अक्कलकुवा नगर पंचायत बाबत हालचाली गतिमान 

एक जी, प , सदस्य तर दोन पं,स, सरपंच सह १४ सदस्यांचे भविष्य टांगणीला ?


कालीचरण सूर्यवंशी/तळोदा

 गुजरात मध्यप्रदेश च्या दुर्गम भागाचा सीमेवर तालुक्याचे प्रमुख केंद्र असणाऱ्या अक्कलकुवा इथं ग्राम पंचायत असून या  बाबत शहराचा विकासासाठी  नगर पंचायत च्या  १५-६-२०१५ रोजी आदेश काढण्यात आला होता,  वॉर्ड रचना होऊन निवडकीच्या ऐनवेळी मात्र स्थानिक काही राजकीय पदाधिकारिंनी या आदेश वर आक्षेप नोंदत न्यायालयात दाद मागितली होती, त्यामुळं  या निवडणुकीला स्थगिती देऊन ग्राम पंचायत पद्धतीने निवडनुक घेण्यात आली होती, 

दरम्यान आता या बाबतीत   स्थानिक नेत्यांनी न्यायालय सोबतच नगर विकास खाते तसेच तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या कडे सतत पाठपुरावा केला होता, 

या निवडकीला दोन वर्षे उलटून गेल्याने जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी प्रधान सचिव यांच्या कडे पत्र पाठवून  नगर पंचायत करण्याबाबत अवगत केले आहे त्या मुळे आता    लवकरच नगर विकास खात्याकडून निवडणूक कार्यक्रम पुनः एकदा जाहीर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत,



एक जी,प, व दोन पं, स,सदस्यांचे काय होणार ?

दरम्यान ग्राम पंचायत क्षेत्रात असल्याने  निवडुन आलेले एक जी,प, सदस्य व दोन पंचायत समिती सदस्य व  अक्कलकुवा सरपंच सह १४ सदस्य यांच पद धोक्यात आले असून नगर पंचायत क्षेत्रात अक्कलकुवा गेल्यास व तिथं निवडणूक लागल्यास हे तिन्ही प्रमुख  पदसह  सरपंच सह १४ सदस्त  नियमित प्रक्रिये नुसार रद्द होण्याची चिन्ह आहेत, त्यामुळं ते पुन्हा न्यायालयात धाव घेतील का ? या बाबतीत  जोरदार चर्चा सुरू आहे।                  अक्कलकुवा नगर पंचायत क्षेत्र झाल्यास निश्चितपणे शहराचा विकासासाठी  निधी उपलब्द होईल त्याच बरोबर मुख्यधिकारी म्हणून प्रशासन पाहणारा सक्षम अधिकारी मिळाल्यास  शहराल ची वाढ शिस्तबद्ध पद्धतीने हद्द वाढ होईल व कामात शिस्त येईल


दोन वेळा निवडनुक  -

२०१७  नगर पंचायत निवडनुक  स्थगित झाल्यावर  ग्राम पंचायत निवडणूक थेट सरपंच पद्धतीने घेण्यात आली यात भाजप पुरस्कृत उमेदवार निवडून आलेल्या सरपंच चे शहरात अतिक्रमक असल्या बाबत तक्रार झाल्याने सरपंच पद रद्द करण्यात आले होते, त्यामुळं पुन्हा निवडणूक घेण्यात आली    त्यात थेट सरपंच निवडणुकीत एम,आय,एम पुरस्कृत उमेदवाराने  विजय प्राप्त  केला आहे,


आता नगरविकास खात्याकडे लक्ष लागून - दरम्यान जिल्हाधिकारी यांनी पत्र व्यवहार केल्याने आता नगर पंचायत निवडणूक ।कार्यक्रम कधी लागतो या कडे लक्ष लागून आहे




Comments

Popular posts from this blog

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहर अध्यक्ष म्हणतात भाजप मध्ये आता सर्व दुकान एकत्रित.....,पण भाजप मध्ये असलेल्या चार दुकानांचे काय ?