*नाशिक विभागीय नवनिर्वाचित शिक्षण उपसंचालक नितिन उपासनी यांची नंदुरबार जिल्ह्यातील शैक्षणिक विषयांवर आढावा बैठक संपन्न....!!*
मार्च २०२१ मध्ये हाेणाऱ्या इ.१० वी १२ वी च्या परीक्षा, नवीन केंद्र मागणी प्रस्तावातील शाळांना भेटीसाठी व शैक्षणिक विषयांवर चर्चा करण्यासाठी नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक श्री नितिन उपासनी दि.१७ आक्टाेबर २०२० राेजी नंदुरबार जिल्हा दाेैऱ्यावर आले हाेते.त्यावेळी नंदुरबार शहरातील यशवंत विद्यालय येथे परीक्षेचे नियाेजन व शैक्षणिक विषयांवर चर्चा करण्यात आली.त्यावेळी जिल्ह्यातील मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष मुकेश पाटील , सचिव पुष्पेंद्र रघुवंशी,शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष डी.पी.महाले ,कार्यवाह ईसरार सर ,संस्था चालक संघटनेचे रूपेश चाैधरी ,डी.एन.नांद्रे,उच्च माध्यमिक संघटनेचे प्रा.निशिकांत शिंपी,प्रा.बागुल सर,शिक्षक संघटनेचे सचिव एस.एन.पाटील व जिल्ह्यातील मुख्याध्यापक शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आदिंचा उपस्थितीत काेराेना प्रतिबंधक उपायांचे पालन करून शैक्षणिक विषयांवर चर्चा करण्यात आली.
नंदुरबार जिल्ह्यातील, जिल्हा मुख्यध्यापक संघ, जिल्हा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ नाशिक विभाग नाशिक. व जिल्हा शिक्षकेतर संघटना, जिल्हा संस्थाचालक संघटना, नंदुरबार जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना आणि नंदुरबार जिल्हा उच्च माध्यमिक शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक श्री नितिन उपासनी साहेब यांना नंदुरबार जिल्ह्यातील शैक्षणिक अडी-अडचणी व शासनाने वेळाेवेळी शाळांच्या संदर्भात घेतलेले अनैसर्गिक निर्णय रद्द हाेण्यासाठी व आऊट साेर्सिंगद्वारे शिक्षकेतर कर्मचारी भरती दि.३० सप्टेंबर २०२० च्या शासन निर्णय व इयत्ता ५ वी चा वर्ग प्राथमिक शाळेला जाेडणे त्यामुळे सन् २०१८-१९ प्रयाेगशाळा कर्मचारी, ग्रंथपाल, लिपिक, शिपाई कर्मचारी आदि पदे विद्यार्थी संख्येमुळे व्यपगत हाेतात. त्यामुळे शिक्षकेतर अतिरिक्त हाेतात. २४ वर्षे कालबद्ध पदाेन्नतीचे न्यायालयीन निकालानुसार वेतन निश्चिती हाेणे. दि. १ जानेवारी २०१६ पूर्वी ज्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २४ वर्षे पूर्ण हाेतात त्यांना विनाअट कालबद्ध वेतनश्रेणी मिळावी. ज्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपली शैक्षणिक पात्रता वाढविली असल्यास त्यांना विनाअट प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाकडे नियमित वेतनश्रेणीत मान्यता देणे. प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक विनाअनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार आदिवासी जिल्ह्यासाठी १०० % अनुदान मिळावे. काेवीड १९ च्या महामारीत शैक्षणिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आराेग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ मिळावा. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा १०,२०,३० या वर्षातील कालबद्ध पदाेन्नतीनुसार वेतनवाढ मिळावी. आदि मागण्यांचा नंदुरबार जिल्हा विविध शैक्षणिक संघटनेकडून शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी निवेदन देण्यात आले.
त्यावेळी नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे सचिव पुष्पेंद्रभैया रघुवंशी,यशवंत विद्यालयाचे प्राचार्य शिवाजीराव पाटील, जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष डी.पी.महाले, कार्यवाह ईसरार अली सय्यद,उपाध्यक्ष जुबेर सर,खजिनदार जयेशभाई वाणी,नरीभाई भाऊसाहेब,गुंजनभाई शहा,तसेच जिल्हा संस्थाचालक संघटनेचे रुपेश चाैधरी, डाँ.एन.डी.नांद्रे, फटकाळ सर, माध्यमिक शिक्षक संघटनेचे कार्यवाह एस. एन. पाटील,एन.डी.पाटील,उच्च माध्यमिक जिल्हा संघटनेचे जेष्ठ नेते प्राध्यापक निशिकांत शिंपी, महिला काँलेज नंदुरबार चे प्रा. बागुल सर, प्रा.साेनवणे, प्रा.प्रसाद शिंपी आदि कार्यकर्त्यांनी महाशय शिक्षण उपसंचालक नितिन उपासनी साहेब ( नाशिक विभाग. नाशिक) यांना निवेदन सादर केले.
ह्या आढावा बैठकीत यशवंत विद्यालयाचे प्राचार्य शिवाजीराव पाटील व त्यांचे सर्व शालेय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच पी.के.अण्णा पाटील माध्यमिक विद्यालयाचे फटकाळ सर,जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचारी,मुख्याध्यापक संघटनेचे पदाधिकारी,माध्य.व उच्य माध्य.शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व जिल्हा संस्थाचालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित हाेते.
Comments
Post a Comment