एकनाथराव खडसे यांच्या आदेशानेच मी राष्ट्रवादीत ,,,,,, माजी आमदार उदयसिंग पाडवी ,,,, नाथाभाऊंचा प्रवेशाचे संकेत ?


 एकनाथराव खडसे यांच्या आदेशानेच राष्ट्रवादीत प्रवेश केला असून आम्ही सर्व मिळवून संघटन वाढविणार असल्याचे  माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी  प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे,
   राष्ट्रवादी काँग्रेस ची आढावा व इतर चर्चा साठी माजी आमदार उदयसिंग पाडवी यांच्या निवासस्थानी जिल्हाअध्यक्ष अभिजित मोरे व स्थानिक पदाधिकारी यांची बेठक झाली त्या बाबत पाडवी यांनी प्रेस काढली आहे त्यात त्यांनी स्पष्टपणे उल्लेख करत एकनाथराव खडसे  प्रवेश करणार असल्याचे संकेत देऊन टाकले
 यावरून एकंदीतर मागील काळात भाजप मधील उत्तर  महाराष्ट्रचे जेष्ठ नेते एकनाथराव  खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील प्रवेश चर्चेला पुष्टी मिळते, 
मुबंई इथं देखील ते राष्ट्रवादी चे सर्वंसर्वां शरद पवार यांची भेट घेणार  असल्याचे वृत्त होते,
              
एकनाथराव खडसे  व उदयसिंग पाडवी यांचे ऋणानुबंध तसे जुने असून शहादा तळोदा मतदारसंघात उमेदवारीच्या पासून तर आमदारकी निवडणूक व पांच वर्षातील त्यांचा कार्यकाळात प्रत्येक महत्वाचा निर्णय असो अथवा इतर राजकीय विषय एकनाथराव खडसे यांच्या सल्ला  उदयसिंग पाडवी यांचा साठी मोलाचा असायचा
भाजप शिवसेना सत्तेत असतांना एकनाथराव खडसे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार होता त्यावेळी उत्तर महाराष्ट्र मधुन एकनाथराव खडसे यांनी राजीनामा दिल्यास  मी देखील राजीनामा देणार अशी परखड भूमिका त्यांनी प्रथम घेतली होती  अशी भूमिका घेणारे पहिला आमदार म्हणून भाजपात वरिष्ठ पातळीवर त्यांचा नावाची चर्चा झाली होती,
  शहादा तळोदा मतदार संघात त्यांना उमेदवारी  न मिळाल्याने
 भाजप वर उघड नाराजी व्यक्त करत भाजप वर आरोप केले होते, त्यात एक आरोप हा देखील केला होता की नाथाभाऊ यांच्यावर अन्याय झालाच पण मी त्यांचा गटातील म्हणून माझं पण तिकीट पक्षाने कापले असा घणाघात त्यांनी त्या वेळी केला होता , व तडकाफडकी त्यांनी काँग्रेस च्या तिकिटावर  नंदुरबार मतदार संघातून निवडणूक लढवली मात्र ते पराभूत झाले होते,
 दरम्यानच्या काळात ते सतत एकनाथराव खडसे यांच्या संपर्कात होते,
सतत मुक्ताईनगर इथं भेटी गाठी सुरू होत्या ,
   त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश च्या वेळीच या बाबत राजकीय अंदाज बांधले गेले होते मात्र आता त्यांनी स्वतःच खडसे साहेबांचा आदेश होता म्हणून राष्ट्रवादीत आल्याचे प्रसिद्ध पत्रकात म्हटले असल्याने 
आता एकनाथराव खडसे राष्ट्रवादीत जाणार हे  स्पष्ट होते,



 या बाबतीत  उदयसिंग पाडवी यांच्याशी  दूरध्वनी वरून संपर्क केला असता त्यांनी सांगितले की एकनाथराव खडसे माझे मार्गदर्शक असून  त्यांचा सूचनेनुसारच मी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश घेतला असला तरी ते मोठे नेते असल्याने काय निर्णय घेतील हे  मी सांगू शकत नाही,

 कालीचरण सुर्यवंशी 
9421887715
7057887715

Comments

Popular posts from this blog

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहर अध्यक्ष म्हणतात भाजप मध्ये आता सर्व दुकान एकत्रित.....,पण भाजप मध्ये असलेल्या चार दुकानांचे काय ?