ऑन. लाईन सभेस काँग्रेस गट कडून विरोध जिल्ह्याधिकारी यांच्या कडे दाद मोकळ्या जागेत सभा घेण्याची मागणी
प्रतिनिधी तळोदा
तळोदा नगरपरिषद च्या ऑन लाईन सभेस काँग्रेस च्या गट कडून लेखी स्वरूपात विरोध दर्शवत सुरक्षित अंतर ठेवून सभा घेणे बाबत मागणी जिल्हाधिकारी यांच्या कडे करण्यात आली आहे,
जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष यांनी ६ ऑक्टोबर २०२० रोजी सर्वसाधारण सभेची सूचना नमुना अ अजेंडा प्रसिद्ध केला आहे. यात पालिकेची १४ ऑक्टोबर रोजी होणारी सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने ऑनलाईन घेण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग यांनी 3 जुलै २०२० रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार सभा घेत असल्याचे त्यात म्हटले आहे.
परंतु व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने मागील झालेल्या सभेच्या अनुभव पाहता अनेक नगरसेवकांना आपले मत मांडण्याची संधी मिळाली नाही. तसेच आर्थिक स्वरूपाचे निर्णय घेण्यात आल्याचे आम्हाला कळले देखील नाही. नेटवर्क प्रॉब्लेम मुळे अनेकांना सभेत हजर होता आले नाही. परिणामी मत मांडण्याची इच्छा असून सुद्धा मत मांडता आले नाही. शासनाने वेळोवेळी नियमात शिथिलता आणली आहे. सर्व नियमांचे पालन करून नगर पालिकेच्या आवारात सभा घेता येत असताना सुद्धा टाळाटाळ करण्यात येत आहे.
सभागृहात प्रत्येक लोकप्रतिनिधीला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमुळे मत मांडता येत नाही. गोंधळ उडतो व सोयीस्कर पणे निर्णय घेण्यात येतात. मागील सभेत ५० पेक्षा जास्त विषय असलेली सभा फक्त सात मिनिटात आटोपती घेण्यात आली. सर्वच विषय चर्चा न होता गोंधळ होऊन मंजूर करून घेण्यात आले. तळोदा पालिकेकडे पुरेशी जागा असून सुरक्षित अंतरावर प्रत्येक सभासदास बसवून सभा घेता येऊ शकते.
असे असताना सत्ताधारी आपल्या सोयीचे निर्णय घेता यावे व विरोधकांना मत मांडता न यावे याकरिता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने ऑनलाईन सभा घेत आहेत. खर्चाच्या तुलनेत पालिकेच्या मोकळ्या जागेतच मंडप टाकून सर्व नियमांचे पालन करून कमी खर्चात सभा घेता येऊ शकते. त्यामुळे याबाबत मुख्याधिकारी तळोदा यांना सूचना कराव्यात व सभा पालिकेच्या मोकळ्या जागेत सर्व नियमांचे पालन करून घेण्यात बाबत सूचना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर पालिकेचे काँग्रेसचे नगरसेवक व प्रतोद संजय माळी , गटनेते गौरव वाणी , नगरसेवक सुभाष चौधरी , हितेंद्र खाटीक ,नगरसेविका कल्पना पाडवी ,अनिता परदेशी व स्विकृत नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी यांच्या सह्या आहेत. मा, जिल्हाधीकारी याना
निवेदन देताांना काँग्रेेेसचे
प्रतोद संजय माळी , गटनेता गौरव वाणी ,हितेंद्र क्षत्रिय, संदीप परदेशी, जितेंद्र माळी,
Comments
Post a Comment