सहयोग ग्रुप कडून रुग्णालयात रुग्ण साठी दिवाळी भेट,,,,
सहयोग सोशल ग्रुप द्वारे उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथील महिला रुग्णांना दिवाळी भेट....
कोरोना संक्रमण काळात प्रत्येक कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटलेली आढळते. त्यात दिवाळी सण वर्षभरातून एकदा येणारा आनंदाचा क्षण, पण कुटूंबातील स्त्री जर आजारी असेल तर त्यांची ही दिवाळी दुःखाच्या गर्द कालोखात सापडते.मगआजाराच्या वेदनेपासून मुक्ततेसाठी अथवा बाळंतपण सुखरूप व्हावे दवाखान्यात दाखल व्हावे लागते. मग दिवाळी सण साजरा करण्यासाठी होणारी पूर्वतयारी व खरेदी शक्य होत नाही. अशा सर्वांना मदतीचा हात म्हणून आज दिनांक 6 11 2020 रोजी उपजिल्हा रुग्णालयातील महिला रुग्णांना दिवाळीनिमित्त साडी वाटप करण्यात आले.तळोदा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री अविनाश केदार साहेब व उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर मनीषा पाटील यांच्या हस्ते रुग्णालयातील 20 महिला रुग्णांना दिवाळी भेट म्हणून साडी वाटप करण्यात आले. कोरोना संक्रमण काळात दिवाळीचे फटाके वाजवून धूर करण्यापेक्षा रुग्णांच्या चेहर्यावर काही काही काळ हसु आणू शकू.. असा उद्देश सहयोग सोशल ग्रुप तळोदा यांचा आहे. असे अध्यक्ष श्री ऍड अल्पेश जैन यांनी कार्यक्रम प्रसंगी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष श्री ऍड अल्पेश जैन , डॉक्टर सुनील लोखंडे डॉक्टर योगेश बडगुजर डॉक्टर महेश मोरे डॉक्टर संदीप जैन गुड्डू जिरे राहुल पाटील रवी चव्हाण व नितीन यांनी परिश्रम घेतले.
thanks sir for appreciation
ReplyDelete