राजकारण बाजूला अगोदर मैत्री
तलोद्यात पोलिसांनी निभावली वन विभागाची भुमीका बिबट्याला पळविले
राजकारण बाजूला अगोदर मैत्री
बिबट्याला घाबरून झाडावर चढेलेल्या माजी नगरसेवकाना उतरविण्यासाठी गेले नगराध्यक्ष
कालीचरण सूर्यवंशी/तळोदा
धडगाव तालुक्यातील येथील कुंबी येथील नातेवाईक तळोदात आल्याने त्यांना भेटण्यासाठी चिनोदा शिवारातील शेतात गेलेल्या तळोद्याचे माजी नगरसेवक तथा शिवसेनेचे जेष्ठ नेते रूपसिंग पाडवी यांना चक्क तीन बिबट्याचे दर्शन झाले. तीघा बिबट्याना पाहून भेदरलेल्या पाडवी यांनी स्वतःच्या व नातेवाईकांच्या बचावासाठी झाडावर तयार केलेल्या मचाणावर चढले. त्यांना उतरविण्यासाठी थेट तळोद्याचे नगरसेवक अजय परदेशी व इतर यंत्रणा घटनास्थळी पोहचले व त्यानंतर पाडवी यांना झाडावरून खाली उतरले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की तळोद्याचे माजी नगरसेवक तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रुपसिंग बिरबा पाडवी याचे मूळ गाव धडगाव तालुक्यातील कुंबी येथील नातेवाईकाना मजुरांना व इतर नातेवाईकांना भेटण्यासाठी तालुक्यातील चिनोदा येथे संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान गेले होते. दरम्यान शेतात पोहोचल्यानंतर त्यांना शेतात चक्क तीन बिबट्यांच्या कडप दिसून आला तीन बिबट्यांना पाहून रुपसिंग तडवी यांच्या थरकाप उडाला दरम्यान समयसूचकता दाखवत त्यांनी तात्काळ आपल्या नातेवाईकांना व मचाणावर चढवले व ते ही कसेबसे करत मचाणावर चढले. दरम्यान बिबट्याचे कुटुंब जाण्याची ते वाट पाहू लागले. बराच वेळ झाल्यानंतर त्यांनी कुठलाही मार्ग दिसत नसल्याने मदतीसाठी सुख दुःखाचे मित्र नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी भ्रमणध्वनी द्वारे आपबीती कळविली क्षणाचा ही विलंब न करता अजय परदेशी यांनी तात्काळ पोलीस स्टेशन वन विभाग व मित्रमंडळींना मोबाईल द्वारे संपर्क साधून सदर घटनेची माहिती दिली. त्यानंतर संपादित केलेल्या व्यक्ती घटनास्थळी धाव घेतली. अश्या अवस्थेत अचानक शेतात जाणे जिकरीचे वाटत असले तरी नूतन पोलीस निरीक्षक नंदराज पाटील यांनी जीवाची पर्वा न करता. शेतात प्रवेश केला. यानंतर काही कालावधीनंतर बिबट्यानी देखिल तेथून काढता पाय घेतला.
तरी देखील रुपसिंग पाडवी यांनी झाडावरून खाली उतरायची हिंमत होत नव्हती त्या जवळपास कुठून लपून बसलेले असतील अशी धास्ती त्यांच्या मनात होती काही कालावधीनंतर आठ वाजेच्या सुमारास नगराध्यक्ष अजय परदेशी,चिनोद्याचे उपसरपंच राजु पाटिल,तळव्याचे उपसरपंच मंगेश मराठे यांच्यासह पोलिस व वन विभागाची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली लोकांच्या वर्दळीमुळे बिबट्या येथून पसार झाल्याचे लक्षात आले सर्व लोकांकडे जमल्यानंतर रूपसिंग पाडवी हे मचानावरून खाली उतरले आणि त्यानंतर ते सर्वांसोबत घरी परतले.
या सर्व प्रकारामुळे रूपसिंग पाडवी यांच्या मनात प्रचंड मोठी भीती निर्माण झाली होती. भेदरलेल्या अवस्थेत काय करावे त्यांना काहीच सुचत नव्हते. प्रसंगावधान राखून रूप सिंग पाडवी हे झाडावर चढले आणि बिबट्याच्या हल्ल्यापासून स्वतःला वाचवू शकले. या भयावह परिस्थितीच्या अनुभवातुन घरी आल्यानंतर त्यांनी नगराध्यक्ष अजय परदेशी यांना मिठी मारून अश्रूंना जागा करून दिली.
पोलीसांची भूमिका महत्वाची -
दरम्यान नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी पोलीस निरीक्षक नंदराज पाटिल यांना तात्काळ फोन करून या बाबत माहिती दिली व पोलीस गाडीत स्वतः पोलीस निरीक्षक नंदराज पाटिल नगराध्यक्ष अजय परदेशी जेष्ठ पत्रकार अक्रम पिंजारी यांनी शेतात गाडी टाकली सायरन चा आवाज व गाडीचा आवाज एकूण बिबट काहीसे लांब गेले
चौकट-
तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बिबट्यांच्या संचार वाढला आहे वनविभागाने याकडे सर्रास दुर्लक्ष केले आहे काही महिन्यांपूर्वी मोहिदा शिवारात देखील एका व्यक्तीच्या बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता त्यानंतर वन विभागाकडून ठोस उपाययोजना होणे अपेक्षित होते मात्र वनविभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने वन्य प्राण्यांच्या संचार हा लोकांच्या जिवावर बेतत असल्याचे सांगितले जात आहे यानंतर वनविभागाचा बिबट्या साठी कोणती उपाययोजना करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे...
*स्थानिक पातळीवर राजकारण बाजूला शेवटी मित्र महत्वाचा.*
रुपसिंग पाडवी यांचा जीव धोक्यात आल्यानंतर त्यांना सर्वात अगोदर त्यांचे जुने राजकीय सन्मित्र अजय परदेशी यांची आठवण झाली. आणि त्यांनी याना भ्रमणध्वनीवर फोन करून अजय तू लवकर ये नाहीतर माझा जीव जाईल. असे सांगितले सुदैवाने अजय परदेशी यांनी देखील फोन उचलून यांच्या आत्मविश्वास वाढवला व पोलीस स्टेशनला संपर्क करून त्यांना सोबत घटनास्थळी नेले. व शेवटी या प्रसंगातून एक संदेश असा जातो की स्थानिक पक्ष वेगवेगळे असले तरी मैत्री महत्वाची असते. आजवर बिबत हे सर्वसामान्य मजुरांना व शेतकऱ्या दृष्टीस पडले. मात्र प्रथमच राजकीय पुढाऱ्यांवर असा भयावह अनुभव आल्याने या बिबट्याचे बंदोबस्त आतातरी होईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रतिक्रिया
सातपुडात आयुष्य गेल्यामुळे वयाच्या 70 रीत ही झाडावर चढता आले. अश्या अवघड प्रसंगात राजकारणी प्रतिस्पर्धी असणारा मात्र माझा जवळचा मित्र अजय परदेशी हा माझ्या मदतीस धावून आला. राजकारण हे तात्पुरते असते मात्र मैत्री कायमस्वरूपी असा वेगळा अनुभव या घटनेतून मला मिळाला...
प्रसंग खूप गँभिर होता जीवावर बेतू शकले असते, मात्र प्रसंग सावधान राखत रुपसिंग पाडवी यांनी स्वतः बरोबर इतरांचा जीव वाचविला व झाडांवर चढून स्वतला सुरक्षित ठेवले
नंदराज पाटील
पोलीस निरीक्षक तळोदा पोलीस स्टेशन
Comments
Post a Comment