महाविकास आघाडीचे मते फुटली.... अमरीशभाईचा एकहाती विजय

महाविकास आघाडीची मते फुटली 
अखेर अमरीश भाई यांचा एकहाती विजय

कालिचरण सूर्यवंशी/तळोदा


          आज धुळे नंदूरबार विधानपरिषद जागेसाठी पोट निवडणुकीसाठी पार पडली असून  भाजपाचे अमरीश भाई यांचा दणदणीत विजय झाला आहे.धुळे नंदुरबार जिल्हातील काँग्रेस,राष्ट्रवादी, शिवसेना,अर्थात महाविकास आघाडीचे सदस्य संख्या बळ पाहता पैकी बहुसंख्य मतदारांनी भाजपचे उमेदवार अमरीश भाई  यांना  झुकते माप दिल हे निकालावरून सिद्ध झाले आहे.
       धुळे नंदुरबार जिल्हात काँग्रेसचे  प्रमुख काही निर्णय घेतांना व सहकार व पालिकेच्या निवडणूक असतील अश्या प्रसंगी अमररिष भाई यांनी शहादा सोबतच तलोद्यातील  काँग्रेस च्या स्थानिक लोकांशी असणारे सलोख्याचे संबध तर स्थानिक काँग्रेस मधील नेते देखील भाई आज भाजपात गेले असले तर व्यक्तिगत संपर्क व त्यांचा प्रति आदर अजूनही टिकून असल्याचे खाजगीत बोलताना काही नगरसेवकांशी बोलताना मागील काळात चर्चेतून दिसून आले  होते आज निकाल अंती ते स्पष्ट झाले आहे,
          विधानपरिषद निवडणूकीसाठी सदिच्छा भेटीस सुरुवात आठवडा भरापूर्वीच झाली होती.उमेदवाराकडून  मिठाई सोबतच पैठणी देखील भेट म्हणून दिल्याची  चर्चारंगत होती.एकूणच  राज्यातील बदलते राजकीय समीकरण व राजीनामा या मूळ  लागलेल्या या पोट निवडणूकित नगरसेवकांचा मताला महत्व प्राप्त झाले होते
        सर्व पक्षीय गणित पाहता महाविकास आघाडी च्या तिन्ही पक्ष प्रमुखांनी मत देण्याचे आवाहन जी, प, सदस्य सोबत नगरसेवकाना केले असले तरी देखील धुळे व नंदुरबार जिल्हात  सर्वच पक्षाचे इतर पक्षच्या नेत्यांशी वयक्तिक संबंध आहेत , त्यामुळं याचा फारसा परिणाम झालेला दिसून आलेला नाही.
पक्षपेक्षा राजकीय  संबध पाहून मतदान 
              अभिजित पाटील हे तरुण व अभ्यासू संयमी उमेदवार होते त्यांचा समोर अमरीश भाई हे  अत्यंत अनुभवी व मुरब्बी राजकीय व्यक्ती अशी लढत होती.धुळे नंदुरबार जिल्हातील स्थानिक स्वराज्यची पोटनिवडणूक मूळ दोघे जिल्हातील राजकीय स्थिती  व येणाऱ्या काळातील गणित काय असतील याचे संकेत देऊन जातात.
          तळोदा मधील काही नगरसेवकांचा भेटी गाठी उमेदवाराचे कार्यकर्ते  मागील काही दिवसांपासून  घेत होते.अवघे  काही महिने कार्यकाळ लाभणाऱ्या या निवडणूकित तळोदा पालिकेतील नगरसेवकांचा मताला म्हटव प्राप्त झालं  होत.तळोदा नगर पालिकेत  ११ नगरसेवक भाजप तर काँग्रेसचे ६ नगरसेवक व सेना १ असे  एकूण १८ मते आहेत तर  तर जिल्हा परिषद सदस्य ५  असे मतदान होते


मतांची गोळा बेरीज अंदाज चुकला ११५  सदस्य फुटले  -

 धुळे नंदुरबार जिल्हातील  दोन दिगग्ज उमेदवार असले तरी  राष्ट्रीय काँग्रेस ,राष्ट्रवादी कोंग्रेस, शिवसेना,  या तिन्ही पक्ष कडून अभिजित पाटील उमेदवारी करत होते तरी  या निवडणुकीत व्हीप निघत नसल्याने  सदस्य मतदार कोणालाही मतदान करू शकतात, त्यामुळं कोणत्या पक्षचे किती सदस्य अशी बेरीज न लावता कोणाचा संपर्क मजबूत यावर गणित  अवलंबून होते, मात्र भाईं पूर्व श्रमीचे काँग्रेस चे एक दिगग्ज नेते होते त्या काळात त्यांची जुळलेली नाळ त्यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर देखील जोडून ठेवली होती, तर काँग्रेस सोबतच इतर पक्ष मधील अनेक नेत्यांचे ते संकट मोचन  म्हणून होते व आजही आहेत,
          धुळे आणि नंदुरबार जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी सकाळी आठ वाजता मतदान मोजणी प्रक्रिया सुरू झाली. मात्र दहा वाजेपर्यंत निकाल देणे अपेक्षित होते. परंतु निकाल येण्यास उशिर झाला. भाजप विरुद्ध महाविकासआघाडी असा सरळ सामना या निवडणुकीत होता. भाजपकडून अमरिश पटेल तर महाविकासआघाडीकडून अभिजीत पाटील निवडणूक रिंगणात होते. ४३७ पैकी ४३४ मतदारांनी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानानंतर जी माहिती समोर आली आहे त्यावरून ही निवडणूक केवळ औपचारिकताच असल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या निवडणुकीकडे अपेक्षित लक्ष दिला नसल्याचे चित्र वेगळे दिसून आले.

 धुळे आणि नंदुरबार जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने  विजय मिळवला आहे. याठिकाणी काँग्रेसला मोठा फटका बसला. जास्त मतदान असूनही काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला. काँग्रेसची मते फुटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार पराभूत झाल्याची बोलले जात आहे.

विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे अमरिश पटेल हे विजयी झाले आहेत. १ डिसेंबरला या विभागात ९९ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर आज मतमोजणीअंती भाजपच्या उमेदवाराने काँग्रेसच्या उमेदवाराला धूळ चारल्याचे दिसून आले. धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचे अमरिश पटेल ३३२ मतांसह विजयी झाले. तर काँग्रेसचे अभिजित पाटील यांना केवळ ९८ मते मिळाली.  


 भाईनी अनेकांना स्वतःकडे वळविलें -

 अमरिश पटेल यांनी विरोधकांची ११५ मते फोडण्यात यश मिळवले. या निवडणुकीसाठी भाजपच्या १९९ तर महाविकास आघाडीच्या २१३ सदस्यांनी मतदान केले होते. त्यात महाविकास आघाडीच्या आणि विशेषत: काँग्रेसच्या ५०हून अधिक मतदारांनी क्रॉस व्होटिंग केले असल्याचे दिसून येत आहे. कारण काँग्रेसचे संख्याबळ १५७ असतानाही पाटील यांना केवळ ९८ मतेच मिळाली. तर, महाविकास आघाडीच्या अंदाजे ११५ मतदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचेही चित्र दिसत आहे. कारण महाविकास आघाडीची एकत्रित मिळून एकूण २१३ मते होती पण अभिजीत पाटील यांना शंभरीही गाठता आली नाही.  
         धुळे आणि नंदुरबार जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी सकाळी आठ वाजता मतदान मोजणी प्रक्रिया सुरू झाली. मात्र दहा वाजेपर्यंत निकाल देणे अपेक्षित होते. परंतु निकाल येण्यास उशिर झाला. भाजप विरुद्ध महाविकासआघाडी असा सरळ सामना या निवडणुकीत होता. भाजपकडून अमरिश पटेल तर महाविकासआघाडीकडून अभिजीत पाटील निवडणूक रिंगणात होते. ४३७ पैकी ४३४ मतदारांनी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानानंतर जी माहिती समोर आली आहे त्यावरून ही निवडणूक केवळ औपचारिकताच असल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या निवडणुकीकडे अपेक्षित लक्ष दिला नसल्याचे चित्र वेगळे दिसून आले.

Comments

Popular posts from this blog

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहर अध्यक्ष म्हणतात भाजप मध्ये आता सर्व दुकान एकत्रित.....,पण भाजप मध्ये असलेल्या चार दुकानांचे काय ?