वाल्हेरी चा विकास होणार

प्रतिनिधी तळोदा
 सातपुद्याच्या भागात  आदिवासी शेतकरी बांधवांना व   इतर घटकांना  पाण्याची कायम सोय होऊन सिंचनाचा दृष्टीने या भागात नाम संस्था लवकरच काम हाती घेणार असून  या दृष्टीने  पाहणी करण्यासाठी वाल्हेरी भागात आमदार  राजेश पाडवी यांनी भेट देऊन पाहणी केली पर्यटन च्या दृष्टीने देखील इथं काय सुविधा देता येतील या बाबत पाहणी केळी,
दि,१०/१२/२०२० रोजी व्हालेरी ता तळोदा येथे,नाम फाऊंडेशनतर्फे  डँम प्रोजेक्टची पाहणी,शहादा तळोदा मतदार संघाचे मा,आमदार राजेशजी पाडवी साहेब, नाम फाऊंडेशनचे प्रतिनिधी जितू भाई शहादा यांनी २ किमी पायपीट करत प्रत्यक्ष जागेची पाहणी केली,

या प्रसंगी, मा,आमदार राजेशजी पाडवी,नाम फाऊंडेशन प्रतिनिधी जितू भाई,यशवंतदादा ठाकरे पं स सभापती तळोदा,बळीरामदादा पाडवी, विरसिंगदादा पाडवी,दाज्या पावरा पं स सभापती,यशवंत दादा पाडवी सरपंच सोमावल,विठ्ठल बागले,गोपी पावरा सरपंच मालदा,गुड्डू वळवी,विरसिंग दादा, अमरसिंग दादा,  भिमसिंग दादा, विक्रम पाडवी,आदि उपस्थित होते,
या बाबतीत नाम फोंडेशन चे मकरंद  अनासपुरे यांच्याशी चर्चा झाली असून  त्यांना सातपुड्यातील परिसरात काम करण्याबद्दल चर्चा झाली असून आमदार स्वतः या बाबतीत आग्रही असल्याने अनासपुरे यांनी होकार दर्शविला आहे

Comments

Popular posts from this blog

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहर अध्यक्ष म्हणतात भाजप मध्ये आता सर्व दुकान एकत्रित.....,पण भाजप मध्ये असलेल्या चार दुकानांचे काय ?