सातपुड्यातील रानमेव्याला देखिल कोरोनाचा फटका
कोरोनाच्या धास्ती : सिताफळ खरेदीकडे ग्राहकांची पाठ
: सातपुड्याच्या रानमेवा म्हणून प्रसिद्ध असलेले सीताफळ बाजारात दाखल झाले असून कोरोनाच्या धास्तीमुळे ग्राहकांनी सिताफळ खरेदीकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.त्यामुळे सातपुड्यातील रानमेव्याला देखिल कोरोनाचा फटका बसला आहे.
सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात सीताफळाचे उत्पन्न घेतले जाते धडगाव तालुक्याचा व अक्कलकुवा व तळोदा तालुक्यात तील पर्वतरांगात मोठ्या प्रमाणात सीताफळाची झाडे असून साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यात सीताफळ विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल होत असतात. रासायनिक खतांचा वापर न करता संपूर्ण सेंद्रिय व नैसर्गिकरित्या पिकवलेली सातपुड्यातील गावरान सीताफळांच्या गोडवा व रसाळपणा अधिक असल्याने सातपुड्यात उत्पादित होणाऱ्या सीताफळाला जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्र व शेजारील गुजरात राज्यात मोठी मागणी असते.
तळोदा, अक्कलकुवा,शहादा,खापर,बोरद, इत्यादि शहराच्या ठिकाणी सातपुड्यात शेतकरी हे रात्रीपासून सीताफळ विक्रीला आणत असतात.रात्रीच संपूर्ण सीताफळ विक्री होत असायची तर पहाटे विक्रीसाठी आणणाऱ्यांची सीताफळ देखील सकाळी दहा वाजेपर्यंत पूर्ण विकली जास्त असायची. परंतु यावर्षी संपूर्ण दिवसभर बसून देखील सीताफळ विक्री होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
कोरोना विषयीच्या प्रादुर्भावामुळे खवय्ये व व्यपारी यांनी खरेदीकडे यावर्षी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे सिताफळा मुळे सर्दी ताप खोकला यांसारख्या आजारांचा संसर्ग होऊ नये म्हणून अनेक जण सीताफळ खाणे टाळत असल्याचे सांगितले जात आहे त्याच्यात थेट परिणाम सिताफळ खरेदी-विक्रीवर झाला आहे. शुक्रवारच्या आठवडे बाजारात देखिल त्याचा प्रत्यय आला.बाजाराचा दिवस असताना देखील दिवसभर सीताफळ घेऊन बाजारात बसावे लागल्याचे दिसून आले.
सातपुड्यात दरवर्षी अनेक व्यापारी गाड्या घेऊन सीताफळ खरेदी करायला जात असायचे.हंगामात रोज सिताफळाची वाहने भरून सातपुड्यातून विक्रीसाठी बाहेर पडत असत. परंतु यावर्षी बाजारपेठेत सिताफळांना मागणी नसल्याने व्यापाऱ्यांनी देखील खरेदीसाठी सातपुड्यात जाणे टाळले असल्याचे दिसून येत आहे.
दरवर्षी सुरुवातीपासून सीताफळाला मोठी मागणी असते.सकाळी आठ-नऊ वाजेपर्यंत सर्वांची सीताफळे संपूर्ण विकली जायची.मात्र यावर्षी सीताफळांची मागणी कमी आहे.कोरोनाच्या भीतीमुळे ग्राहक सीताफळ खरेदी करणे टाळत आहेत.
साकऱ्या वळवी,सीताफळ उत्पादक
पिंपलबारी ता धडगाव..
फोटो : कोरोना च्या भीतीमुळे सीताफळ खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली असून सीताफळ विक्रेत्दिवसभर बसून राहावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे...
Comments
Post a Comment