वाळू वाहतुकीबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधीयांनी चिंतन करून निर्णय घेण्याची गरज

वाळू वाहतुकीबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधीयांनी चिंतन करून निर्णय घेण्याची गरज 

कालीचरण सूर्यवंशी/ तळोदा:

           तळोदा नंदुरबार रस्त्यावर वाळू वाह तूक विषय आता नवीन राहिला नसून अनेक तक्रार होऊन देखील हि वाहतूक काही केल्या शिस्तबद्ध होत नाही. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी याबाबत चिंतन करून निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

           तळोदा कडून नंदुरबार जात  असतांना नंदुरबार प्रांत अधिकारी वसुमना पंत यांच्या शासकीय वाहनाला एका मद्यपी ट्रक चालकाने कट मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, मंगळवारी सकाळी १०,३० वाजेच्या सुमारास तळोदा येथून नंदुरबारकडे आपल्या शासकीय वाहनातून जात असताना वाळू वाहतूक करणारा एक खाली ट्रक नंदुरबार कडून हातोडा कडे येत होता.  के.डी.गावीत हायस्कूलच्या अलीकडे  वाहन चालकाने अचानकपणे या शासकीय वाहनावर वाहन टाकले.. वसुमना पंत यांचे वाहन चालक रोशन मोरे याने समोरील वाहनास सिग्नल दिला मात्र त्याच्या त्यावर परिणाम झाला नाही व त्याने वाहन पंत मॅडम यांच्या वाहनांवर आणले. दरम्यान वाहन चालकाने प्रसंग अवधान राखत वाहन रस्त्याच्या खाली उतरवून वाहन स्वतः व प्रांताधिकारी नंदुरबार वसुमना पंत यांना वाचविले. त्या नंतर वाहनांचा साधारणतः 2 किलो मीटर  पाठलाग करून त्या वाहनास थाबवले. व संबंधितास उपनगर पोलीस स्टेशन येथे पोलिसांच्या ताब्यात देऊन त्यावर कारवाई करण्यात आली. दरम्यान यावेळी वाळू वाहतूक करणारे वाहन चालक हा मद्यपान करून वाहन चालवित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

वाळू वाहतुकीमुळे जिल्ह्यात रस्त्यांची दुरवस्था होत आहे.

वाहू वाहतूक करताना अधिक वेगाने वाहतूक होत असल्याने वाळू वाहतुकीबाबत सामान्य नागरिकांचा रोष वाढला आहे. यातच वाहने अंगावर आणणे, कट मारणे असले प्रकार नित्याचे झाले आहेत.यापूर्वी देखील तळोदा ते नंदुरबार मार्गावर वाळू वाहतुकदारांनी रूग्णवाहिकेच्या रस्ता मोकळा न केल्यामुळे रुग्णांच्या जीव धोक्यात आला होता. काल घडलेल्या प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण झाली असून आय.एस. दर्जाच्या अधिकाऱ्याच्या वाहनाला कट मारला जातो तर सर्वसामान्यांचे काय असा बिकट प्रश्न याप्रसंगी उपस्थित केला जात आहे

जीव मुठीत घेऊन प्रवास -

 परवा पण तळोद्यातील भाजीपाला घेऊन येणाऱ्या वाहनाला कट मारून पसार झाला  रेती ने भरलेला ट्रक असल्याचे वाहन चालका कडून सांगण्यात आले

आम्ही तीन जण होतो थोडक्यात आमचा जीव वाचला  असल्याचे चालकाने सांगितले




Comments

Popular posts from this blog

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहर अध्यक्ष म्हणतात भाजप मध्ये आता सर्व दुकान एकत्रित.....,पण भाजप मध्ये असलेल्या चार दुकानांचे काय ?