अखेर पालिकेची सभा ऑन लाईनच जिल्हाधिकारी यांच्या सूचना
तळोदा नगर परिषदेची दि. 14 रोजी होणारी सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे न घेता सोशल डिस्टंसिंगचे पालन करून घेण्याची मागणी प्रतोद तथा नगरसेवक संजय माळी व 6 नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे केली होती.
त्यावर, नगर विकास विभागाचे संदर्भीय दि. 3 जुलै 2020 रोजी च्या पत्रान्वये महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायती अधिनियमातील तरतुदीनुसार नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या विविधसभा, बैठका नियमितपणे केवळ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे घ्याव्यात अशा सूचना दिलेल्या आहेत.
नगर विकास विभाग यांचे संदर्भीय पत्र 3 जुलै 2020 रोजीच्या पत्रान्वये दिलेल्या निर्देशानुसार आगामी सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे आयोजित करावी परंतु श्री संजय बबनराव माळी, प्रतोद तथा नगरसेवक व इतर 6 नगरसेवक 14 तळोदा नगर परिषद यांच्या तक्रारीनुसार नेटवर्क समस्यांमुळे सभेत कोणतीही अडचण निर्माण होणार नाही तसेच सभेबाबत सर्व शासन नियमाप्रमाणे कारवाई होईल याची खातरजमा करण्याचे मुख्याधिकारी तळोदा यांना सांगण्यात आले आहे.
Comments
Post a Comment