प्रतिनिधी तळोदा

अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर येथे दिवंगत माजी मंत्री दिलवरसिंग पाडवी यांच्या 26 व्या पुण्यतिथीनिमित्त श्री सातपुडा वैभव विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालयाच्या प्रांगणात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातील दिलवरसिंग पाडवी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

        यावेळी तळोदा शहादा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, भाजपाचे अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विद्या विकास संस्थेचे अध्यक्ष नागेश पाडवी, अक्कलकुवा जिल्हा परिषद गटाचे सदस्य कपिल चौधरी, भाजपाचे जिल्हा संघटक निलेश माळी, भाजपाचे अक्कलकुवा तालुकाध्यक्ष तथा खापरचे उपसरपंच विनोद कामे, बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ.दिनेश खरात, माजी जिल्हा उपाध्यक्ष विश्र्वास मराठे,पं.स.सदस्य ॲड.सुधिर पाडवी,दलित आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बापू महिरे, संदिप मराठे, सामाजिक कार्यकर्ते उमाकांत पाटील, जयेश चौधरी, संस्थेचे उपाध्यक्ष किर्तीकुमार पाडवी, सचिव प्रभाकर ऊगले, सातपुडा वैभव विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय सूर्यवंशी, उपमुख्याध्यापक भालेराव भामरे, पर्यवेक्षक एस. डब्लू. चौधरी, अश्वत्थामा माध्यमिक विद्यालय ब्रिटिश अंकुशविहीर चे मुख्याध्यापक डॉ. जसपाल वळवी,जे.एस.झाल्टे, पेचरिदेव येथिल आश्रमशाळेचे मुख्याध्यापक कालिदास कोठावदे,शिंदे सर, नाभिक समाजाचे माजी जिल्हाध्यक्ष कथ्थुराम सैंदाणे,माजी सरपंच मांगिलाल जैन,विद्या विकास संस्थेचे संचालक महेश पाडवी,ग्रा.पं.सदस्य उमेश पाडवी, शेतकरी संघाचे संचालक हरिदास गोसावी,सेवा निवृत्त केंद्रप्रमुख बी आर बुवा,जयमल पाडवी,दिलिप परदेशी,वाण्याविहिरचे माजी सरपंच निलेश जैन, मुन्ना क्षत्रिय,हिरामण पाडवी,मोदलपाड्याचे सरपंच बळिराम पाडवी, विठ्ठल बागवे, भुपेंद्र पाडवी, देविदास वसावे, भाजपाचे युवा जिल्हा उपाध्यक्ष भूषण पाडवी,वैभव पाडवी,शुभम पाडवी,मनोज सोनार, लक्ष्मण वळवी, विनोद जैन, जेष्ठ पत्रकार वेस्ता पाडवी, पत्रकार किशोर मराठे, अखिल पत्रकार कल्याण बहुउद्देशीय संस्थेचे जिल्हाध्यक्ष योगेश्वर बुवा, देशदूत चे प्रतिनिधी चेतन इंगळे, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र गुरव, रक्तपेढीचे डॉ.हरिष कुकावलकर, डॉ.खलिल काझी,मनिष पवार,प्रकाश भोई तसेच विद्या विकास संस्थेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

      आमदार राजेश पाडवी यांनी आपल्या मनोगतातून यावेळी सांगितले की, नंंदुुुुरबार जिल्ह्यात सिकलसेल व गर्भवती महिलांना रक्ताची खुप गरज भासत असल्याने आदिवासी समाजातील तरूणांनी पुढाकार घेऊन रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.यावेळी नागेश पाडवी यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक अनिल जावरे यांनी केले.

 कालीचरण सुर्यवंशी

Comments

Popular posts from this blog

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहर अध्यक्ष म्हणतात भाजप मध्ये आता सर्व दुकान एकत्रित.....,पण भाजप मध्ये असलेल्या चार दुकानांचे काय ?