Posts

Showing posts from August, 2020

डॉ मयूर ठाकरे यांची युवा शारीरिक शिक्षक महासंघाच्या राज्य अध्यक्षपदी निवड

Image
क्रीडा प्रतिनिधी नंदुरबार महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ,अहमदनगर संलग्न नवीन उद्दिष्टासह, नव्या ध्येयासह युवा शारीरिक शिक्षण शिक्षक राज्य कार्यकारणी क्रीडा दिन निमित्त घोषित करण्यात आली असून राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ अहमदनगर यांच्या राज्यस्तरीय युवा शारीरिक शिक्षण शिक्षक कार्यकारणीची पंचवार्षिक निवडणूक आज रोजी संपन्न झाली. या निवडणुकीमध्ये पदाधिकाऱ्यांच्या निवडी महासंघाचे निवडणूक अधिकाऱ्यांनी लोकशाही पद्धतीने जाहीर केल्या . या  युवा कार्यकारणीस कामाचे व निर्णयाचे स्वातंत्र्य  देण्यात आले आहे. या नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या. निवड झालेले पदाधिकारी खालील प्रमाणे- मयूर ठाकरे (नंदुरबार) - अध्यक्ष दिनेश म्हाडगूत (सिंधुदुर्ग) - सचिव सचिन पाटील (कोल्हापुर) - कार्याध्यक्ष  उमेश कडू (चंद्रपूर) - उपाध्यक्ष बाळासाहेब माने (सांगली)- उपाध्यक्ष विजय जाहेर (बीड) - उपाध्यक्ष सचिन पाटील (उस्मानाबाद ) - खजिनदार संजय कांबळे (पुणे)- कार्यालयीन सचिव  पराग गुल्हाणे (वाशीम) - सहसचिव ...

गुणवंत विदयार्थी चा तलोद्यात सत्कार

Image
 तळोदा येथे 10 वी व 12 वीत  प्रथम श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.  तळोदा येथे सातपुडा पावरा समाज संघ च्या वतीने शैक्षणिक वर्ष 2019 20 या वर्षात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विध्यार्थी-विद्यार्थ्यांनी यांचे सत्कार समारंभ पार पाळण्यात आला . यावेळी उद्घाटक म्हणून श्री वेस्ता पावरा -माजी जिल्हा परिषद सदस्य, प्रमुख पाहुणे म्हणून श्री दाज्या  पावरा -पंचायत समिती सदस्य, मार्गदर्शक म्हणून नुकत्याच दुर्गाताई पावरा-  पोलीस निरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण, श्री मुकेश कापुरे अप्पा-ग्रामविकास अधिकारी व संघाचे जिल्हाध्यक्ष श्री मणीलाल नावडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करूनकरण्यात आले.  या छोटेखानी कार्यक्रमात बोलताना मार्गदर्शक श्री कापुरे यांनी आपल्या मनोगतात बोलतांना 10वी 12वी नंतर काय? , सद्या यापुढे येणाऱ्या आपल्या शिक्षणाच्या संधी , प्रत्येक कला, वाणिज्य, व विज्ञान या शाखेतील विध्यार्थ्यांना पुढील उपलब्ध संधी, तसेच विध्यार्थ्यांना अवगत अशा सोप्या भाषेत त्यांच्या पुडील आव्हाने या विषयावर सुंदर अशी मांडणी केली....

भाजप युवा मोर्चा चे निवेदन

Image
भाजपा युवा मोर्चा तळोदा तालुका यांचे निवेदन  धुळे येथे विद्यार्थी परिषदेच्या आंदोलक विद्यार्थ्यांना ज्या अमानुषपणे पालकमंत्री व शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांच्या समोर मारहाण करण्यात आली. लोकशाहीमध्ये संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याची मुभा असताना हे महाराष्ट्रातील सरकार विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना अमानुष मारहाण करत आहे. महाराष्ट्रातील सरकार हे नक्की कोणाचे मुघोलांचे की ब्रिटिशांचे अशी म्हणायचे वेळ आता आलेली आहे. विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानूष मारहाणीचा निषेध व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री विक्रांत पाटील साहेब व जिल्हाध्यक्ष हर्षल भाऊ पाटील यांच्या सूचनेप्रमाणे *आज दिनांक २७ ऑगस्ट रोजी*  मा.तहसीलदार ह्यांना निवेदन देण्यात आले.हया प्रसंगी उपस्थित पराग राणे मा.तालुका उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा ,चेतन गोसावी,जितेंद्र लोहार,कैलास माळी,उदय गोसावी,हिमांशू सूर्यवंशी, हर्षल गोसावी,कुणाल माळी आदि उपस्थित होते.

तळोदा शहराला जोडणाऱ्या खड्डेमय रस्त्यांसाठी गुजरात महाराष्ट्रात स्पर्धा कुठले खड्डे जास्त ?

Image
 गुजरात हद्दीतील हातोडा नंदुरबार रस्त्यांचे तीन तेरा तेरा तर  अंकलेश्वर बऱ्हानपूर  मार्गावर  परत येरे माझा मागल्या  तळोदा अक्कलकुवा रस्ताची दूरअवस्था  तर  तळोदा नंदुरबार रस्ताची वाळू वाहतूक मूळ पूर्णतः चाळण झाली आहे,  तळोदा  ते  डेडीयापाडा अंकलेश्वर- बऱ्हाणपूर   म्हणजेच प्रस्तावित शेवाळी  महामार्ग  रस्ताचपूर्ण खड्डेमय झाला असून तळोदा ते अक्कलकुवा अतिशय कमी अंतर असूनही एक ते दीड तास लागत आहे, तर  तळोदा नंदुरबार रस्त्यावर हातोडा पासून पुढे  वाळू वाहतूक मूळ पूर्ण पणे डांबर ची चाळण झाली असुन नंदुरबार अवघ्या काही मिनटं चे अंतर आता तास भर लागतो,  त्यामुळ एकूणच तळोदा शहराला जोडणारे सर्व शहादा रस्ता काही प्रमाणात अपवाद वगळता  अवघड झालं आहे , वैद्यकीय सेवा पुरवत असतांना या मूळ अनेकांचा जीव उपजिल्हा रुग्णालय पावेतो पोहचे पावेतो जाण्याची शकत्या आहे,  अक्कलकुवा येथील भाजपचे जेष्ठ नेते नागेश पाडवी यांनी आज अशीच एक छबी कैद करून फेसबुकवर टाकून आपली नाराजी मार्म...

१५ आगस्ट स्वातंत्र्यदिनी पालिकेचे नवीन इमारतीत स्थलांतर

Image
तळोदा पालिकेच्या नूतन इमारतीचा शुभारंभ तळोदा पालिकेचा नूतन इमारतीचा शुभारंभ सोमवारी साध्या पध्दतीने करण्यात आला.त्यानिमित्त सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते            दीडशे वर्ष्याच्या राजकीय परंपरा असणाऱ्या व खान्देशातील सर्वात जुनी पालिका म्हणून असलेल्या तळोदा पालिकेचे  नवीन इमारतीत स्थलांतर होण्याची प्रतिक्षा बऱ्याच वर्ष्यापासून होती.अखेर आज सोमवार दि १७ आगस्ट रोजी पालिकेच्या नूतन इमारतीचा शुभारंभ करण्यात आला. कोरोनाचा पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने सत्यनाराणाची महापूजा करून नूतन वास्तूत पालिकेचे कामकाज सुरु करण्यात आले.          याप्रसंगी नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, मुख्याधिकारी सपना वसावा, बालकल्याण सभापती अंबिका शेंडे, नगरसेविका सुनयना अनुपकुमार उदासी, नगरसेवक हेमलाल मगरे, नगरसेवक भास्कर मराठे,बांधकाम सभापती रामानंद ठाकरे,आदी उपस्थित होते.माजी नगराध्यक्षा विमलबाई सोनवणे,प्रा.विलास डामरे,भाजपा शहराध्यक्ष योगेश चौधरी,डॉ रामराव आघाडे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र राजपू...

स्व, अटल बिहारी वाजपेयीं यांना तलोद्यात अभिवादन,,,,,

Image
आज दिनांक 16 ऑगस्ट 2020 वार रविवार रोजी भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजनाचा कार्यक्रम शहराध्यक्ष योगेश चौधरी यांच्या निवासस्थानी घेण्यात आला...यावेळी स्वर्गीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी तळोदा शहराचे लोकानियुक्त नगर अध्यक्ष अजयभैय्या परदेशी,  भाजपा शहराध्यक्ष  योगेशभाऊ चौधरी, तालुकाध्यक्ष प्रा.विलास डामरे ,  नगरसेवक हेमलाल मगरे, नगरसेवक रामंनद ठाकरे, नगरसेवक प्रदीप शेंडे,नगरसेवक नितीन पाडवी,तालुका पदाधिकारी शिरीष माळी, प्रफुल्ल बुद्धीसागर , अरविंद प्रधान ,शक्तिकेंद्र प्रमुख रमेश पाटील,संयोजक अविनाश मराठे,कुणाल ठाकरे,संघटन पदाधिकारी व शहर कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य तथा कार्यकर्ते उपस्थित होते

कोरोना नियंत्रणासाठी त्रिसूत्री वापर करा,,,, पालकमंत्री मा, के, सी, पाडवी

Image
कोरोना नियंत्रीत करण्यासाठी त्रिसूत्रीचा वापर करा- ॲड. के.सी.पाडवी  जिल्ह्यातील कोरोना नियंत्रीत करण्यासाठी प्रशासन चांगला प्रयत्न करत असून नागरिकांनी नियमित मास्क लावणे, साबणाने नियमित हात धुणे, शारिरीक अंतर राखणे  या त्रिसूत्रीचा वापर करावा, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांनी केले.  भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात ॲड.पाडवी यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जि.प.अध्यक्षा सीमा वळवी, खासदार डॉ.हीना गावीत, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, जि.प.उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी आदी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना पालकमंत्री म्हणाले, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनातर्फे युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. एकाचवेळी 750 बाधितांच्या उपचाराची सुविधा करण्यात आली आहे. महिला रुग्णालयाच्या नूतन इमारतीत 100 रुग्णांना ऑक्सिजन आणि 50 रुग्णांना व्हेंटीलेटरची सुविधा असणार...

तळोद्यातील बाळ गोपाळांचे राष्ट्रप्रेम घरीच स्वयंम प्रेरणेतून केलं ध्वजारोहण

Image
तलोद्यात  बाळ  गोपाळांचे ध्वजारोहन   शाळा म्हटली की स्वातंत्र्य दिनाचा उत्साह  काही दिवस अगोदर पासूनच नवीन स्वछ धुतलेला गणवेश कपडे, बूट, खिशाला लावण्यासाठी  ध्वजाची छोटी प्रतिकृती पिन  सह तयार शाळेतील विद्यार्थी दिसून येतात मात्र यंदा  कोरोना कोविड १९ मूळ सर्वच कस थांबल्या थांबल्या सारख  वाटत  आहे ,  देशाचा सर्वोच्च मानाचा दिवस म्हणून या कडे पाहिले जाते म्हणून प्रत्येक शाळेत भर पावसात सर्वत्र स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला मात्र मुलांचा किलबिलाट शाळेत नसल्याने कुठंतरी या चिमुकल्या पाहुण्यांची अनुपस्थित  जाणवली  इतकंच काय तर विद्यार्थी शाळेतील जीव असतो याची जाणीव देखील सर्वत्र झाली , यंदा आपल्याला ध्वजारोहण करता येणार नाही शाळेत चॉकलेट व खाऊ भेटणार नाही  यंदा नवे व स्वच्छ कपडे व बूट घालून राष्ट्रगीताने भारावून जाता येणार नाही  हे  नसलं म्हणून  काय झालं , इथं नाराज न होता आपण  काहीतरी केलं पाहिजे म्हणून  स्वतः आपल्या घरीच  ध्वज बनवणे तो रंगवणे उभा करणे त्याचा पुढे रांगोळ्या काढून फुलं टा...

शेठ के,डी, हायस्कुल ध्वजारोहण संपन्न

Image
तळोदा - तळोदा येथील पी ई सोसायटी संचलित शेठ के डी हायस्कूल येथे संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण बबनराव माळी यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले.               कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विद्यार्थ्यांच्या अनुपस्थित सामाजिक अंतर ठेवून साजरा करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. त्याअनुषंगाने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण बबनराव माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक अरविंद मगरे, विश्वनाथ कलाल, नगरसेवक संजय माळी, युवा काँग्रेस उपाध्यक्ष संदीप परदेशी, शहादा तळोदा विधानसभाचे समनव्यक योगेश मराठे, माजी नगरसेवक पंकज राणे, सेवा निवृत्त उप मुख्याध्यापक आय.डी.चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक जे.एल सूर्यवंशी. यांच्या मार्गदर्शनात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

शिक्षण महर्षी प्रा, भाई साहेब गो,हू, महाजन ( न्यू हायस्कुल )व शी,ल, माळी कनिष्ठ विद्यालयात ध्वजारोहन संपन्न

Image
तळोदा येथील शिक्षण महर्षी प्रा, भाई साहेब गो,हू,  महाजन न्यू हायस्कूल तळोदा व शी,ल, माळी, कनिष्ठ महाविद्यालयात ७४ वा  स्वातंत्र्य दिन ध्वजारोहन  सोशल डिस्टन्ससिंग च पालन करत शाळेचे प्राचार्य व संस्थेचे संचालक मा, अजित टवाळे  यांच्या हस्ते करण्यात आले ,  या वेळी  पर्यवेक्षक श्री एस,एम, महिरे, पर्यवेक्षक आर,सी, माळी, क्रीडा विभाग प्रमुख निलेश माळी कार्यलयीन प्रमुख डी, पी,महाले, सेवा निवृत्त प्राचार्य अरुण मगरे, सेवा निवृत्त उपमुख्यद्यापक श्री संजय माळी,  आदी उपस्थित होते,    यावेळी सर्व शिक्षक बंधू व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते

आमलाड ला शेड उपलब्द करा,,,, मागणी

Image
तळोदा :-- संततधार पाऊस सुरू असल्यामुळे आमलाड येथे सँब नमुने घेण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत आहे आहे तरी आमलाड तपासणी केंद्र साठी शेड उपलब्ध होण्या बाबत भाजप उपजिल्हाध्यक्ष आनंद सोनार यांनी तळोदा तहसीलदार पंकज लोखंडे यांना निवेदन दिले  तळोदा शहरात प्रशासन व आरोग्य विभाग अतीशय परीश्रम घेत असून तळोदा येथेच  संशयित रुग्णांचे नमुने घेऊन सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णास सलसाडी येथे ठेवले जातं आहे, हा निर्णय तळोदा साठी योग्य असला तरी सध्या पाऊस सतंतधार सुरू असून आमलाड येथे सँब नमुने घेण्यासाठी रांगेत उभे राहताना भर पावसात उभे राहावे लागत आहे आपणास विंनती आहे की या ठिकाणी  तात्पुरता स्वरुपात शेड उभे करून गैरसोय दूर करावी अन्यथा या ठिकाणी संशयित असणाऱ्या रुग्णाला पावसात भिजून अधिकच त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण की इथं जेष्ठ नागरिक व महिला देखील येत असतात तरी विंनती अर्ज ची दखल  घेण्यात यावी निवेदनावर आनंद सोनार शिरीषकुमार माळी व योगेश चव्हाण यांच्या सह्या आहेत

हतनूर धरणाचे चे १२ दरवाजे उघडले

Image
तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा  दि.14 – तापी नदीपात्रात पाण्याची सातत्याने आवक होत असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे. पुढील 72 तासापर्यंत पाणी पातळीत सतत वाढ होणार असल्याने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.   जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पाचे 24 दरवाजे पूर्ण उघडले असून 12 दरवाजे 1.00 मीटरने उघडण्यात आले आहे. त्यामुळे तापी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू राहणार आहे.   त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील विसर्ग अजून वाढणार आहे. यासाठी पुढील 72 तासासाठी नागरीकांनी नदी काठावर जावू नये. आपली गुर-ढोरे नदीकाठी जावू देऊ नये व नदीकाठी असल्यास सुरक्षित स्थळी हलवावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. साभार जी,म, का, जळगांव

गुजरात हद्दीतील रस्ता दुरुस्त करण्याची मागणी

Image
 तळोदा :-- धडगाव व तळोदा येथील नागरिकांना नंदुरबार येथे जात असतांना गुजरात हद्दीतील सज्जीपुर ते वाका चार रस्ता पर्यंत रस्त्यातील खड्ड्या मुळे होणाऱ्या त्रासा बद्दल युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप परदेशी यांनी गुजरात राज्यातील निझर विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनीलभाई गामित यांना निवेदन देऊन लवकरात लवकर दुरुस्त व्हावा अशी मागणी केली आहे तळोदा व धडगाव तालुक्यासाठी जिव्हाळ्याच्या हातोडा येथील तापी नदीवरील पूल झाल्यामुळे जिल्ह्याचे अंतर निम्म्याने कमी झाले आहे परंतु हा मार्ग दोन राज्यात वाटला गेल्यामुळे तळोदा ते नंदुरबार अंतर फक्त वीस किलोमीटरचे असून सज्जीपुर ते वाका चाररस्ता हे चार ते पाच किलोमीटरचे अंतर गुजरात राज्यात येत असून या मार्गात रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ता हे वाहनधारकांना समजत नसून दररोज लहान-मोठे अपघात होत असतात व तापी नदी मधून रेतू घेऊन जाणारे अवजड वाहन जास्त प्रमाणात ये जा करत असल्यामुळे या रस्त्याच्या बारा वाजवण्यात यांच्या मोठा सिंहाचा वाटा आहे हा रस्ता लवकर दुरूस्त व्हावा ह्या साठी युवक काँग्रेस कडून निवेदन देण्यात आले आहे निवेदन दिले त्या निवेदनावर सुनीलभा...

वाढीव बिल रद्द करा

Image
तळोदा कोरोना या महामामारीमुळे संकटात सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आता महावितरणाने वाढीव वीज बिलांचा शॉक दिला आहे. तळोदा शहरात गेल्या चार महिन्यात कोणत्याही मिटर चे रिडींग न घेता ग्राहकांना भरमसाट अंदाजे वाढीव बिल पाठवली आहेत.यामुळे या वाढीव वीजबिला संदर्भात तळोदा येथील वीज विद्युत वितरण कंपनी ला आदिवासी युवा शक्ती या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात नागरिकांना आलेले वाढीव वीज बिल विभागून देण्यात यावी अशी मागणी केली आहे. अन्यथा या संदर्भात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.                निवेदनात म्हटले आहे की, मागील चार महिन्याच्या लॉकडाऊन काळात मिटर रिडींग घेतलेले नाही व विजदेयके देखील देण्यात आले नाही आहेत. त्यानंतर सरासरी वीज बिल सर्वांना पाठविण्यात आले आहे. सदर लाईट बिल अव्वाचा सव्वा असून गोरगरीब वर अन्याय होत आहे. तरी लाईट बिल रीडिंग घेवून चार महिन्यात विभागून देण्यात दयावे जेणेकरून ते कमी होईल अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनाची तात्काळ दखल न घेतल्यास या विरोधात तीव्र आंदोलन छेडण...

तलोद्यात समाधानकारक पाऊस मात्र रांझनी सह काही भागात नुकसान

Image
तळोदा  तळोदा तालुक्यात ७ ऑगष्ट रोजी झालेला दमदार पाऊसासह सुसाट वाऱ्यामुळे ऊस, ज्वारी व मक्याचे आडवे पडल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे हाता तोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी अशी मागणी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे   तळोदा तालुक्यात गेल्या आठवड्या भरापासून जोरदार पाऊस होत आहे पावसाबरोबर सुसाट वारा सुरू होत असल्याने ऊस, ज्वारी, मका जमिनी लगत आडवे पडले आहे  त्यामुळे मका व ज्वारी पिकांचे सातपुड्याच्या लगत भागात नुकसान चित्र दिसत आहे सातपुड्याच्या पायथ्या लगत असलेल्या गावासह मोकसमाळ येथील किशोर राज्या पाडवी यांच्या शेतातील ८७ आर  क्षेत्रासह इतरत्र शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले आहे याकडे संबंधित विभाग लक्ष घालावे नुकसान ग्रस्त क्षेत्रांचे पंचनामे करावे व शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे

तळोद्यात यूनानी मेडिकल तपासणी कैम्पचे आयोजन

Image
 तळोदा येथे मंसुरी पंच जमात सामाजिक संस्था यांच्या मार्फ़त यूनानी मेडिकल तपासणी कैम्पचे आयोजन करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच लोकांमध्ये या महामारीच्या रोगविषयी  भीती कमी व्हावी या हेतुने यूनानी मेडिकल तपासणी कैम्प चे आयोजन केले आहे. या कैम्प मध्ये मालेगांव येथील यूनानी डॉक्टर चे पथक बोलविले असून सोबत यूनानी चे औषधे  सोबत काढ़ा देण्यात येत आहे. आज या कैम्प चे उद्धघाटन शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार श्री राजेश पाडवी, तळोदा नगर परिषदचे नगराध्यक्ष श्री अजय भैया परदेशी, श्री.योगेश चौधरी,निसार मकरानी,शेख इक़बाल, नंदू जोहरी,जामा मशीद चे इमाम मौलाना शोएब राजा नूरी, दोंडायचा नगर परिषद चे माजी शिक्षण सभापती नाजिम भाई शेख,डॉ अब्दुल वाहिद,डॉ आमेर मलिक,डॉ ऐतशाम शेख,डॉ फैजान शेख,उपस्थित होते. सदर कैम्प हा पुढील दोन दिवस सुरु राहणार असून त्याचा लाभ जामा मस्जिद परिसर नॅशनल हायस्कूल जवळ तळोदा येथे सर्व समाजाच्या लोकांनी  लाभ घ्यावा असे आव्हान मंसुरी पंच जमात सामाजिक विकास संस्था चे अध्यक्ष श्री जावीद मंसुरी यांनी केले आहे.  या कार्यक्रमस संस्थेचे सर्...

पर्युषण काळ निमित्ताने रेनकोट वाटप

Image
तळोदा            तळोदा नगरपालिकेच्या 50 सफाई कर्मचाऱ्यांना तळोदा श्री जैन संघ कडून रेनकोट चे वाटप करण्यात आले. पावसाळ्याच्या दिवसात सफाई कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागतो. कोरोना काळात अविरतपणे सफाई कर्मचारी शहराची सफाई करण्याचे काम करत आहेत. त्यामुळे जैन धर्मातील पवित्र पर्युषण पर्वाचा पार्श्वभूमीवर तळोदा जैन समाजाने सफाई कर्मचाऱ्यांना हे रेनकोट उपलब्ध करून दिले आहेत.          या रेनकोटचे वाटप नगराध्यक्ष अजय परदेशी, भाजपाचे शहराध्यक्ष योगेश चौधरी, नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी, जैन श्री संघाचे गौतम जैन, धनराज पारेख, चंपालाल जैन , हंसराज भंडारी, पियुष कोचर ,महाविर जैन, राहुल सेठिया , किर्तिकुमार शहा, शांतीलाल जैन यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी जैन श्री संघ समाजाच्या या उपक्रमाचे स्वागत करून संघाचे कौतुक केले. कार्यक्रमात पालिकेचे प्रभारी आरोग्य निरीक्षक अश्विन परदेशी व सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पर्युषण पर्वावर तळोदा सफाई कर्मचारी ना रेनकोट वाटप

Image
तळोदा            तळोदा नगरपालिकेच्या 50 सफाई कर्मचाऱ्यांना तळोदा श्री जैन संघ कडून रेनकोट चे वाटप करण्यात आले. पावसाळ्याच्या दिवसात सफाई कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागतो. कोरोना काळात अविरतपणे सफाई कर्मचारी शहराची सफाई करण्याचे काम करत आहेत. त्यामुळे जैन धर्मातील पवित्र पर्युषण पर्वाचा पार्श्वभूमीवर तळोदा जैन समाजाने सफाई कर्मचाऱ्यांना हे रेनकोट उपलब्ध करून दिले आहेत.          या रेनकोटचे वाटप नगराध्यक्ष अजय परदेशी, भाजपाचे शहराध्यक्ष योगेश चौधरी, नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी, जैन श्री संघाचे गौतम जैन, धनराज पारेख, चंपालाल जैन , हंसराज भंडारी, पियुष कोचर ,महाविर जैन, राहुल सेठिया , किर्तिकुमार शहा, शांतीलाल जैन यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी जैन श्री संघ समाजाच्या या उपक्रमाचे स्वागत करून संघाचे कौतुक केले. कार्यक्रमात पालिकेचे प्रभारी आरोग्य निरीक्षक अश्विन परदेशी व सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नंदूरबार वनक्षेत्रात चितळ ला सुखरूपपणे सोडले

Image
चितळला  नेसर्गिक अधिवासात सोडले , तळोदा  नंदुरबार येथील हरी ओम नगर येथून चितळ  प्रजातीचे (मादी) रेस्क्यू करून  नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. यापूर्वी काळवीट व नीलगाय हेही रेस्क्यू करण्यात आले होते . सदर कारवाई  वनक्षेत्रपाल  एम के रघुवंशी वनपाल नांदरखे संजय पाटील, वनपाल युवराज भाबड व माजीसैनिक  विशाल मराठे वनमजुर  हिम्मत चौरे व   आवशा सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला  नंदुरबार वन क्षेत्रात मागील काळात वन्यजीवांच्या वाढीस  या भागात वाटण्यात आलेल्या गॅस कनेक्शनमुळे   वृक्ष तोड थांबून जंगल वाढीस मदत झाली आहे.  सहायक उप वन सरंक्षक  गणेश रणदिवे यांचा मार्गदर्शन खाली हे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी पार पडले

आता तळोद्यात संकलन व कोविड सेंटर देखील उपलब्ध

Image
सलसाडी आश्रमशाळेत कोविड रुग्णालय कार्यान्वित  तळोदा तालुक्यातील सलसाडी येथिल आश्रमशाळेच्या वसतिगृहाच्या इमारतीत कोविड रुग्णालय कार्यान्वित करण्यात असून आमलाड येथिल विलीगीकरण कक्षातसंशयित रुग्णांच्या घशातील स्वॉबचे नमुने संकलित करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.                  तळोदा शहरासह जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या मागील महिनाभरासून वाढतच आहे.या सर्व रुग्णांना नंदूरबार येथील कोविड रुग्णालयात उपचार करण्यात येतात.मात्र कोरोणाग्रस्तांची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता तळोदा तालुक्यात कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या.कोविड रुग्णालयासाठी प्रशासनाकडून सलसाडी येथिल आश्रमशाळेची पाहणी केली होती.तेथिल वसतिगृहाच्या इमारती "कोविड रुग्णालय' उभारण्यात आले असून आज जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून त्याचे उद्घाटन करण्यात आले.              या कोविड रुग्णालयात ५० खाटांची क्षमता असून कोविड पॉसिटीव्ह लक्षणे असलेल्या रुग्णांना भरती करण्यात ...

उद्या भूमी पूजन

Image
 तळोदा  तळोदा शहरातील चिनोदा चौफुलीवर स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांच्या पुतळा बसविला जाणार असून विश्व  आदिवासी दिनाचे औचित्य पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन केले जाणार आहे.तळोदा शहरातील हा पहिला पुतळा ठरणार असून लवकरच याठिकाणी सहा फुटी पुतळा बसविन्यात येणार आहे.          रविवार सकाळी १०  वाजता आमदार राजेश पाडवी,नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमाताई वळवी, माजी क्रीडामंत्री पदमाकर वळवी, नगराध्यक्ष अजय परदेसशी,उपनगराध्यक्षा  भागयश्री योगेश चोधरी, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभाताई शिंदे यांच्यासह नगरसेवकांच्या हा उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार आहे.यावेळी प्रतीकात्मक पुतळाचे पूजन करण्यात येणार आहे,          तळोदा शहरातील शहादा रस्ता, चिनोदा रस्ता,नंदुरबार रस्ता, कॉलेज रस्ता अश्या चारही रस्त्यावर विविध ठिकाणी पुतळे बसवुन शोभा वाढविण्यासाठी पुढील काळात नियोजन हाती घेतले जात असून त्याची सुरवात उद्या स्वातंत्र सेनानी बिरसा मुंडा यांच्या पुतळा पूजन पासून केली जात असल्याची माहिती नगराध...

शा, शिक्षण चा समावेश दिक्षा एप मध्ये समावेश करणार ,,,,,,,,,,,,,,,,,दिनकर पाटिल(शीक्षण संचालक)

Image
शारीरिक शिक्षणाचा समावेश दिक्षा     एपमध्ये करणार- शिक्षण संचालक दिनकर पाटील शारीरिक शिक्षणाच्या ऑनलाईन अभ्यासक्रमाचा शुभारंभ    कोरोना सारख्या विचीत्र परिस्थितीला जग सामोरे जात असताना रोगप्रतिकारक शक्ती माणसाला तारते आहे . ही रोगप्रतीकारक शक्ती योगा, प्राणायम, सूर्यनमस्कार, एरोबिक्स तसेच इतर व्यायाम प्रकारातून निर्माण होते. या सर्व बाबी शारीरिक शिक्षणात येत असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शारीरिक शिक्षणातील तंत्रशुद्ध व्यायाम प्रकाराची माहिती विद्यार्थ्यां समवेत शिक्षक, पालक व समाजासाठी अत्यंत महत्वाची व रोगप्रतीकारक क्षमता वाढविण्यासाठी महत्वाची आहे. शारीरिक शिक्षण तंत्रस्नेही पॅनलने तयार केलेले ई कंटेंट हे दिक्षा अॅप व जिओ टीव्ही चॅनलवर घेण्यात येऊन सर्वांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी शासन घेईल असे आश्वासन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेचे संचालक तथा शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी दिले. महाराष्टात संघटना स्तरावर प्राथमतःच असा प्रयत्न झाला असल्याचे नमुद करून शारीरिक शिक्षक संघटना, व तंत्रस्नेही पॅनलचे कौतुक केले.महाराष्ट्र राज्य क्रीडा शि...

तलोद्यात अज्ञात वाहनाचा धडकेत तरस ठार

Image
तळोदा तळोदा इथ पट्टेरी तरस अनिसुची -१ मधला वन्यप्राणी रेवानगर चौगाव खुर्द रस्त्यावर रात्री  अज्ञात वाहनाचा धडकेत  जागीच ठार झाले असून याची माहिती वन विभागाला कळली असता वन उपज आगार तळोदा स.वनसंरक्षक कापसे  वनक्षेत्रपाल कासार  यांच्या मार्गदर्शन खाली वनरक्षक श्रावण कुवर अमोनी , वनरक्षक सा.व.गिरधन पावरा, वनमजूर- भीमसिंग कोठारी , जयसिंग वळवी , निलवर कोठारी  या प्राण्याला जाळण्यात आले

अज्ञात वाहनाचा धडकेत तरस ठार

Image
 तळोदा तळोदा इथ पट्टेरी तरस अनिसुची -१ मधला वन्यप्राणी रेवानगर चौगाव खुर्द रस्त्यावर रात्री  अज्ञात वाहनाचा धडकेत  जागीच ठार झाले असून याची माहिती वन विभागाला कळली असता वन उपज आगार तळोदा स.वनसंरक्षक कापसे  वनक्षेत्रपाल कासार  यांच्या मार्गदर्शन खाली वनरक्षक श्रावण कुवर अमोनी , वनरक्षक सा.व.गिरधन पावरा, वनमजूर- भीमसिंग कोठारी , जयसिंग वळवी , निलवर कोठारी  या प्राण्याला वनउप कार्यालय चा आवारात  जाळन्यात आले

सावधान हातोडा रस्त्यावर बिबटयाचा मुक्तसंचार

Image
प्रतिनिधी तळोदा तळोदा नंदुरबार रस्त्यावर बायो इंधन पंप समोरील शेताच्या रस्त्यावर सकाळी सात वाजेच्या सुमारास  बिबटया च्या डरकाळ्या सुरू होत्या हा आवाज ऐकताच संदीप मराठे यांचा  शेतातील जागल्या    ने शेत मालकास फोन लावला, दोन दिवस पूर्वी याच  बायो पंप शेजारी असणाऱ्या एक हॉटेल मधील एक पाळीव कुत्रा देखील या बिबट  ने फस्त केला आहे,   तळोदा नंदुरबार रस्त्यावर वाहन सतत सुरु असतात, या भागात एक नवीन वसाहत देखील असल्याने काळजी वाढली आहे, वॉकिंग करणारे अनभीज्ञ - तळोदा नंदुरबार रस्त्यावर दररोज सकाळी क संध्याकाळी फिरणारे मोठ्या संख्येने जात असतात, त्यामुळे त्यांचा हि जीवास धोका निर्माण झाला आहे, विशेषतः पहाटे पांच वाजता देखील काही तरुण व जेष्ठ नागरिक तसेच महिला नियमित फिरण्यासाठी जातात पहाटे इथं पुर्ण अंधार असतो त्यामुळे हल्ला होण्याची शकत्या नाकारता येत नाही दरम्यान सदर क्षेत्र हे गुजरात महाराष्ट्र राज्याच्या हद्दीवर असल्याने तक्रार कोनत्या वन विभाग कडे करावी असा प्रश्न परिसरातील शेतकरी बांधवांना पडला आहे,          तळोदा शहर लगत असणाऱ्...

नगरसेवक आपल्या दारी

Image
वैश्विक महामारीमुळे प्रभागात सामाजिक व वयक्तिक रित्या उदभवलेल्या समस्या सोडविण्यासाठी प्रभाग क्रमांक 2 च्या नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय व अनिता परदेशी हे प्रभागात आपल्यादारी पोहचणार आहे. याकरिता नगरसेवक आपल्यादारी हा उपक्रम त्यांनी राबविण्याच्या निर्णय घेतला असून दर महिन्याच्या 5 तारखेला प्रभागात जाऊन समस्यांचे निरसन करणार आहेत. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.            तळोदा येथील प्रभाग क्रमांक 2 चे नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय व अनिता परदेशी यांनी नवनवीन उपक्रम राबवून जिल्ह्यात प्रयोगशील नगरसेवक म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. निवडणूकीच्या पूर्वीच स्व-खर्चाने लाखों रुपयांचे विकास कामे त्यांनी केले होते. प्रभागातील नागरिकांच्या समस्यां सोडविण्यासाठी ठिकठिकाणी हेल्पलाईन क्रमांकाचे फलक लावनारे ते पहिलेच नगरसेवक आहेत. या नगरसेवकानी महिला सक्षमीकरण व बेटी बचाव बेटी पढावासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. प्रभागात 1 रुपयात कचरा संकलन वाहन उपलब्ध केले. प्रभागातील नळ बसवणे, स्त्री जन्माचे स्वागत करणे, यासोबतच नुकताच त्यांनी स्वखर्चाने प्रभाग क्रमांक दोनच्य...

निकृष्ट काम मुळे अपघात

Image
तळोदा येथून किराणा सामान धवळीविहीर या आपल्या गावी घेऊन जाणारा मोटारसायकलस्वार तुटलेल्या पुलावर तोल गेल्याने खाली कोसळल्याची घटना आज सोमवारी घडली. त्यात मागे बसलेल्या लहान मुलाला देखील जबर मार लागला आहे. तुटलेला पुल व निकृष्ट कामामुळे  वाहून गेलेला भरावामुळेच अश्या घटना वारंवार घडत असल्याने धवळीविहीर ग्रामस्थांना कसरत करूनच रस्ता पार करावा लागत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे येथील पुलाचे बांधकाम करून रस्ता सुस्थितीत येण्याची अपेक्षा आहे.         तळोदा धवळीविहीर रस्त्यावर हलालपूर गावाच्या पुढे रस्त्यावरील पुलाला मोठे भगदाड पडून भराव पूर्णपणे वाहून गेला आहे. गावकऱ्यांनी जेमतेम तयार केलेल्या पर्यायी  रस्त्यावरून कसरत करत वाहन चालवावे लागते. अशातच सोमवारी रक्षाबंधन असल्याने प्रकाश बारक्‍या पावरा हे आपल्या मोटार सायकलने तळोदा येथून किराणा सामान घेऊन आपल्या लहान मुलासोबत परत येत होते. भराव वाहून गेल्याने रस्ता नसल्यासारखी परिस्थिती असल्याने बाजूला असलेल्या निमुळत्या रस्त्यावरून मोटारसायकल काढताना तोल जाऊन ते पुलाचा खड्ड्यात मोटार सायकलसह खाली पडले. यामुळे त्यांना व...

कार्यकर्ते फक्ट आंदोलन साठी का ?

Image
निष्ठावंतांना डावलून उपऱ्यांचा वरचष्मा  भाजपातील स्थिती कालीचरण सूर्यवंशी            भाजपा नुकत्याच निवड करण्यात आलेल्या तळोदा तालुका कार्यकारणी निष्ठावंत कार्यकर्ते ना डावलून बाहेरून पक्षात आलेल्याना पद दिल गेल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.नुकत्याच झालेल्या भाजपाचा दूध दर वाढ आंदोलनाच्या वेळी कार्यकर्यांनी फिरवलेली पाठ हे त्याचे द्योतक असल्याचे सांगितले जात आहे.             मागील सात वर्ष्यात गल्लीपासून दिल्ली पर्यत भाजपची लाट असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे अश्या अनेक पक्षांतील नेत्यांनी भजापाचे कमळ हाती घेतले. त्यातच केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असल्याने भाजपातील सुरू असलेली इनकमिंग मोठ्या प्रमाणात वाढलेली अनुवायला आहे.नंदूरबार जिल्हाही त्याला अपवाद राहिलेला नाही.          नंदूरबार जिल्हात देखिल भाजपात दुसऱ्या पक्षातून येणाऱ्यांची मोठी भाऊ गर्दी झालेली पहायला झाली.या भाऊ गर्दीमुळे भाजपातील निष्ठावंतांची मोठी घुसमट झालेली आहे.नाथाभाऊ खडसे हे त्याचे सर्वांत बोलके ...

कोरोना कोविड (१९) विरुद्ध एकत्रित लढू या,,,,

Image
चला स्वातंत्र्यदिना निमित्त कोरोना विरिद्ध एकजूट होऊन लढूया शिस्त पाळू या,,,,,          तळोदा तालुका मराठी पत्रकार संघा कडून भावनिक आवाहन तळोदा शहर व तालुक्यातील तमाम जनतेस जाहीर आवाहन वजा विनंती करण्यात येते की कोरोनाच्या प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मागील तीन महिन्यात आपण  जबाबदारी पाळत सर्वानी प्रशासनाला सहकार्य केले आहे , मात्र हा महिना अधिक काळजी घेण्यासारखा आहे जिल्ह्यात दररोज रुग्ण संख्येच्या आलेख वर चढत आहे. या परिस्थितीत आपण सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे, *विशेषतः किमान दहा वर्षाखालील लहान मुले व 50 वर्षांवरील नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.* कृपया वरील वयोगटाचा मुलामुलींनी आणि नागरिकांनी ऑगस्ट महिन्यात घरातुन बाहेर पडताना काळजी घ्यावी अथवा बाहेर पडूच नये अशी कळकळीची विनंती आम्ही करीत आहोत.         कोरोनाला हरवायचे असेल तर त्याचे केवळ खालील मार्ग आहेत हे वारंवार सिद्ध झाले आहे. त्यात मास्क वापरणे, वारंवार हात धुणे व एकमेकांपासून शारीरिक अंतर राखणे या त्रिसूत्रीवरच आपण कोरोनावर विजय मिळवू शकतो.       ...

तळोद्यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

Image
*साहित्यसम्राट लोकशाहिर डॉ.आण्णाभाऊ साठे यांची जन्म शताब्दी तळोदा येथे लहुजी वस्ताद सोशल ग्रुप व ब्लु टायगर बॉईज कडून अभिवादन करण्यात आले*     *डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभाग्रुह,डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथे साहित्यसम्राट,लोकशाहिर डॉ.आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार डॉ.स्वप्निल बैसाणे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.मुकेश कापुरे,नितीन गरुड,सुभाष शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले* *जय भिम नवयुवक मंडळ,लहुजी वस्ताद सोशल ग्रुप,ब्लु टायगर बॉईजचे कार्यकर्ते उपस्थित होते*

तळोद्यात कोरोना योद्धांचा सत्कार

Image
महात्मा फुले सामाजिक लोक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आज शनिवारी (ता. १) रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त शहरातील कोरोना योद्धाचा सन्मान करण्यासाठी येथील बालाजी वाड्यात कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. शशिकांत वाणी, नगराध्यक्ष अजय परदेशी, तालुकाध्यक्ष विलास डामरे, शहराध्यक्ष योगेश चौधरी, सिनेट सदस्य दिनेश खरात, जिल्हा उपाध्यक्ष आनंद सोनार, नगरसेवक अमोनोद्दीन शेख, हेमलाल मगरे, विश्वनाथ कलाल, रसिकभाई वाणी, पत्रकार संघाचे अध्यक्ष फुंदीलाल माळी, अक्रम पिंजारी आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महात्मा फुले सामाजिक लोक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.... तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष फुंदीलाल माळी यांचा सत्कार  जय श्रीराम ग्रुपचे अध्यक्ष सागर भोई यांचा सत्कार  लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच प्रतिमा पूजन करताना  डॉ शशिकां...