करोडो रुपयांचे व्यापारी संकुल धूळखात भाड न भरता अनेक गाळे वापरात
पालिकेला करोडो रुपयांचा आर्थिक फटका
सुनील सुर्यवंशी/तळोदा
तळोदा नगर पालिकेकडून कोट्यावधी निधी खर्च करून तयार करण्यात आलेल्या व्यपारी संकुल लिलावात काही तांत्रिक अडचणी मूळ 190 गाळे असलेले हे भव्य व्यपारी संकुल मागील आठ वर्षे पासून पडून आहेत,
त्या ठिकाणी अनेक जण कोणतेही भाड न भरता त्याचा वापर करत असल्याने आज पावेतो सात ते आठ करोड रुपये विविध माध्यमातून मिळणारे विविध पक्षचा आशीर्वाद मूळ वाया जात आहेत,
व्यापारी गाळ्यात अवैध व्यवसाय जोमात -
दरम्यान पालिकेतील आजी माजी विविध राजकीय पक्षांचा स्थानिक नेत्यांचा आशीर्वाद ने या ठिकाणी अवैध व्यवसाय जोमात सुरू असून काही आजी माजी नगरसेवकांचा यात विशेष रस दिसून येत असल्याचे बोलले जाते सर्वच पक्ष कडून हा राजकीय फायदा उचलला जात असल्याने कोणताही राजकीय पक्ष या बाबत बोलण्यास धजावत नाही,
तळोदा शहरातील एकंदरीत आवश्यकता पाहता वर्षे पुर्वी तळोदा पालिकेने व्यपारी संकुल च काम हाती घेतले होते ,या बाबत किरकोळ व्यपारी, भाजी विक्रेते यांच्यातून समाधान व्यक्त करण्यात आले होते ,मात्र इतके वर्ष उलटून देखील ठेकेदाराच थकीत बिल , मुळे अडचणी तसेच या ठिकाणी हक्काची जागा मिळावी म्हणून न्यायालयात धाव घेतली आहे ,
नवीन व्यपारी संकुल दुरावस्था-
न,पा, फंड,तसेच वेशिष्टपूर्ण विकास कामांचा निधीतून हे व्यापारी संकुल गाळे तयार करण्यात येत आहेत, मात्र काही तांत्रिक अडचणी मूळ लिलाव न झाल्याने नवीन व्यपारी संकुल वापरात नसल्यामुळं या ठिकाणी सर्वत्र घाणीचे साम्राज्य असून सर्वत्र मुतारीच स्वरूप दिसून येते होते तसेच वराह यांचा निवारा म्हणून वापर होतांना दिसत होता काही दुकानाचा वापर तर शौचालय म्हणून उघडपणे वापर होत होता आता मात्र परीसर काही प्रमाणात स्वच्छता दिसुन येत आहे मात्र पुढील काळात याचा जाहीर लिलाव लवकर न झाल्यास पुन्हा स्वच्छतेचा प्रश्न उपस्थित होणार आहे
तळोदा शहरात संकुल काळाची गरज
तळोदा शहरातील वाढता व्याप पाहता व्यवसायिक साठी मर्यादित बाजारपेठ असल्यामुळं ठिकठिकाणी ढकलगाडी व किरकोळ अनधिकृत रस्त्यावर उभं राहून विक्रेते काम भागवत आहेत ,त्या तुलनेत जागेची उपलब्धता नसल्यामुळं अनेक तरूणांना रोजगाराचे इच्छा असूनही जागेकगी उपलब्धता नाही या साठी पालिकेचे व्यपारी संकुल लवकरात लवकर तांत्रिक अडचणी दूर करून व्यपारी संकुल उघडण्यात यावेत अशी मागणी होत आहेत
या आहेत अडचणी -
नगर पालिका फंड तसेच वैशिष्ठपूर्ण विकास कामाचा माध्यमातून २०१२ साली व्यापारी संकुल गाळे तयार करण्याच काम हाती घेण्यात आले मात्र त्यातील एक टप्प्यात काम पूर्ण झालं मात्र या ठिकाणी असणाऱ्या भाजीवीक्रेते तसेच धान्यविक्रेते यांनी लिलाव न करता सदर गाळे आम्हला देण्यात यावेत अशी भूमिका त्या वेळी घेतल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे,
एकूण १९० गाळे उपलब्ध असून देखील उपयोगी नाहीत,
दरम्यान तळोदा शहरात मर्यादित बाजरपेठ असल्यामुळ भाजी विक्रेते तसेच किरकोळ विक्रेते यांच्यासाठी हक्काची जागा असून देखील काही निधीच्या तांत्रिक अडचणी मूळ तसेच काही गाळे बाबत जुने व्यवसायिक न्यायालयात गेले असल्याने जे गाळे न्याय प्रविष्ट आहेत त्या व्यतिरिक्त असणारे गाळे बाबत तरी आता लिलाव प्रक्रिया होणे अपेक्षित आहे
Comments
Post a Comment