आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते राणीपुर मालदा येथील वनपट्टे धारकांना दाखले वाटप
तळोदा तालुक्यात आमदार राजेश पाडवी यांचा हस्ते अदिवासी बांधवाना वनपट्टे वाटप
तळोदा तालुक्यातील मालदा व राणीपुर गावातील बांधवाना शहादा तळोदा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार श्री राजेशजी पाडवी साहेब यांच्या हस्ते 35 ते 40 वर्षा पासुन प्रलंबित असलेले वनपट्टे वाटप करण्यात आले या वेळी नागरिकांनी समाधान व्यक्त केले या वेळी आमदार पाडवी बोलताना सांगितले सर्व प्रलंबित असलेले वनपट्टे देणाचे माझे प्रयत्न आहेत 40 ते 50 वर्षा पासुन प्रतिक्षेत असलेल्या बांधवानी चिंता करण्याची गरज नाही आपल्याला आपल्या हक्काच्ये वनपट्टे मिळतील यांचा साठी माझा प्रयत्न आहेत कोणालाही काही अडचणी येत असतील तर माझ्याकडे संपर्क करा असे सांगितले तसेच आज मालदा व राणीपुर या दोघा गावांमधील नागरिकांना 58 वनजमीन मंजुर प्रमाणपत्र वाटप केले तसेच रेशनकार्ड, उत्पन्नाचे दाखले, सातबारेही वाटप करण्यात आले. या वेळी शहादा तळोदा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार राजेश पाडवी, पंचायत समिती सभापती यशवंत दादा ठाकरे, जि.प.सदस्य प्रकाश दादा वळवी, तळोदा तहसीलदार वखारे साहेब, नायब तहसीलदार राठोड साहेब, संरपच युनियन अध्यक्ष बळीराम पाडवी,अदिवासी मोर्चा जिल्हा सचिव नारायण दादा ठाकरे, पंचायत समिती सदस्य दाज्या पावरा, पंचायत समिती सदस्य अनिल पवार, अशोक दादा वळवी, गणपत दादा पाडवी, मगलसिंग दादा, संरपच गोपी पावरा, उपसंरपच भाईदास वळवी, पोलीस पाटील सखाराम ठाकरे,संजु खर्डे, आबुलाल वळवी, फकीरा खर्डे, ईश्वर खर्डे, हिम्मत पवार, बाबुलाल पवार, मगन ठाकरे, बेताब पावरा, विठ्ठलराव बागले, प्रविण दादा वळवी, गुड्डू वळवी व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment