"कोरोनाच्या नावाने पक्षी गणनाचे चांगभलं "
"कोरोनाच्या नावाने पक्षी गणनाचे चांगभलं "
कोरोनाच्या बहाण्याने पक्षी गणना यंदा झालीच नाही
कालीचारण सूर्यवंशी/तळोदा
तळोदा वनक्षेत्रात मागील दोन वर्षपासून पक्षी गणनाच झाली नाही यंदा कोरोना च कारण सांगत वेळ मारून नेली असली तरी मागील वर्षी कोणतेही कारण नसताना या मोहिमेचा विसर वन विभागाला पडला होता यंदा देखील तोच प्रकार झाला असून
शासनाचा विविध योजना ज्या वन विभागाकडून राबविले जातात त्यात आर्थिक निधी तरतूद असते त्यात मात्र कागदावर वृक्षारोपण साठी फोटो शेशन करून फाईल केली जाते
मात्र तळोदा वनक्षेत्रात रानपिंगळा, गिधाड सारखे दुर्मिळ पक्षी असून देखील त्याच कोणतेही सोय सुतक वन विभागाला वाटत नाही हे दुर्देव म्हणावं लागेल
वास्तविक तळोदा वनक्षेत्रात दुर्मिळ वन्यजीव शोधण्यासाठी बाहेरून पक्षी मित्र भेटी देत असतात मात्र स्थानिक वनक्षेत्रपाल मात्र तळोदा वनक्षेत्रातील वैभवशाली होऊ शकणाऱ्या नोंदी घेण्यास निरुत्साही दिसून येत आहेत
ज्येष्ठ वनअभ्यासक मारुती चितमपल्ली यांच्या जन्मदिवस (५ नोव्हेंबर) ते पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांची आठवण म्हणून राज्यात अनेक ठिकाणी पक्षी मित्र व संघटनांच्या सहकार्याने वनविभागामार्फत हा सप्ताह मोठ्या उत्साहात राबविण्यात आला, मात्र तळोदा वनविभागाला त्याचा विसर पडला आहे.
तळोदा वनक्षेत्रात दुर्मिळ पक्षी -
पारवे, खंडया, हळद्या, शेकाट्या, पाणकोंबड्या, कवड्या कबुतर, साळूंक्या, करडा धोबी, वेडा राघो, घार, शिक्रा, भारद्वाज, लावऱ्या, चंडोल, तितर, खाटीक, सुतार, शिंगचोच्या, कोतवाल, बगळे, काळा शराटी, करकोचा, कोकिळ, सुगरण, चातक, सातभाई, पॅराकीट, मोर अश्या असंख्य पक्ष्यांचे अधिवास आहे. यापूर्वी तळोदा वनविभागाने पक्षी गणना करीत त्यादरम्यान आढळलेल्या विविध प्रजातींची नोंद केली आहे. त्यामुळे तळोदा वनविभागाने पक्षी सप्ताह राबविला असता तर विविध पक्ष्यांची सध्याची उपयुक्त माहिती मिळाली असती, मात्र आता ती मिळणार नाही. त्यामुळे वन्यजीव प्रेमीमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत
कोरोनातील बदल कळला असता
यावर्षी कोरोनाचा महामारीमुळे अनेक बदल घडले आहेत. कोरोना काळातील बदल पक्षी, प्राणी यांच्यासाठी उपयुक्त असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे. त्यामुळे कोरोनामुळे पक्ष्यांच्या जातींवर काही फरक पडला आहे का? कोणत्या पक्ष्यांची संख्या कमी किंवा जास्त झाली आहे? कोणत्या भागात कोणता पक्षी मोठ्या प्रमाणावर आढळतो? अशी उपयुक्त माहिती पक्षी सप्ताह दरम्यान मिळाली असती.
Comments
Post a Comment