भाजपचे नेते सेनेच्या संपर्कातून प्रवेशाची संकेत तर भाजपचे तालुका अध्यक्ष भाजप ग्रुपमधून लेफ्ट
भाजपचे नेते सेनेच्या संपर्कातून प्रवेशाची चर्चा
तळोदा : तळोदा शहरातील पालिका निवडणुकी पूर्वी ज्यांनी शिवसेना सोडून भाजपात प्रवेश केला होता व निवडणूक भाजप कडून लढवली होती , ते आता स्वगृही परतण्याचे संकेत मिळत असून जिल्ह्यातील शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या फार्म हाऊस वर माजी पूर्वी सेनेत असणारे व सध्या भाजपात असणारे अनुप उदासी तर भाजपचे उपजिल्हाध्यक आनंद सोनार यांनी भेट घेतली असून या ठिकाणी काय चर्चा झाली हे मात्र गुलदस्त्यात आहे,
तर दुसरी कडे भाजपच्या एक तालुका पदाधिकारी ने राजीनामा दिल्याची चर्चा सुरू आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस च्या संपर्कात असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे,
दरम्यान अनुप उदासी यांची पत्नी सध्या भाजपाची विद्यमान नगरसेविका असून पूर्वश्रमीचे दोघे शिवसेनीक सोबतच भेटीला गेल्याने चर्चेस उधाण आले आहे
यावरुन एकंदरीत एकनाथराव खडसे यांच्या सोडचिठ्ठी नंतर तळोदा भागातून कोण कोण राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार ?
या बाबत चर्चा असतांना पालिका निवडणुकी पूर्वी भाजपात आलेले काही जण पुनः राज्यात सत्तेत असणाऱ्या सेनेत जाण्याचा तयारीत असून आ,चंद्रकांत रघुवंशी यांचा नावाची घोषणा झाल्या नंतर सेनेत जाण्यासाठी स्थानिक पातळीवरील काँग्रेस ,भाजप, मधील काही जण इच्छुक आहेत,
वरकरणी भाजपात शांतता दिसत असली तरी माजी आमदार उदयसिंग पाडवी यांचा संपर्कात देखील काही स्थानिक नेते असून पुढील महिन्यात एकनाथराव खडसे यांच्या उपस्थितीत जाहीर त्यांचा जाहीर प्रवेश होणार आहे एकूणच पुढिल काळात बऱ्याच राजकीय उलथापालथ होणार आहेत,
काँग्रेस चे काही जण राष्ट्रवादी च्या संपर्कात -
तलोद्यातील काही बडे नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असून येणाऱ्या पालिका निवडणुकी पूर्वीच प्रवेश बाबत चर्चा असून काहींनी सरळ बारामती गाठलं असेल तरी स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन मग निर्णय घेऊ अस उत्तर देण्यात आलं आहे तर नाथाभाऊनी देखील कोणालाही सहजपणे पक्षात प्रवेश न देता संघटन च महत्व पटवुन मगच प्रवेश निश्चित करावा असा संदेश दिला आहे
या भेटी प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश कुळकर्णी , शहर प्रमुख जितेंद्र दुबे, उपजिल्हा अध्यक्ष रुपसिंग पाडवी, गौतम जेन,भूषण सोनार उपस्थित होते
भाजप ग्रुप मधून लेफ्ट -
भाजप तालुका अध्यक्ष विलास डाँमरे ग्रुप मधून
ग्रुपमधून काल सकाळी लेफ्ट तर उपजिल्हाध्यक आनंद सोनार आज संध्याकाळी लेफ्ट
आज दुपारी सोशल मीडियावर प्रसारीत झालेला आज काढलेला हा फोटो आ,चंद्रकांत रघुवंशी सोबत अनुप उदासी व आनंद सोनार
Comments
Post a Comment