साहेबांचा सोबत चलता का ? तळोद्यात मॅरेथॉन मिटिंग......
साहेबांचा सोबत चलता का ? तळोद्यात मॅरेथॉन मिटिंग......
आमची तर संघटन स्तरावर मिटिंग.... नाथाभाऊंचा विषयच नाही !!!
-एक जेष्ठ नेत्यांची प्रतिक्रिया
तळोदा/कालीचरण सूर्यवंशी
एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधे जाण्याचे स्पष्टपणे संकेत माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी दिल्यानंतर त्यांचा सोबत प्रवेशबाबत चर्चा देखील सुरू झाली आहे. धडगाव ,अक्कलकुवा, तळोदा , शहादा, या पट्ट्यातील असंख्य जुने कार्यकर्ते जे नाथाभाऊंचा जुन्या भाजप मधील पठडीतील होते,त्यांना आता विचारात पाडले असून सोबत जायच की आहोत तिथं राहायचे या बाबतीत मंथन साधारण दोन तास चालली. मात्र, त्यात काय निर्णय झाला हे अजूनही गुलदस्त्यात आहे.
या मीटिंगमध्ये शहादा, अक्कलकुवा, तळोदा येथील भाजपचे दिगग्ज नेते उपस्थित होते.अधिक माहिती घेतली असता सदर मिटिंग फक्त संघटन पातळीवर समज-गैरसमज दूर करण्यासाठी घेण्यात आली होती.दरम्यान, नाथाभाऊंचा प्रवेश बाबत चर्चा असतांना दरम्यान या मिटिंग कडे वेगळ्या दृष्टीने बघितलं जात आहे.मात्र, खडसे साहेबांचा विषय एका जेष्ठ नेत्याने या वेळी छेडला असता सर्वच जण स्तब्ध झाले कोणीही प्रतिक्रिया दिली नसली तरी हि मिटिंग "नाथाभाऊंचा मॅसेज आलाय चला,सोबत न्याय मिळेल" या दृष्टीने मिटिंग झाली असून त्यात कोणी किती प्रतिसाद दिला हे लवकरच समजेल......
दरम्यान,जिल्हातील भाजप मधील अंतर्गत वाद व गटबाजी लपलेली नाही.त्या दृष्टीने हि मिटिंग झाली असल्याचे सांगण्यात आले असले तरी त्याला नाथाभाऊंचा राष्ट्रवादी प्रवेश बद्दल किनार दिसून आली आहे.त्यात भाजप पक्षात जे होईल ते सहन करू पण पक्ष सोडणार नाही अशी भूमिकेत काही नेते दिसले तर काही जाण्याचा तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत
या मिटिंग मध्ये भाजपचे जेष्ठ नेते प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ शशिकांत वाणी,माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी,नगराध्यक्ष अजय परदेशी,जेष्ठ नेते विश्वनाथ बापूजी कलाल,तळोदाचे तालूकाध्यक्ष प्रा विलास डामरे, राजेंद्र राजपूत, सदस्य सुनिल पावरा,दिनेश खंडेलवाल,अतुल जयस्वाल, पंचायत समिती सदस्य विजय राणा,शहाद्याचे डॉ किशोर पाटील,नवापुरचे एजाज शेख, नंदूरबारचे शरद साठे,यांच्या सह कार्यकर्ते व नेते बैठकीत सहभागी झाले होते...
Comments
Post a Comment