शहादा येथील आर आर पटेल सौ दुर्गाताई तांबे महाराष्ट्र भुषण प्रेरणा पुरस्काराने सन्मानित

 शहादा येथील आर आर पटेल सौ दुर्गाताई तांबे महाराष्ट्र भुषण प्रेरणा पुरस्काराने सन्मानित

तळोदा : निसर्ग मित्र समिती तर्फे राज्यस्तरीय पर्यावरण परिषद दि 20 रोजी मालेगाव येथील आय एम ए सभागृह येथे संपन्न झाली असून शहादा येथील आर आर पटेल यांना संगमनेर नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे महाराष्ट्र भुषण प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.



             वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती धुळे व बागलाण तालुक्यातील आदर्श गाव टेभे ग्रामपंचायत जि. नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन करून पर्यावरणाचे राष्ट्रीय उपक्रमाला प्रोत्साहन देणे, वृक्षारोपण मोहीम, पाणी आडवा पाणी जिरवा, जलसंधारण तसेच एक गाव एक होळी प्रदूषण मुक्त दिवाळी जलपरिषद आदी अभियान यशस्वीपणे राबविणारे कार्यकर्ते व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पर्यावरणवाद्यांना प्रेरणा म्हणून महाराष्ट्र भूषण प्रेरणा जीवन गौरव पुरस्कार देण्यात येतो.

         याप्रसंगी  टेभे गावचे सरपंच रवींद्र अहिरे,निसर्ग मित्र समिती चे संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे आदी उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी