अक्कलकुवाला नगर पंचायत स्थापन करण्याबाबत जिल्हाधिकारी नंदुरबार यांचे प्रधान सचिवांना पत्र
कालीचरण सूर्यवंशी/तळोदा
अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार या तालुका मुख्यालयाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी नवीन नगरपंचायत स्थापन करणे बाबत प्रधान सचिव नगर विकास विभाग यांना पत्र देण्यात आले आहे
अक्कलकुवा या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र, ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रांमध्ये संक्रमित होणारे क्षेत्र आणि तालुका मुख्यालय असल्यामुळे हे संक्रमणाचे क्षेत्र म्हणून विर्निदिष्ठ करण्याच्या आणि उक्त स्थानिक क्षेत्रासाठी अक्कलकुवा नगरपंचायत या नवीन नगरपंचायत घटित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 चे कलम 341 क चे पोटकलम (1),1क व आणि 2 याद्वारे अधिसूचना काढण्याची उद्घोषणा शासन राजपत्रात काढण्यात आली होती. अक्कलकुवा ग्रामपंचायतीला नगरपंचायतीच्या दर्जा देताना जिल्हा परिषद अक्कलकुवा मतदार गटाचे सर्व क्षेत्र व पंचायत समिती अक्कलकुवा व मकरांनीफळी मतदार गणाचे सर्व क्षेत्र समाविष्ट होत असल्याने सदर क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पदाधिकारी यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचे सदस्यत्व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या अनुक्रमे कलम 255 व 257 अन्वये पदाधिकाऱ्यांना ग्रामविकास विभाग व जलसंधारण विभाग याचे कडील दि 15 जुलै 2020 अन्वये पदावरून दूर करण्यात आले होते
अक्कलकुवा नगरपंचायत बाबत उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे श्री इंद्रसिंग राणा व इतर यांनी रिट याचिका दाखल केली होती सदर न्यायालयीन प्रकरणी सहा शासकीय अभियोक्ता मा उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी माननीय न्यायालयाच्या मान्यतेने दिनांक 2 डिसेंबर 2015 रोजीच्या पत्रान्वये अक्कलकुवा ग्रामपंचायतीचे नगरपंचायत मध्ये रूपांतर करताना महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 मधील नियम 342 चे उल्लंघन अधिनियमातील कलम 3 व 341 अ अन्वये कागदपत्रांची प्रसिद्धी न करणे , ग्रामपंचायत साठी आवश्यक तुल्यसंख्या बळ नसल्याचे कळवले होते नियमानुसार कार्यवाही न झाल्याने राज्य शासनाकडून अधिसूचना अस्थगित करण्याचा दिलेल्या माहितीनुसार मा उच्च न्यायालय ने दि 4 डिसेंबर 2015 रोजी च्या आदेशान्वये रिट याचिका रद्द केली होती त्यानंतर नगर नगर विकास विभाग यांच्याकडील अधिसूचना दिनांक 9 जानेवारी 2017 अक्कलकुवा नगरपंचायत निर्मिती बाबत कार्यवाही करणेकमी अक्कलकुवा नगरपंचायत निर्मिती अधिसूचना दि 15 जुलै 2015 ही रद्द करण्यात आली होती.
अक्कलकुवा ग्रामपंचायतीचे क्षेत्र हे तालुका मुख्यालयाचे क्षेत्र आहे महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 341 नुसार ग्रामीण क्षेत्रामधून नागरी क्षेत्रात संक्रमित होत असलेल्या क्षेत्र आहे संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विर्दीनिष्ठ करता येते कलम 341(1) नुसार राज्य शासनाच्या राज्यातील अधिसूचनेद्वारे जिल्हा मुख्यालय किंवा तालुका मुख्यालय असलेले क्षेत्र संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून घोषित करता येते अक्कल्कुवा ग्रामपंचायतीचे क्षेत्रफळ 228 हे इतके आहे अक्कलकुवा ग्रामपंचायतीची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार 29887 इतकी आहे पैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या 147 व अनुसूचित जमाती ची संख्या 3776 इतकी आहे सद्यस्थितीत अक्कलकुवा ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या विचार केला तर त्याच्या आलेख निश्चितच वाढता असेल अक्कलकुवा ग्रामपंचायत पासून जवळच तळोदा नगरपरिषद असून अंतर 20 किमी आहे
जिल्ह्यातील कोविड-19 विषाणूंचा प्रादुर्भाव बाबत सर्वांगिक आढावा घेतला असता नगरपरिषद नगरपंचायत क्षेत्रात पुरेशी व्यवस्था असल्याने विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात राखण्यात बऱ्याच अंशी यश आले आहे. त्याविपरीत अक्कल्कुवा या तालुक्यात मुख्यालय क्षेत्रात ग्रामपंचायत अस्तित्वात असल्याने कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यात बऱ्याच अडचणी येत आहेत अक्कलकुवा तालुका मुख्यालयाच्या जागी वास्तव्यास असलेल्या नागरिकांना उच्च गुणवत्तेचे नागरी सुविधा उपलब्ध करून देणे कावे सदर ठिकाणी नगरपंचायतीची निर्मिती करणे आवश्यक आहे.
ग्रामपंचायत अक्कलकुवा तालुका अक्कलकुवा येथे दिनांक 7 ऑक्टोबर 2017 रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकी पार पडल्या होत्या आज रोजी सदर निवडणुकीला दोन वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेला आहे अक्कलकुवा ग्रामपंचायत हे तालुका मुख्यालयातील ठिकाण आहे नगरपालिका विभाग यांच्याकडील दिनांक 9 जानेवारी 2017 रोजीच्या अधिसूचना नुसार अक्कल्कुवा या ग्रामपंचायत क्षेत्राचे नगरपंचायत क्षेत्रात रुपांतर करणे बाबत कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे याबाबत आपल्या स्तरावरून निर्देश होण्यास विनंती
या अगोदर 2017 ला नगर पंचायत झाली होती मात्र काही स्थानिक नेते न्यायालयात गेले होते त्या मूळ तो विषय स्थगित होता आता परत प्रशासन स्तरावर प्रयत्न गतीमान झाले आहेत.या बाबतीत संदीप मराठे यांनी सतत पाठ पुरावा केला होता
Comments
Post a Comment