नंदुरबार शहरात आढळला दुर्मीळ 'चापडा' सर्प
यापुर्वी शहरी भागात तो कोठेही आढळलेला नाही.
कालीचारण सूर्यवंशी/तळोदा
नंदुरबार शहरातील नवापूर चौफुली, नवनीत हॉटेल च्या परिसरात दुर्मीळ चापडा ( बांबू पिट वायपर ) हा अतिविषारी व सहसा आढळून न येणारा सर्प आढळून आला. अजय देवरे यांनी लागलीच वन्यजीव संरक्षण संस्था चे सदस्य जितेंद्र सांगळे (नंदुरबार पोलीस) यांना कॉल केला आणि त्यांनी घटनास्थळी जाऊन शास्त्रशुध्द पध्दतीने सुरक्षितरित्या साधारण 2 फूट लांबीचा 'चापडा' सर्पाला रेस्क्यू केला. सापाची रीतसर वन विभाग मध्ये नोंद करून निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले.
'चापडा' हा अत्यंत विषारी असून चापडा किंवा हिरवी घोणस या नावाने ओळखला जाणारा हा सर्प प्रामुख्याने झाडांवर तसेच झुडुपांवर वेलींवर अधिवास करतो. याचा पोटाकडचा भाग पिवळा असून पाठीवरचा भाग हा हिरवा असतो. डोके याचे त्रिकोणी आकारात असते.
याचे वास्तव्य हे जास्त करून जंगलात आढळते. पक्षी, त्यांची अंडी पिल्ले, सरडे उंदीर हे त्याचे खाद्य असते.
हा अंडी न घालता डायरेक्ट पिलाला जन्म देणारा साप आहे. सर्पांच्या प्रजातींमध्ये चापडा हा सर्प शहरात यापुर्वी कधीही आढळून आला नसल्याची माहिती वन्यजीव संरक्षण संस्थेच्या पदाधिकारी यांनी दिली, तसेच त्यांनी जनतेला आव्हान केले आहे की जिल्यात कुठेही मानवी वस्तीत कोणताही वन्यजीव आढळला तर त्याला हात न लावता त्याची छेडछाड न करता वन विभाग किंवा वन्यजीव संरक्षण संस्था नंदुरबार सोबत संपर्क करावा. नंदुरबार जिल्ह्यात वन्यजीव संरक्षण संस्था मागील दहा वर्षा पासून वन विभागाच्या वतीने वन्यजीवांना रेस्क्यू करून त्यांना जंगलात सोडायचे काम करत आहे
Comments
Post a Comment