक्ती काही वेळेपासून पडलेल्या व्यक्तीच्या इसमाच्या अंगावरून दुचाकी गेल्याने गेल्याची घटना घडली.या घटनेत त्या व्यक्तीच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्यामुळे त्याच्या डोक्यातून जास्तीचा रक्तश्राव झाल्याने त्याच्या मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.           दरम्यान,मयत व्यक्तीची ओळख पटत नसली नसून रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून त्याच्या सुरू होता.

महाविकास आघाडीचे मते फुटली.... अमरीशभाईचा एकहाती विजय

Image
महाविकास आघाडीची मते फुटली  अखेर अमरीश भाई यांचा एकहाती विजय कालिचरण सूर्यवंशी/तळोदा           आज धुळे नंदूरबार विधानपरिषद जागेसाठी पोट निवडणुकीसाठी पार पडली असून  भाजपाचे अमरीश भाई यांचा दणदणीत विजय झाला आहे. धुळे नंदुरबार जिल्हातील काँग्रेस,राष्ट्रवादी, शिवसेना,अर्थात महाविकास आघाडीचे सदस्य संख्या बळ पाहता पैकी बहुसंख्य मतदारांनी भाजपचे उमेदवार  अमरीश भाई  यांना  झुकते माप दिल हे निकालावरून सिद्ध झाले आहे.        धुळे नंदुरबार जिल्हात काँग्रेसचे  प्रमुख काही निर्णय घेतांना व सहकार व पालिकेच्या निवडणूक असतील अश्या प्रसंगी अमररिष भाई यांनी शहादा सोबतच तलोद्यातील  काँग्रेस च्या स्थानिक लोकांशी असणारे सलोख्याचे संबध तर स्थानिक काँग्रेस मधील नेते देखील भाई आज भाजपात गेले असले तर व्यक्तिगत संपर्क व त्यांचा प्रति आदर अजूनही टिकून असल्याचे खाजगीत बोलताना काही नगरसेवकांशी बोलताना मागील काळात चर्चेतून दिसून आले  होते आज निकाल अंती ते स्पष्ट झाले आहे,           विधानपरिषद निवडणूकीसाठी सद...

राजकारण बाजूला अगोदर मैत्री

Image
  तलोद्यात पोलिसांनी निभावली वन विभागाची भुमीका बिबट्याला पळविले राजकारण बाजूला अगोदर मैत्री बिबट्याला घाबरून झाडावर चढेलेल्या माजी नगरसेवकाना उतरविण्यासाठी गेले नगराध्यक्ष   कालीचरण सूर्यवंशी/तळोदा          धडगाव तालुक्यातील येथील कुंबी येथील नातेवाईक तळोदात आल्याने त्यांना भेटण्यासाठी चिनोदा शिवारातील शेतात गेलेल्या तळोद्याचे माजी नगरसेवक तथा शिवसेनेचे जेष्ठ नेते  रूपसिंग पाडवी यांना चक्क तीन बिबट्याचे दर्शन झाले. तीघा बिबट्याना पाहून भेदरलेल्या पाडवी यांनी स्वतःच्या व नातेवाईकांच्या बचावासाठी झाडावर तयार केलेल्या मचाणावर चढले. त्यांना उतरविण्यासाठी थेट तळोद्याचे नगरसेवक अजय परदेशी व इतर यंत्रणा घटनास्थळी पोहचले व त्यानंतर पाडवी यांना झाडावरून खाली उतरले.       याबाबत सविस्तर माहिती अशी की तळोद्याचे माजी नगरसेवक तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रुपसिंग बिरबा पाडवी याचे मूळ गाव धडगाव तालुक्यातील कुंबी येथील नातेवाईकाना मजुरांना व इतर नातेवाईकांना भेटण्यासाठी तालुक्यातील चिनोदा येथे संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान गेले होते. दरम्यान...
Image
  नंदुरबार शहरात आढळला दुर्मीळ 'चापडा' सर्प यापुर्वी शहरी भागात तो कोठेही आढळलेला नाही. कालीचारण सूर्यवंशी/तळोदा              नंदुरबार शहरातील नवापूर चौफुली, नवनीत हॉटेल च्या परिसरात दुर्मीळ चापडा ( बांबू पिट वायपर ) हा अतिविषारी व सहसा आढळून न येणारा सर्प आढळून आला. अजय देवरे यांनी लागलीच वन्यजीव संरक्षण संस्था चे सदस्य जितेंद्र सांगळे (नंदुरबार पोलीस) यांना कॉल केला आणि त्यांनी घटनास्थळी जाऊन शास्त्रशुध्द पध्दतीने सुरक्षितरित्या साधारण 2 फूट लांबीचा 'चापडा' सर्पाला रेस्क्यू केला. सापाची रीतसर वन विभाग मध्ये नोंद करून निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले.  'चापडा' हा अत्यंत विषारी असून चापडा किंवा हिरवी घोणस या नावाने ओळखला जाणारा हा सर्प प्रामुख्याने झाडांवर तसेच झुडुपांवर वेलींवर अधिवास करतो. याचा पोटाकडचा भाग  पिवळा असून पाठीवरचा भाग हा हिरवा असतो. डोके याचे त्रिकोणी आकारात असते. याचे वास्तव्य हे जास्त करून जंगलात आढळते. पक्षी, त्यांची अंडी पिल्ले, सरडे उंदीर हे त्याचे खाद्य असते. हा अंडी न घालता डायरेक्ट पिलाला जन्म देणारा साप आहे....

"कोरोनाच्या नावाने पक्षी गणनाचे चांगभलं "

Image
"कोरोनाच्या नावाने पक्षी गणनाचे  चांगभलं " कोरोनाच्या बहाण्याने  पक्षी गणना यंदा झालीच नाही कालीचारण सूर्यवंशी/तळोदा                तळोदा वनक्षेत्रात मागील दोन वर्षपासून पक्षी गणनाच झाली नाही यंदा कोरोना च कारण सांगत वेळ मारून नेली असली तरी मागील वर्षी कोणतेही कारण नसताना या मोहिमेचा विसर वन विभागाला पडला होता यंदा देखील तोच प्रकार झाला असून  शासनाचा विविध योजना ज्या वन विभागाकडून राबविले जातात त्यात आर्थिक निधी तरतूद असते त्यात मात्र  कागदावर वृक्षारोपण साठी फोटो शेशन करून फाईल केली जाते  मात्र तळोदा वनक्षेत्रात रानपिंगळा, गिधाड सारखे दुर्मिळ पक्षी असून देखील त्याच कोणतेही सोय सुतक वन विभागाला वाटत नाही हे दुर्देव म्हणावं लागेल  वास्तविक तळोदा वनक्षेत्रात दुर्मिळ वन्यजीव शोधण्यासाठी बाहेरून पक्षी मित्र भेटी देत असतात मात्र स्थानिक वनक्षेत्रपाल मात्र तळोदा वनक्षेत्रातील वैभवशाली होऊ शकणाऱ्या नोंदी घेण्यास निरुत्साही दिसून येत आहेत       ज्येष्ठ वनअभ्यासक मारुती चितमपल्ली यांच्या जन्मदिवस (५ नोव्हेंबर) त...

आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते राणीपुर मालदा येथील वनपट्टे धारकांना दाखले वाटप

Image
तळोदा तालुक्यात आमदार राजेश पाडवी यांचा हस्ते अदिवासी बांधवाना वनपट्टे वाटप तळोदा तालुक्यातील मालदा व राणीपुर गावातील बांधवाना शहादा तळोदा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार श्री राजेशजी पाडवी साहेब यांच्या हस्ते 35 ते 40 वर्षा पासुन प्रलंबित असलेले वनपट्टे वाटप करण्यात आले या वेळी नागरिकांनी समाधान व्यक्त केले या वेळी आमदार पाडवी बोलताना सांगितले सर्व प्रलंबित असलेले वनपट्टे देणाचे माझे प्रयत्न आहेत 40 ते 50 वर्षा पासुन प्रतिक्षेत असलेल्या बांधवानी चिंता करण्याची गरज नाही आपल्याला आपल्या हक्काच्ये वनपट्टे मिळतील यांचा साठी माझा प्रयत्न आहेत कोणालाही काही अडचणी येत असतील तर माझ्याकडे संपर्क करा असे सांगितले तसेच आज मालदा व राणीपुर या दोघा गावांमधील नागरिकांना 58 वनजमीन मंजुर प्रमाणपत्र वाटप केले तसेच रेशनकार्ड, उत्पन्नाचे दाखले, सातबारेही वाटप करण्यात आले. या वेळी शहादा तळोदा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार राजेश पाडवी, पंचायत समिती सभापती यशवंत दादा ठाकरे, जि.प.सदस्य प्रकाश दादा वळवी, तळोदा तहसीलदार वखारे साहेब, नायब तहसीलदार राठोड साहेब, संरपच युनियन अध्यक्ष बळीराम पाडवी,अदिवासी मोर्चा जिल्हा स...
Image
प्रतिनिधी तळोदा अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर येथे दिवंगत माजी मंत्री दिलवरसिंग पाडवी यांच्या 26 व्या पुण्यतिथीनिमित्त श्री सातपुडा वैभव विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालयाच्या प्रांगणात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरूवातील दिलवरसिंग पाडवी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.         यावेळी तळोदा शहादा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, भाजपाचे अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विद्या विकास संस्थेचे अध्यक्ष नागेश पाडवी, अक्कलकुवा जिल्हा परिषद गटाचे सदस्य कपिल चौधरी, भाजपाचे जिल्हा संघटक निलेश माळी, भाजपाचे अक्कलकुवा तालुकाध्यक्ष तथा खापरचे उपसरपंच विनोद कामे, बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ.दिनेश खरात, माजी जिल्हा उपाध्यक्ष विश्र्वास मराठे,पं.स.सदस्य ॲड.सुधिर पाडवी,दलित आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बापू महिरे, संदिप मराठे, सामाजिक कार्यकर्ते उमाकांत पाटील, जयेश चौधरी, संस्थेचे उपाध्यक्ष किर्तीकुमार पाडवी, सचिव प्रभाकर ऊगले...

भाजपचे नेते सेनेच्या संपर्कातून प्रवेशाची संकेत तर भाजपचे तालुका अध्यक्ष भाजप ग्रुपमधून लेफ्ट

Image
  भाजपचे नेते सेनेच्या संपर्कातून प्रवेशाची चर्चा  तळोदा : तळोदा शहरातील पालिका निवडणुकी पूर्वी ज्यांनी शिवसेना सोडून भाजपात प्रवेश केला होता व निवडणूक भाजप कडून लढवली होती , ते आता स्वगृही परतण्याचे संकेत मिळत असून  जिल्ह्यातील शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या फार्म हाऊस वर माजी पूर्वी सेनेत असणारे व सध्या भाजपात असणारे अनुप उदासी तर  भाजपचे उपजिल्हाध्यक आनंद सोनार यांनी भेट घेतली असून या ठिकाणी काय चर्चा झाली हे मात्र गुलदस्त्यात आहे,  तर दुसरी कडे  भाजपच्या एक तालुका पदाधिकारी  ने राजीनामा दिल्याची चर्चा  सुरू आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस च्या संपर्कात असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे, दरम्यान अनुप उदासी यांची पत्नी सध्या भाजपाची  विद्यमान नगरसेविका असून पूर्वश्रमीचे दोघे शिवसेनीक सोबतच भेटीला गेल्याने चर्चेस उधाण आले आहे  यावरुन एकंदरीत एकनाथराव खडसे यांच्या सोडचिठ्ठी नंतर तळोदा भागातून कोण कोण  राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार ?  या बाबत चर्चा  असतांना पालिका निवडणुकी पूर्वी भाजपात आलेले क...

सहयोग ग्रुप कडून रुग्णालयात रुग्ण साठी दिवाळी भेट,,,,

Image
सहयोग सोशल ग्रुप द्वारे उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथील महिला रुग्णांना दिवाळी भेट....       कोरोना संक्रमण काळात प्रत्येक कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटलेली आढळते. त्यात दिवाळी सण वर्षभरातून एकदा येणारा आनंदाचा क्षण, पण कुटूंबातील स्त्री जर आजारी असेल तर त्यांची ही दिवाळी दुःखाच्या गर्द कालोखात सापडते.मगआजाराच्या वेदनेपासून मुक्ततेसाठी अथवा बाळंतपण सुखरूप व्हावे दवाखान्यात दाखल व्हावे लागते. मग दिवाळी सण साजरा करण्यासाठी होणारी पूर्वतयारी व खरेदी शक्य होत नाही. अशा सर्वांना मदतीचा हात म्हणून आज दिनांक 6 11 2020 रोजी उपजिल्हा रुग्णालयातील महिला रुग्णांना दिवाळीनिमित्त साडी वाटप करण्यात आले.तळोदा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री अविनाश केदार साहेब व उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर मनीषा पाटील यांच्या हस्ते रुग्णालयातील 20 महिला रुग्णांना दिवाळी भेट म्हणून साडी वाटप करण्यात आले. कोरोना संक्रमण काळात दिवाळीचे फटाके वाजवून धूर करण्यापेक्षा रुग्णांच्या चेहर्‍यावर काही काही काळ हसु आणू शकू.. असा उद्देश सहयोग सोशल ग्रुप तळोदा यांचा आहे. असे अध्यक्ष श्री ऍड अल्पेश जैन यांनी कार्...
Image
भाजपपेक्षा काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीत जाण्यासाठी उत्साही....?   तळोदा / प्रतिनिधी             नंदुरबार जिल्हा सह तळोदा  शहर व तालुक्यातील मधील भाजप अंतर्गत लाथाळ्या सर्वश्रुत असतांना खान्देश मधील भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ राव खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवे श नंतर  पक्षाचे सर्व्हसर्वा पवार साहेबांनी उत्तर महाराष्ट्रात मरगळ आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस ला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी स्वतः एकनाथराव खडसे     प्रत्येक तालुक्यात भेटी देऊन  भाजप मधील जुन्या कार्यकर्ते व काही  काँग्रेस  मधील  नाराज स्थानिक नेते बडे नेते आपल्या कडे कसे येतील या करिता प्रयत्न करतील मात्र  त्या पूर्वीच काहींनी  स्वतः नाथाभाऊंशी  तळोदा इथं भव्य कार्यक्रम लवकरच होणार असल्याचे खात्रीशीर वृत्त असून डिसेंबर जानेवारीत  नंदुरबार , शहादा ,तळोदा, मोलगी, अक्कलकुवा, या ठिकाणी मेळावे घेऊन यावेळी राष्ट्रवादीत अनेकांचे प्रवेश होणार आहेत, यात तलोद्यातील    भाजाप पदाधिकारी, काँग्रेस पदाधिकारी, प्रवेश ...

शहाद्यात काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश

Image
शहादा तालुक्यातील संरपच उपसंरपच सह असंख्य कार्यकर्ताचा काँग्रेस ला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश शहादा तालुक्यातील आमदार राजेश पाडवी साहेब यांचा उपस्थितीत सोमावल येथे निवासस्थानी संरपच उपसंरपच सह 250 कार्यकर्ताचा काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पार्टी मधे प्रवेश केला भाजपाचे जेष्ठ नेते यांनी श्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्या नंतर बरेच कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षात ग्रुह मंत्री चा उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील असे भाकित केले होते. पंरत तसे न होता दि 2 नोव्हेंबर रोजी शहादा तालुक्यातील  कुढावद,पाडळदा, पिपळोद,जावदा, नवलपुर, वाडीपुनर्वसन, लाचोरा, या गावातील संरपच उपसंरपच ग्रामपंचायत सदस्य व असंख्य कार्यकर्तानी आमदार राजेश पाडवी यांचे विकास कार्य बघत यांनी भारतीय जनता पार्टी मधे प्रवेश केला या वेळी आमदार राजेश पाडवी बोलताना म्हणाले कि प्रत्येक शेतकरी बांधवांचा कामाला मी प्राधान्य देईल शेती साठी पाणी, विज, शेतशिवार रस्ते बनवण्यासाठी माझे पहिले प्राधान्य राहील तसेच शेतकरी राजा यांना या सुविधा भेटल्यातर मजुरांना यांचा फायदा होईल उसाचा तसेच ...

वाळू वाहतुकीबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधीयांनी चिंतन करून निर्णय घेण्याची गरज

Image
वाळू वाहतुकीबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधीयांनी चिंतन करून निर्णय घेण्याची गरज  कालीचरण सूर्यवंशी/ तळोदा:            तळोदा नंदुरबार रस्त्यावर वाळू वाह तूक विषय आता नवीन राहिला नसून अनेक तक्रार होऊन देखील हि वाहतूक काही केल्या शिस्तबद्ध होत नाही. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी याबाबत चिंतन करून निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.            तळोदा कडून नंदुरबार जात  असतांना नंदुरबार प्रांत अधिकारी वसुमना पंत यांच्या शासकीय वाहनाला एका मद्यपी ट्रक चालकाने कट मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, मंगळवारी सकाळी १०,३० वाजेच्या सुमारास तळोदा येथून नंदुरबारकडे आपल्या शासकीय वाहनातून जात असताना वाळू वाहतूक करणारा एक खाली ट्रक नंदुरबार कडून हातोडा कडे येत होता.  के.डी.गावीत हायस्कूलच्या अलीकडे  वाहन चालकाने अचानकपणे या शासकीय वाहनावर वाहन टाकले.. वसुमना पंत यांचे वाहन चालक रोशन मोरे याने समोरील वाहनास सिग्नल दिला मात्र त्याच्या त्यावर परिणाम झाला नाही व त्याने वाहन पंत मॅडम यांच्या वाहनांवर आणले. दरम्यान वाहन चा...
Image
करोडो रुपयांचे व्यापारी संकुल धूळखात भाड न भरता अनेक गाळे वापरात पालिकेला करोडो रुपयांचा आर्थिक फटका सुनील सुर्यवंशी/तळोदा       तळोदा नगर पालिकेकडून कोट्यावधी निधी खर्च करून तयार करण्यात आलेल्या व्यपारी संकुल लिलावात काही तांत्रिक अडचणी मूळ  190 गाळे असलेले हे भव्य व्यपारी संकुल मागील आठ वर्षे पासून पडून आहेत,  त्या ठिकाणी अनेक जण कोणतेही भाड न भरता त्याचा वापर करत असल्याने  आज पावेतो सात ते आठ करोड रुपये विविध माध्यमातून मिळणारे  विविध पक्षचा आशीर्वाद मूळ वाया  जात आहेत,   व्यापारी गाळ्यात अवैध व्यवसाय जोमात -   दरम्यान पालिकेतील आजी माजी विविध राजकीय पक्षांचा  स्थानिक नेत्यांचा आशीर्वाद ने या ठिकाणी  अवैध व्यवसाय जोमात सुरू असून काही आजी  माजी नगरसेवकांचा   यात विशेष रस दिसून येत असल्याचे बोलले जाते सर्वच पक्ष कडून हा राजकीय फायदा उचलला जात असल्याने     कोणताही राजकीय पक्ष या बाबत बोलण्यास धजावत नाही,             तळोदा शहरातील एकंदरीत आवश्यकता पाहता वर्षे पुर्वी तळो...
Image
  अक्कलकुवा नगर पंचायत बाबत हालचाली गतिमान  एक जी, प , सदस्य तर दोन पं,स, सरपंच सह १४ सदस्यांचे भविष्य टांगणीला ? कालीचरण सूर्यवंशी/तळोदा  गुजरात मध्यप्रदेश च्या दुर्गम भागाचा सीमेवर तालुक्याचे प्रमुख केंद्र असणाऱ्या अक्कलकुवा इथं ग्राम पंचायत असून या  बाबत शहराचा विकासासाठी  नगर पंचायत च्या  १५-६-२०१५ रोजी आदेश काढण्यात आला होता,  वॉर्ड रचना होऊन निवडकीच्या ऐनवेळी मात्र स्थानिक काही राजकीय पदाधिकारिंनी या आदेश वर आक्षेप नोंदत न्यायालयात दाद मागितली होती, त्यामुळं  या निवडणुकीला स्थगिती देऊन ग्राम पंचायत पद्धतीने निवडनुक घेण्यात आली होती,  दरम्यान आता या बाबतीत   स्थानिक नेत्यांनी न्यायालय सोबतच नगर विकास खाते तसेच तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या कडे सतत पाठपुरावा केला होता,  या निवडकीला दोन वर्षे उलटून गेल्याने जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी प्रधान सचिव यांच्या कडे पत्र पाठवून  नगर पंचायत करण्याबाबत अवगत केले आहे त्या मुळे आता    लवकरच नगर विकास खात्याकडून निवडणूक कार्यक्रम पुनः एकदा जाहीर होणार असल्याचे संकेत मिळत आह...
Image
  सातपुड्यातील रानमेव्याला देखिल कोरोनाचा फटका कोरोनाच्या धास्ती : सिताफळ खरेदीकडे ग्राहकांची पाठ  : सातपुड्याच्या रानमेवा म्हणून प्रसिद्ध असलेले सीताफळ बाजारात दाखल झाले असून कोरोनाच्या धास्तीमुळे ग्राहकांनी सिताफळ खरेदीकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.त्यामुळे सातपुड्यातील रानमेव्याला देखिल कोरोनाचा फटका बसला आहे.              सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात सीताफळाचे उत्पन्न घेतले जाते  धडगाव तालुक्याचा व अक्कलकुवा व तळोदा तालुक्यात तील पर्वतरांगात मोठ्या प्रमाणात सीताफळाची झाडे असून साधारणतः ऑक्‍टोबर नोव्हेंबर या महिन्यात सीताफळ विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल होत असतात. रासायनिक खतांचा वापर न करता संपूर्ण सेंद्रिय व नैसर्गिकरित्या पिकवलेली सातपुड्यातील गावरान सीताफळांच्या गोडवा व रसाळपणा अधिक असल्याने सातपुड्यात उत्पादित होणाऱ्या सीताफळाला जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्र व शेजारील गुजरात राज्यात मोठी मागणी असते.             तळोदा, अक्कलकुवा,शहादा,खापर,बोरद, इत्यादि शहराच्या ठिकाणी सा...
Image
  अक्कलकुवाला नगर पंचायत स्थापन करण्याबाबत  जिल्हाधिकारी नंदुरबार यांचे प्रधान सचिवांना पत्र कालीचरण सूर्यवंशी/तळोदा                अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार या तालुका मुख्यालयाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी नवीन नगरपंचायत स्थापन करणे बाबत प्रधान सचिव नगर विकास विभाग यांना पत्र देण्यात आले आहे        अक्कलकुवा या  ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र, ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रांमध्ये संक्रमित होणारे क्षेत्र आणि तालुका मुख्यालय असल्यामुळे हे संक्रमणाचे क्षेत्र म्हणून  विर्निदिष्ठ करण्याच्या आणि उक्त स्थानिक क्षेत्रासाठी अक्कलकुवा नगरपंचायत या नवीन नगरपंचायत घटित  करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 चे कलम 341 क चे  पोटकलम (1),1क व आणि 2 याद्वारे अधिसूचना काढण्याची उद्घोषणा शासन राजपत्रात  काढण्यात आली होती.               अक्कलकुवा ग्रामपंचायतीला नगरपंचायतीच्या दर्जा देताना जिल्हा परिषद अक्कलकुवा मतदार गटाचे सर्व ...
Image
ता.१८ आक्टाेबर २०२०   *नाशिक विभागीय नवनिर्वाचित शिक्षण उपसंचालक नितिन उपासनी यांची नंदुरबार जिल्ह्यातील शैक्षणिक विषयांवर आढावा बैठक संपन्न....!!*        मार्च २०२१ मध्ये हाेणाऱ्या इ.१० वी १२ वी च्या परीक्षा, नवीन केंद्र मागणी प्रस्तावातील शाळांना भेटीसाठी व शैक्षणिक विषयांवर चर्चा करण्यासाठी नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक श्री नितिन उपासनी दि.१७ आक्टाेबर २०२० राेजी नंदुरबार जिल्हा दाेैऱ्यावर आले हाेते.त्यावेळी नंदुरबार शहरातील यशवंत विद्यालय येथे परीक्षेचे नियाेजन व शैक्षणिक विषयांवर चर्चा करण्यात आली.त्यावेळी जिल्ह्यातील मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष मुकेश पाटील , सचिव पुष्पेंद्र रघुवंशी,शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष डी.पी.महाले ,कार्यवाह ईसरार सर ,संस्था चालक संघटनेचे रूपेश चाैधरी ,डी.एन.नांद्रे,उच्च माध्यमिक संघटनेचे प्रा.निशिकांत शिंपी,प्रा.बागुल सर,शिक्षक संघटनेचे सचिव एस.एन.पाटील व जिल्ह्यातील  मुख्याध्यापक शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी   आदिंचा उपस्थितीत काेराेना प्रतिबंधक उपायांचे पालन करून शैक्षणिक विषयांवर चर्चा करण्यात आली.  ...

साहेबांचा सोबत चलता का ? तळोद्यात मॅरेथॉन मिटिंग......

Image
साहेबांचा सोबत चलता का ? तळोद्यात मॅरेथॉन मिटिंग...... आमची तर संघटन स्तरावर मिटिंग.... नाथाभाऊंचा विषयच नाही !!!   -एक जेष्ठ नेत्यांची प्रतिक्रिया   तळोदा/कालीचरण सूर्यवंशी              एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधे जाण्याचे स्पष्टपणे संकेत माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी दिल्यानंतर  त्यांचा सोबत  प्रवेशबाबत  चर्चा देखील सुरू झाली आहे. धडगाव ,अक्कलकुवा,  तळोदा , शहादा, या पट्ट्यातील  असंख्य जुने कार्यकर्ते जे नाथाभाऊंचा  जुन्या भाजप मधील पठडीतील होते,त्यांना आता विचारात  पाडले असून सोबत जायच की आहोत  तिथं राहायचे या बाबतीत मंथन साधारण दोन तास चालली. मात्र, त्यात काय निर्णय झाला हे अजूनही गुलदस्त्यात आहे.           या मीटिंगमध्ये शहादा, अक्कलकुवा, तळोदा येथील भाजपचे दिगग्ज नेते उपस्थित होते.अधिक माहिती घेतली असता  सदर मिटिंग फक्त संघटन पातळीवर समज-गैरसमज दूर करण्यासाठी घेण्यात आली होती.दरम्यान, नाथाभाऊंचा प्रवेश बाबत चर्चा असतांना दरम्यान या मिटिंग कडे वेगळ्...

भाजपाचे घंटानाद आंदोलन

Image
*भारतीय जनता पार्टी नंदुरबार* *भारतीय जनता युवा मोर्चा नंदुरबार जिल्हा* दिनांक 13 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 10:30 वाजता  मंदिरे उघडण्याची  परवानगी साठी घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय भाऊ चौधरी, खासदार डॉ. हिना ताई गावित,  जिल्हा सरचिटणीस निलेश माळी,नगरसेवक चारुदत्त कळवणकर,नगरसेविका संगीता ताई सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष सपना ताई अग्रवाल, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, शहर अध्यक्ष नरेंद्र माळी,युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस निलेश चौधरी,जिल्हा सचिव अश्विन सोनार,मयुर चौधरी ,युवा मोर्चा शहर अध्यक्ष जयेश चौधरी, रोहित गांगुर्डे,किरण वाडीले,मुकेश आहिरे आदी उपस्थित होते

फटाके दुकान साठी मार्गदर्शक सूचना व नियम सह परवानगी

Image
फटाके दुकान व परवान्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन (जिमाका वृत्तसेवा)  दि. 12: दिवाळी सणासाठी तात्पुरत्या स्वरुपात फटाका विक्री व साठवणूक करणाऱ्या जिल्ह्यातील सर्व परवानाधारकांनी मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे. फटाके विक्रींची जागेची निवड करतांना एक किंवा त्यापेक्षा अधिक समांतर रांगामधील स्टॉलचे दरवाजे समोरासमोर नसावेत, ते मागील बाजुने बंद असावेत. तात्पुरते शेड हे लोखंडी पत्र्याचे किंवा सिमेंटच्या पत्र्याचे बांधण्यात यावेत. दोन स्टॅालमधील अंतर तीन मीटर असावे. राहत्या वस्तीपासून, जागेपासुन, इमारती पासुन स्टॉलचे अंतर 50 मीटर असावे.  शेड, स्टॉल एकमेकांसमोर तोंड करुन नसावेत. दुकानात फक्त विद्युत दिव्यांचा वापर करण्यात यावा. विद्युतदिवे छताला पक्के लावावेत, लोंबते ठेवून नयेत. प्रत्येक स्टॉलच्या रांगेत एक मास्टर स्वीच असावे. स्टॉल जवळ फटाके उडविण्यात येवू नयेत. फटाके दुकानाचे शेड, स्टॉल सरकारी, खाजगी जागेत असल्यास जागा मालकांची परवानगी असावी. फटाका विक्री स्टॉलजवळ अग्निसुरक्षा व्यवस्था, आ...

महिला सुरक्षा प्रश्न गंभीर

Image
*महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर: भाजप महिला आघाडीच्या आरोप*  *जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; खा.डॉ हिना गावितांनी दिले निवेदन*  महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला सुरक्षेच्या प्रश्न गंभीर होत चालला आहे. कोविड सेंटर व हॉस्पिटलमध्ये अत्याचार व विनयभंगाच्या घटना सुरूच आहेत असा आरोप करीत महिला सुरक्षिततेबाबत त्वरित कडक कायदे बनविण्यात यावे या मागणीसाठी काल सोमवारी राष्ट्रीय प्रवक्त्या खा.डॉ हिना गावित यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर भाजप आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला.  सोमवारी सकाळी १०.५१ वाजता मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात महिलांनी घोषणाबाजी करीत अत्याचार घटनांच्या निषेध केला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांना निवेदन दिले. त्यात म्हटले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर होत चालला आहे.अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरूच आहे.त्यातच ...

एकनाथराव खडसे यांच्या आदेशानेच मी राष्ट्रवादीत ,,,,,, माजी आमदार उदयसिंग पाडवी ,,,, नाथाभाऊंचा प्रवेशाचे संकेत ?

Image
 एकनाथराव खडसे यांच्या आदेशानेच राष्ट्रवादीत प्रवेश केला असून आम्ही सर्व मिळवून संघटन वाढविणार असल्याचे  माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी  प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे,    राष्ट्रवादी काँग्रेस ची आढावा व इतर चर्चा साठी माजी आमदार उदयसिंग पाडवी यांच्या निवासस्थानी जिल्हाअध्यक्ष अभिजित मोरे व स्थानिक पदाधिकारी यांची बेठक झाली त्या बाबत पाडवी यांनी प्रेस काढली आहे त्यात त्यांनी स्पष्टपणे उल्लेख करत एकनाथराव खडसे  प्रवेश करणार असल्याचे संकेत देऊन टाकले  यावरून एकंदीतर मागील काळात भाजप मधील उत्तर  महाराष्ट्रचे जेष्ठ नेते एकनाथराव  खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील प्रवेश चर्चेला पुष्टी मिळते,  मुबंई इथं देखील ते राष्ट्रवादी चे सर्वंसर्वां शरद पवार यांची भेट घेणार  असल्याचे वृत्त होते,                एकनाथराव खडसे  व उदयसिंग पाडवी यांचे ऋणानुबंध तसे जुने असून शहादा तळोदा मतदारसंघात उमेदवारीच्या पासून तर आमदारकी निवडणूक व पांच वर्षातील त्यांचा कार्यकाळात प्...

अखेर पालिकेची सभा ऑन लाईनच जिल्हाधिकारी यांच्या सूचना

Image
तळोदा नगर परिषदेची दि. 14 रोजी होणारी सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे न घेता सोशल डिस्टंसिंगचे पालन करून घेण्याची मागणी प्रतोद तथा नगरसेवक  संजय माळी व 6 नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे केली होती.          त्यावर, नगर विकास विभागाचे संदर्भीय दि. 3 जुलै 2020 रोजी च्या पत्रान्वये महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायती अधिनियमातील तरतुदीनुसार नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या विविधसभा, बैठका नियमितपणे केवळ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे घ्याव्यात अशा सूचना दिलेल्या आहेत.       नगर विकास विभाग यांचे संदर्भीय पत्र 3 जुलै 2020 रोजीच्या पत्रान्वये दिलेल्या निर्देशानुसार आगामी सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे आयोजित करावी परंतु श्री संजय बबनराव माळी, प्रतोद तथा नगरसेवक व इतर 6 नगरसेवक 14  तळोदा नगर परिषद यांच्या तक्रारीनुसार नेटवर्क समस्यांमुळे सभेत कोणतीही अडचण निर्माण होणार नाही तसेच सभेबाबत सर्व शासन नियमाप्रमाणे कारवाई होईल याची खातरजमा करण्याचे मुख्याधिकारी तळोदा यांना सांगण्यात आले आहे.